|
|
म मराठीचा नाही
म मराठीचा नाही
म मराठीचा नाहीं इयत्ता पहिली पाच वर्ष वयाच्या चिमुरड्याना हिंदी भाषा अनिवार्य केल्या मुळे मराठीला कसा धोका पोहचतो, मराठी धोक्यात कशी येते 2020 साली देशात नवीन राष्ट्रीय धोरण आले उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना नवीन धोरणानुसार त्रीसूत्री भाषा अंमलबजावणी साठी डॉ रघुनाथ मशेलकर यांच्या अध्यक्षते खाली एका अभ्यास गटाची टास्क फोर्सची स्थापना केली त्यात उबाठा शिवसेनेचे उपनेते वाघ सामील होते डॉ मशेलकर समितीने आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला असताना देखिल उद्धव म्हणतात की मशेळकर अहवाल मी बघितलाच नाहीं, माझ्याकडे आलाच नाहीं मशेलकर अहवालात मातृभाषा मराठी, इंग्रजी हिंदी हया पहिलीपासून अनिरवर्य कराव्या फडणवीस सरकारने तसा जी आर काढला दरम्यान महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीत उद्धव व राज हया दोन भावांनी एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली सर्व प्रथम राज यांनी मराठी आणि मराठी माणसा साठी एकत्र येण्यास होकार दिला मराठी माणसात उत्साह भरला बॅनरबाजी, पोष्टर बाजी सुरु झाली हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात राज ठाकरे यांनी दिनांक 6 जुले रोजी गिरगाव चौपाटी येथून मोर्चा जाहीर केला तर उद्धव यांनी आझाद मैदानात आंदोलन पुकारले नंतर दोघा भावांनी एकत्र मोर्चा काढावा असे ठरले किंवा आधीच ठरले असेल राज आणि उद्धव यांनी 5 जुले रोजीचा मोर्चा निश्चित केला राज आणि फडणवीस यांची हॉटेल ताज मध्ये भेट झाली तासभर खळबतें झाली हिंदीच्या सक्तीला विरोध झाला फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतला, रद्द केला प्रश्न मिटला पण तसे झाले नाहीं जी आर मागे घेतल्याचा विजयी मेळावा वरळी डोम सभागृहात साजरा करण्याचे ठरले जिथे पूर्वी फ्रिस्टाईल कुस्त्या होत होत्या हिंदी सक्तीचा विषय मिटला होता परंतु हिंदी मराठी वादाला प्रांतवाद, मराठी विरुद्ध अमराठी असे स्वरूप देण्याचा जाणून बुजून प्रयत्न झाला सुरवातीला मारवाडी गुजराथी टार्गेट होते नंतर मराठी विरुद्ध अमराठी असे स्वरूपआले त्याचा परिणाम फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्राची संपूर्ण देशात बदनामी झाली आज ही चर्चा संपूर्ण देशभर पसरली आहे उद्धव, राज यांना मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याची आहे तर त्यांना बिगर मराठी मते नको आहे का केवळ मराठी मतांवर निवडून जायचे आहे हिंदुत्वाला विरोध म्हणून, मोदी शहा भाजपाला पराभूत करण्यासाठी मुस्लिम मते उद्धव, राज यांना मते देतीलही परंतु महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या ते पचणी पडेलका मराठी आणि मुसलमान हे समीकरण स्वीकारले जाईल का असे प्रश्न निर्माण होत आहे मुंबई जागतिक दर्जाचे शहर, जागतिक व्यापारचे केंद्र देशाची आर्थिक राजधानी देशातल्या हरेक प्रांतातला माणूस मुंबईत दिसतो मुंबई ही देशाची प्रतिकृती असे आपण समजतो अश्या मुंबई शहराच्या निवडणुका भाषेच्या आधारावर, मुस्लिम मतांच्या भरवश्यावर लढणे गैर, चुकीचे आत्मघातकी आहे उद्धव साहेब गेली पंचवीस वर्ष मुंबई मनपा आपल्या हातात होती, मुंबईतील मराठी माणसाचे म्हणून ज्या काही समस्या आहे काही प्रश्न आहे त्यास आपण सर्व मराठी जबाबदार आहोत त्याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे चार दोन कामगार, कर्मचारी, फेरीवाले, दुकानदारांना मारून मराठी माणसाचे प्रश्न सुटणार नाहीं गिरणी संपा मुळे मुंबईतला, गिरणगावातला मराठी माणूस उध्वस्त झाला तेंव्हा आपण मराठी काय करीत होतो गिरणी संप संपुष्ठात आणण्यासाठी आपण काय केले गिरणी मालकांनी गिरण्याच्या जमिनी विकल्या लाखो, करोडो रुपये कमविले उंच उंच टॉवर बांधले त्या टॉवर मध्ये एकही मराठी राहतोका सरकारकडून कवडीमोल किमतीत घेतलेल्या गिरण्याच्या जमिनी मालकांनी विकल्या आज त्याचं गिरणी कामगारांची दुसरी पिढी घरे मिळविण्यासाठी वनवणं भटकत आहे विनाअनुदान शिक्षण धोरण महाराष्ट्रात आले शिक्षणाचा बाजार झाला गल्ली बोळात इंजिनियरिंग, मेडिकल कॉलेज सुरु झाले पैसा फेको तमाशा देखो मेडिकलला पंचवीस लाख इंजिनियरिंगसाठी दहा लाख, बी एड, डी एड साठी कमीत कमी पाच लाख मोजल्याशिवाय प्रवेश मिळत नाहीं आज पहिली इत्तेच्या हिंदीच्या सक्ती विरोधात पेटून उठलेले कीती पक्ष, संघटना शिक्षणाच्या बाजारीकरणं विरोधात उभे राहिले होते परप्रांतीयना मारायचे आहे तर आजही लाखो परप्रांतीय तरुण पुणे, नाशिक, लातूर, नांदेड, संभाजीनगर येथे शिक्षणाच्या बाजारात पैसे मोजून शिक्षण घेत आहे ठोकणार का त्यांना उद्धव साहेब झोपू SRA योजना हे मॉं साहेब मीनाताईचे स्वप्न झोपडपट्टी वासियांना मोफत घरे हया योजनेमुळे सर्वात जास्त मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला याला कारण आपले बिल्डर धार्जीने धोरण विमल शहा आकृती बिल्डर आपलीच निर्मिती शेकडो मराठी कुटुंबे उध्वस्त केली विमल शहा याने मुंबई जिंकण्याची असेल तर प्रथम मुंबईकरांची मने जिंकावी लागेल, मारहाण करून, शटर फोडून, काचा फोडून मने जिंकता येणार नाहीं तानसेन ननावरे युनायटेड रिपब्लिकन पार्टी
Read More
|
|
|