logo

Pune News : 'जंगली रम्मीतले माणिकमोती! ना शेतमालाला हमी, कृषीमंत्रीच खेळतंय रम्मी'; शरद पवार गटाची पुण्यात बॅनरबाजी Pune Marwathi News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) विरुद्ध अजित पवार गट यांच्यात तणाव वाढला आहे. लातूरमधील मारहाणीच्या घटनेनंतर, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचे नेते सुरज चव्हाण आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे.

Pune News : 'जंगली रम्मीतले माणिकमोती! ना शेतमालाला हमी, कृषीमंत्रीच खेळतंय रम्मी'; शरद पवार गटाची पुण्यात बॅनरबाजी
Pune Marwathi News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) विरुद्ध अजित पवार गट यांच्यात तणाव वाढला आहे. लातूरमधील मारहाणीच्या घटनेनंतर, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचे नेते सुरज चव्हाण आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे.आदित्य भवार, पुणे : पुणे हे राजकारणाचं महत्त्वाचं केंद्र आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विरुद्ध अजित पवार गट अशी थेट रणभूमी तयार होताना दिसत आहे. कारण, लातूरमध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर पुण्यात अजित पवार गटातील प्रमुख नेते सुरज चव्हाण आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात बॅनरबाजी करत थेट इशारे देण्यात आले आहेत.शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून "सुरज चव्हाणला पुण्यात येऊ देणार नाही" असा स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आलं आहे. त्या सोबत बॅनर पुण्यात लावण्यात आला आहे. हा बॅनर संदीप शिकांत काळे या कार्यकर्त्याने लावल्याचं समोर आलं आहे. या बॅनरवर सुरज चव्हाण आणि माणिकराव कोकाटे यांचे व्यंगात्मक फोटो छापून जोरदार टीका करण्यात आली आहे.

1
47 views