logo
(Trust Registration No. 393)
AIMA MEDIA
logo

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापुरमध्ये चप्पलफेक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून चप्पलफेक झाल्याचा दावा केला जात आहे. पडाळकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना मोठा खुलासा केला आहे. नेमकं काय घडलं याबाबत पडळकर यांनी सविस्तर सांगितले आहे.

गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. इंदापुरात घडलेल्या प्रकाराची जोरदार चर्चा होत आहे. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून चप्पलफेक झाल्याची चर्चा आहे. इंदापूर प्रशासकीय भवनासमोर शिवधर्म फाऊंडेशनच्या दिपक काटे हे दुध दर वाढीच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. पडळकर उपोषणकर्त्या शेतक-यांच्या भेटीसाठी आले होते. या ठिकाणी भेट द्यायला गेलेल्या गोपिचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेक झाल्याची माहिती समोर येत आहे. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चप्पल फेक केल्याची माहिती समोर येतेय. कारण, पडळकर येथे शेतकऱ्यांना भेटून गेल्यानंतर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

0
0 views    0 comment
0 Shares

डोंबिवलीसाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरण आरक्षित करण्याची आग्रही मागणी कल्याण पश्चिम शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली. ज्याला ठाणे जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा विभाग आणि कल्याण डोंबिवली महापालिकेने तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार भोईर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रस्तावित विकासकामांसंदर्भात नुकतीच बैठक संपन्न झाली. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड उपस्थित होते. या बैठकीत मतदारसंघातील महत्त्वाच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला.

कल्याण डोंबिवलीतील नागरीकरण वाढत असताना मूलभूत सोयी सुविधांवर येत आहे.त्यामुळे शहरातील बऱ्याचशा नव्या गृह संकुलांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. येत्या काळात ही पाणी समस्या अतिशय उग्र रूप धारण करेल याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण डोंबिवलीसाठीच्या स्वतंत्र धरणाची गरज अधोरेखित केली. अंबरनाथ तालुक्यातील कुशीवली धरण कल्याण डोंबिवलीसाठी आरक्षित करावे किंवा या धरणातील पाण्याचा वाढीव कोटा केडीएमसीला देण्याची मागणी आमदार भोईर यांनी केली. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता मुबलक पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र धरण आरक्षित करणे ही आवश्यक बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याविषयी अतिशय संवेदनशील असून येत्या काळात स्वतंत्र धरण आरक्षीत करण्याचा निर्णय घेतील असा विश्वास आमदार भोईर यांनी व्यक्त केला आहे.

शहराची लोकसंख्या २० लाखाच्या घरात आहे. या लोकसंख्येनुसार प्रति दिन ४२३ दशलक्षलीटर पाणी पुरवठा होत आहे. पुढील तीस वर्षांचा टप्प्या टप्प्याने विचार करता २०३४ मध्ये लोकसंख्या ३४ लाख ९० हजार आणि प्रतिदिन गरज ६१६ दशलक्षलीटर, २०४२ मध्ये ५० लाख ८८ हजार आणि प्रतिदिन गरज ८९८ दशलक्षलीटर तर २०५२ मध्ये लोकसंख्या ७४ लाख आणि पाण्याची प्रतिदिन गरज १ हजार ३१० दशलक्ष लिटर भासणार आहे.

0
0 views    0 comment
0 Shares

खोणी गावातील कातकरी आदिवासी समाजातील 6 जणांचा गावातीलच दोघा भावांनी फसवणूक करत त्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ स्वतःच्या खिशात घातल्याची घटना उघडकीस आली आहे.तसेच हे दोघे भाऊ आदिवासींना कोणताही मोबदला न देता त्यांच्याकडून मजुरी करुन घेत होते, त्यांनी काम न केल्यास त्यांना मारहाण केल्याचेही समोर आले असून याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात विजय शालीक पाटील (वय 45) व संजय शालीक पाटील (वय 40) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र या प्रकरणात अधिकारी वर्गाची देखील चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खोणीगावात तक्रारदार अशोक वाघे (वय 50) हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्नी सूमन हिच्यासोबत सासरी राहत आहेत. तसेच त्यांच्या बाजूलाच सुनिल शांताराम वाघे, सुंदरी शंकर वाघे,

अंकिता शंकर वाघे, सुनिता अनिल वाघे हे आदिवासी बांधव देखील रहातात. या कातकरी आदिवासींकडून याच गावात राहणारे विजय व संजय यांनी फसवणूक केली आहे. अशोक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संजय व विजय यांनी या आदिवासींना शासकीय योजनेतून घरे बांधून दिली आहेत.

ही घरे त्यांच्या जमिनीवर असून त्यांच्यामुळे त्यांना ही घरे बांधून मिळाल्याचे सांगत त्या बदल्यात दरवर्षी त्यांच्याकडून शेतीचे सर्व कामे जसे की भात लागवड, कापणी, झाडणी, मळणी व इतर कामे करुन घेत असत.
आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांना कोणताही मोबदला न देत गेल्या 10 वर्षापासून त्यांच्याकडून ही कामे करुन घेतली जात आहेत. तसेच अशोक यांच्या नावे शासकीय योजनेच्या लाभ रक्कमेतून घेण्यात आलेल्या बकऱ्या (शेळ्या) या आरोपीत यांनी बाहेरून विकत घेऊन फिर्यादीस दिलेल्या आहेत,असे फिर्यादी व त्याच्या पत्नीस सांगुन बकऱ्यांमध्ये आपण भागीदार आहोत असे सांगुन त्या बकऱ्या स्वतःच्या गोठयात ठेवून त्या रानात चारण्याचे काम फिर्यादी याचेकडुन सक्तीने करून घेऊन त्या बकन्यांमधुन दरवर्षी तयार होणारे बोकड / बकऱ्या स्वत: विकुन त्यापैकी फिर्यादीला कोणतीही रक्कम न देता,
जबरदस्तीने बकराच्या चारण्याचे काम करवून घेतो. गेल्या सुमारे १० वर्षापासुन फिर्यादी व वाडीतील इतर आदिवासी कातकऱ्यांना हे दोघे भाऊ त्यांच्याकडे काम असेल तर दुसऱ्या कोणाकडे कामाला जाऊ देत नाहीत.
हे कामावर गेल्यास तुमच्या घरासाठी दिलेल्या जागेचे व घरांचे पैसे अजून फिटलेले नाहीत. तुम्हाला माझ्याकडेच काम करावे लागेल असे सांगत. त्यांनी काम न केल्यास त्यांना मारहाण करीत असत. तसेच त्यांची सर्व कागदपत्रे रेशनकार्ड, बॅकं पासबुक हे या भावांनी स्वतःकडे ठेवून घेतली आहेत असे म्हटले आहे.याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात 3 डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विजय व संजय यांना अटक केली आहे. याप्रकरणी डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे म्हणाले, आरोपी अटकेत असून त्यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 11 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींची चौकशी सुरु असून अधिक तपास केला जात आहे.शुक्रवारी राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी घटनास्थळी जात या कातकरी आदिवासींची तसेच ग्रामपंचायत सरपंच, अधिकारी वर्ग सर्वांची भेट घेत चर्चा केली.
यावेळी आदिवासींकडून त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. त्यांना कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेता येईल याची माहिती दिली. तसेच देण्यात आलेल्या योजना कोणत्या शासकीय नियमाप्रमाणे त्या देण्यात आल्या आहेत का ?
शासकीय योजना लाभांचे त्यांना वाटप झाले आहे का ? याची माहिती घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान यामध्ये आदिवासींची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच अधिकारी वर्गाची देखील चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

0
118 views    0 comment
0 Shares

आतंकी संगठन ISIS की साजिश के खिलाफ राष्ट्रीय जांच एजेंसी (NIA) ने देशभर के 41 जगहों पर एकसाथ बड़ी छापेमारी की है और अभी तक 15 लोगों को गिरफ्तार किया है. महाराष्ट्र में सबसे ज्यादा ठिकानों पर रेड पड़ी है जिसमें ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, पुणे-मीरा भायांदर शामिल हैं. इसके अलावा कर्नाटक में एक जगह छापेमारी चल रही है. सबसे बड़ी बात ये है कि ठाणे में ग्रामीण इलाकों में ये छापेमारी हो रही है.

*जिन लोगों को एनआईए ने गिरफ्तार किया है उनके नाम हैं-*

शाकिब नाचन
हासिब मुल्ला
मुसाब मुल्ला
रेहान सुसे
फरहान सूसे
फिरोझ कुवार
आदिल खोत
मुखलिस नाचन
सैफ आतिक नाचन
याह्या खोत
राफिल नाचन
राझील नाचन
शकूब दिवकर
कासीफ बेलारे
मुंझिर केपि

एनआईए ने छापेमारी के दौरान आतंकियों के अंतरराष्ट्रीय कनेक्शन और विदेशी-आधारित आईएसआईएस हैंडलर्स की भागीदारी के साथ एक बड़ी साजिश का पर्दाफाश भी किया है. एनआईए की जांच में भारत के अंदर आईएसआईएस की आतंकी विचारधारा का प्रचार करने के लिए कटिबद्ध लोगों के एक जटिल नेटवर्क का खुलासा हुआ है.

इस नेटवर्क ने आईएसआईएस के स्वयंभू खलीफा (नेता) के प्रति निष्ठा की शपथ ली और नेटवर्क इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस (आईईडी) भी तैयार कर रहा था. अपने गुर्गों के जरिए इस संगठन का उद्देश्य भारतीय धरती पर आतंकवादी कृत्यों को अंजाम देना था.

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

*अंगावर थरकाप आणणारी अकोला येथील घटना**

*घटनेचा थरकाप दुपारी 4.30 ते रात्री 1.30 वाजेपर्यंत सुरू होता.आरोपी गणेश कुंभरे विरूद्ध भादवी 363, 376, 354, 354ब, 323, 324, 506, 4-8 पोक्सो गुन्हा दाखल*

अकोला... आज दि. 17/11/2023 घडलेली घटना पुढील प्रमाणे.
स्थानिक कैलास टेकडी अकोला येथे एक गरीब कुटुंब राहतो. आई ही मेन्टली डिस्टर्ब आहे. वडील कामावर जातात एक बहीण व एक लहान भाऊ घरी राहत असत. शेजारी राहणारा आदिवासी 29 वर्षीय कुंभरे हा व्यसनाधीन व गुंड प्रवृत्तीच्या असल्याने या 14 वर्षीय मुलीला धमकावून अश्लील चाळे करायचा व या लहान मुलीवर जबरदस्ती करत होता. वडीला त्याला समजावले तरी त्यांना जिवे मारण्याच्या धमकी देत होता. त्यामुळे तक्रार देण्यासाठी घाबरत होते. परंतु 15/11/2023 रोजी विकृत गणेश चंद्रशेखर कुंभरे याने माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडविली. सर्व कामाला व बहीण बाहेर गेल्याने कोणी घरात नसतांना जबरदस्ती करण्यास नकार दिल्याने त्या 14 वर्षीय मुलीला घरातून बाहेर बोलाविले व ओढत ओढत जवळील सिंधी कॅम्प स्मशानभूमीत नेले ती मारले व पुर्णपणे विवस्त्र केले ती रडत होती मला सोडा अशी विनवणी करीत होती तरी गणेश कुंभरे यांने तिच्या हाताला जळत्या शिगारेटचे चटके दिले व मारले हे सर्व प्रकार काही परिसरातील मुलांनी पहिला म्हणून तो तेथून निघून गेला. नंतर पुन्हा दारू पिऊन येऊन घरी जाऊन तिला जबरदस्तीने त्याच्या घरात नेऊन बलात्कार केला व तिचे केस कापले, एवढे नव्हेतर सिंधी कॅम्प मधील सलून मध्ये नेऊन तिचे टक्कल केले. हा सर्व प्रकार संध्याकाळी आई वडिलांना सांगितला पण गरीब कुटुंब असल्याने व मारून टाकण्याची धमकी दिल्याने दोन दिवसांपासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. परंतु आज दि 17/11/2023/ रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व आदरणीय अंजलीताई आंबेडकर हे अकोला येथे असतांना हे प्रकरण वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश महासचिव अरूणधंतीताई शिरसाट यांना माहीत होताच त्यांनी महिला पदाधिकारी यांना माहिती देताच अकोला जिल्हा महिला अध्यक्ष प्रभाताई शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई इंगळे, महानगर अध्यक्षा वंदनाताई वासनिक, समाज कल्याण सभापती आम्रपालीताई खंडारे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे , जिल्हा उपाध्यक्ष तथा मातंग समाज नेते गजानन दांडगे, मातंग युवा नेते गणेश सपकाळ, युवक अध्यक्ष आशिष मांगूळकर, मातंग समाज महिला नेत्या सुनंदाताई चांदणे यांनी तात्काळ पोलीस स्टेशन खदान अकोला येथे जाऊन घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार जाधव यांची भेट घेऊन आरोपी गणेश कुंभरे याला जमा करण्यात आले. मानोरा येथील मिटींग आटोपून अरूणधंतीताई शिरसाट हे पोलीस स्टेशनला पोहचल्या व आरोपीला त्वरीत अटक करुन आरोपी गणेश कुंभरे विरूद्ध भादवी 363, 376, 354, 354ब, 323, 324, 506, 4-8 पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा थरकाप दुपारी 4.30 ते रात्री 1.30 वाजेपर्यंत सुरू होता. रात्री मुलीचे मेडीकल करून बालसुधारगृहात रवानगी केली व आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले त्यानंतरच वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशन सोडलं. जर वंचित बहुजन आघाडीने साथ दिली नसती तर सदर मुलीला न्याय मिळाला नसता व सदर प्रकरण दडपणल्या गेले असते. सर्वांनी सजग व निर्भिड राहणे गरजेचे आहे. कोण आपली मदत करतो हे मातंग समाजानेही समजणे गरजेचे आहे आज वंचित पदाधिकारी नसते तर अनर्थ घडला असता असे मत गजानन दांडगे, सुनंदाताई चांदणे, गणेश सपकाळ यांनी व्यक्त केले

0
0 views    0 comment
0 Shares