logo

Pune News : भरधाव रिक्षा डिव्हायडरवर आदळली, ऑटोचा चक्काचूर; पुण्यात भीषण अपघात Pune Accident News : पुण्यात बावधन-वारजे महामार्गावर पहाटे भीषण अपघात झाला, रिक्षा डिव्हायडरला आदळल्याने चालक गंभीर जखमी झाले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनी चालकाला रिक्षेतून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केलं.

Pune News : भरधाव रिक्षा डिव्हायडरवर आदळली, ऑटोचा चक्काचूर; पुण्यात भीषण अपघात
Pune Accident News : पुण्यात बावधन-वारजे महामार्गावर पहाटे भीषण अपघात झाला, रिक्षा डिव्हायडरला आदळल्याने चालक गंभीर जखमी झाले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनी चालकाला रिक्षेतून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केलं.
Updated: 21 Jul 2025, 11:39 am
अभिजित दराडे, पुणे : पुणे शहराच्या पश्चिमेकडील बावधन ते वारजे दरम्यानच्या महामार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला. वेद विहार परिसरात भरधाव वेगाने जाणारी रिक्षा अचानक रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात रिक्षाचालक रिक्षामध्ये अडकून पडल्याने एकच खळबळ उडाली होती.अपघात झालेली रिक्षा (क्रमांक MH 12 QR 4621) इतकी चिरडली गेली होती की चालक गणेश कोळसकर (वय ३५) यांना बाहेर काढणं अत्यंत कठीण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच वारजे फायर स्टेशन आणि NDA अग्निशमन केंद्रातील रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं.

5
47 views