logo
logo
(Trust Registration No. 393)
aima profilepic
Popat gulab kamble
All India Media Association

‘डीजे’ च्या दणदणाटामुळे तीन जणांचा मृत्यू............

सांगलीत २, तर पुण्यात १ गोंगाट बळी

मुंबई: मोठ्या आवाजात डीजे लावायला बंदी असली तरी अलीकडे सण-उत्सवात पुन्हा डीजेचा दणदणाट ऐकायला मिळतो. त्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण केवळ त्रासदायकच नव्हे, तर जीवघेणेही ठरत आहे. डीजेच्या दणदणाटी आवाजामुळे त्रास होऊन सांगलीत २ आणि पुण्यात एक तरुण मरण पावला.

विसर्जनाची मिरवणूक बघायला गेलेल्या कवठेएकंद (ता. तासगाव) येथील शेखर सुखदेव पावशे (वय ३२) याचा आवाज सहन न झाल्याने हृदयाचे ठोके बंद पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. दरम्यान, दुसरी घटना वाळवा तालुक्यातील दुधारी येथे घडली. प्रवीण शिरतोडे (वय ३५) असे डीजेच्या आवाजामुळे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
शेखर सुखदेव पावशे याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली असतानाही तो गावात सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीत गेला. मिरवणुकीत डीजे लावण्यात आला होता. या मिरवणुकीत तो सहभागी झाला होता. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीतून रात्री १० च्या सुमारास जात असताना मोठ्या आवाजामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले. बसस्थानक परिसरात जाईपर्यंत त्याचा त्रास अचानक वाढला. दरम्यान घरी येताच तो चक्कर येऊन पडला. त्याच्या छातीत वेदना होत असल्याचे त्याने सांगितल्याने त्याला तातडीने तासगावला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सेंट्रिंग व्यावसायीक प्रवीण यशवंत शिरतोडे सोमवारी काम करून घरी आला. यानंतर तो गावातील विसर्जन मिरवणुकीत गेला.या ठिकाणी देखील डीजेचा मोठा दणदणाट सुरू होता. या आवाजात तो त्याच्या मित्रांसोबत नाचत होता. दरम्यान, त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तो चक्कर येऊन पडला. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, उपचारपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, पुण्यात हिंजवडीतील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला.
योगेश अभिमन्यू साखरे (वय २३, रा.मारुती मंदिरासमोर, हिंजवडी गावठाण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी हिंजवडीतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. योगेश हा हनुमान तालीम मित्र मंडळाचा कार्यकर्ता होता. मिरवणुकीमध्ये नृत्य करताना डीजेच्या आवाजाने त्याला चक्कर आली, असे सांगितले जाते. पोलिसांनी मात्र डीजेच्या आवाजामुळे त्याचा बळी गेलेला नाही असा दावा केला.
दरम्यान, मे महिन्यात श्रीगोंदा तालुक्यातील (जिल्हा नगर) एका शिक्षकाला डीजेच्या आवाजामुळे जीव गमवावा लागला. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीतील डीजेच्या आवाजामुळे त्रास झाल्याने अशोक बाबूराव खंडागळे (५८)हे शिक्षक कोमात गेले नंतर मरण पावले.

..........
99
2225 views    0 comment
2 Shares

इस्कॉन आपल्या गोशाळेतील गायी कसाईंना विकते.........

मनेका गांधी यांचा सनसनाटी आरोप

नवी दिल्ली: भाजप खासदार मनेका गांधी यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) वर हल्ला चढवला. त्यांनी इस्कॉनचे वर्णन देशातील ‘सर्वात मोठी फसवणूक करणारी’ संस्था असे केले आहे. इस्कॉन आपल्या गोशाळेतील गायी कसाईंना विकत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, इस्कॉननेही या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी हे आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि प्राणी हक्क कार्यकर्त्या मनेका गांधी या सोशल मीडियावर प्राण्यांच्या कल्याणाच्या मुद्द्यांवर आवाज उठवत आहेत. व्हिडिओमध्ये मनेका असे म्हणताना ऐकू येत आहेत.
मनेका गांधी या सोशल मीडियावर प्राण्यांच्या कल्याणाच्या मुद्द्यांवर आवाज उठवत आहेत. व्हिडिओमध्ये मेनका हे सांगताना ऐकू येत आहेत की, इस्कॉन ही भारतातील सर्वात मोठी फसवणूक करणारा आहे. त्यांनी गायींचे आश्रयस्थान स्थापन केले, ते चालवण्यासाठी त्यांना शासनाकडून अगणित लाभ मिळतात. त्यांना मोठ्या जमिनी मिळतात.
गोठ्याला भेट देण्याबाबतचा दावा
त्यांनी आंध्र प्रदेशातील इस्कॉनच्या गोठ्याला दिलेल्या भेटीची आठवण झाली. त्या म्हणाल्या की, नुकतीच त्यांनी अनंतपूर गोशाळेला भेट दिली होती. तेथे एकही भाकड गाय सापडली नाही. सर्व डेअरी आहेत. तेथे एकही वासरू नाही. याचा अर्थ प्रत्येक भाकड गाय विकली गेली आहे.

..........
154
4954 views    0 comment
1 Shares

77
5040 views    0 comment
1 Shares

मान्सूनची माघार होण्यास १३ ते २२ दिवस उशीर होणार.................

परतीचा प्रवास ३० सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान

नवी दिल्ली: सामान्यतः, देशातील नैऋत्य मोसमी वारे १७ सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करतात, परंतु या हंगामात आत्तापर्यंत पुनरागमन होण्याची शक्यता नाही आणि पाऊस ऑक्टोबरपर्यंत वाढू शकतो. मान्सूनच्या पावसाने उशिरा माघार घेण्याचे हे सलग १३ वे वर्ष आहे.

२१ ते २७ सप्टेंबर अखेर मान्सूनची माघार सुरू होईल, असे संकेत हवामान खात्याने २१ सप्टेंबर रोजी दिले होते. त्याचवेळी, ३० सप्टेंबरपर्यंत देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, तो ९० ते ९५ टक्के दरम्यान असेल.
जून ते सप्टेंबर या काळात पावसाळ्यातील सर्वसाधारण सरासरी ८६८.८ मिमी असते. इंडियन मेटराॅलाॅजी डिपार्टमेंट, IMD नुसार, २१ सप्टेंबरपर्यंत देशातील एकूण पाऊस सात टक्क्यांनी कमी झाला होता. ३६ टक्के जिल्ह्यांमध्ये एकतर कमी (सामान्यपेक्षा २० ते ५९ टक्के कमी) किंवा जास्त (सामान्यपेक्षा ५९ टक्क्यांहून अधिक) पाऊस पडला आहे.
जर्मनीतील पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्चच्या हवामान शास्त्रज्ञ एलेना सुरोवायत्किना यांच्या अंदाजानुसार, वायव्य भारतातून मान्सूनची माघार ३० सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान सुरू होऊ शकते. याचा अर्थ देशाच्या उत्तर-पश्चिम भागात मान्सून माघार घेण्यास १३ ते २२ दिवस उशीर होणार आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे येथील हवामान अभ्यासाशी संबंधित तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यावेळी आर्क्टिक समुद्रातील बर्फाचा मोठा फटका बसला आहे. याशिवाय, उत्तर गोलार्ध, विशेषत: उष्णकटिबंधीय अटलांटिक, बरेच उबदार राहिले. या परिस्थितींनी ‘इंटरट्रॉपिकल कन्वर्जेंस झोन’ ​​उत्तरेकडे खेचले आहे आणि अल निनो पॅटर्न हे पश्चिम पॅसिफिकमधील ग्लोबल वार्मिंगचे सूचक आहे.

..........
90
1157 views    0 comment
1 Shares

‘बेटा, मी चहा विकायचो. मला काय व्हायचे ते कळतच नव्हते’..................

अटल निवासी शाळेतील मुलांशी पंतप्रधान मोदींची प्रश्नोत्तरे=======================

लखनौ : मोदी सर, तुम्हाला लहानपणी काय बनायचे होते? अटल निवासी शाळेतील सहावीत शिकणाऱ्या आकाश कुमारच्या प्रश्नाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्चर्यचकित झाले, तेव्हा त्यांनी हसत उत्तर दिले आणि म्हणाले की बेटा, मी चहा विकायचो. मला काय व्हायचे ते कळत नव्हते. यावेळी मुलांची प्रतिभा पाहून पंतप्रधान मोदी प्रभावित झाले.
रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीसह राज्य १११५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या १६ अटल निवासी शाळांचे उद्घाटन केले. मग एका हॉलमध्ये शाळेतील मुलांना भेटले आणि संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी मुलांसोबत अभ्यास केला व माहिती घेतली.पंतप्रधान मोदींनी मुलांना प्रश्नही विचारले.
दरम्यान मुलांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. याचा उल्लेखही पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केला. मुले माझ्याशी ज्या पद्धतीने बोलली त्यावरून त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल निवासी शाळेतील २० मुलांशी संवाद साधला. यामुळे मुले खूप आनंदी आणि उत्साही दिसत होती. सहावीत शिकणाऱ्या रामेश्वरी या विद्यार्थिनीने पंतप्रधान मोदींना विचारले की तुम्हाला तुमच्या कुटुंबावर प्रेम आहे की जनतेवर? पंतप्रधान हसले आणि म्हणाले ‘बेटा मी माझ्या कुटुंबावर प्रेम करतो.’ तुम्ही नेहमी स्वच्छतेबाबत बोलता, या मागचा हेतू काय? असा सवाल विकास यादव यांनी केला. पंतप्रधानांनी उत्तर दिले, ‘स्वच्छता मनाची किंवा समाजाची आवश्यक आहे. म्हणूनच मी नेहमी स्वच्छतेबद्दल बोलतो.’
सुनैना हिला घर आवडते की हॉस्टेल, असे मोदी यांनी विचारले. त्यावर मला हॉस्टेलमध्ये राहायला आवडते. वसतिगृहात सर्व कामे वेळेवर करावी लागतात, असे असे उत्तर आले. यावर
मोदींनी मोठ्याने हसून सुनैनाचे अभिनंदन केले.
सुजाताला विचारले की कोणती भाजी खायला आवडते. उत्तर सर्व भाज्या होते. तिला कोणता खेळ आवडतो असे आकृतीला विचारले. तिने बॅडमिंटन आवडते असे सांगितले. पंतप्रधानांनी विचारल्यावर आकृतीने तिच्या आवडत्या खेळाडूचे नाव सांगितले, सायना नेहवाल. त्यावेळी सर्वांचे चेहरे उजळले.

..........
110
5174 views    0 comment
1 Shares

कल्याण - आरटीओ कार्यालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत.................

जुने कार्यालय अडचणीच्या ठिकाणी असल्याने रहदारीच्या रस्त्यावर वाहनांची तसेच अनधिकृत एजंटच्या टपन्यांनी जागा व्यापून टाकली आहे. कार्यालय गैरसोयीचे ठरत असल्याने शासनाने उंबर्डे या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी निधी देत उभे केले आहे. नवीन इमारतीचे काम संपून सहा महिन्याचा कालावधी उलटूनही उद्घाटनाअभावी कार्यालय सुरू होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे जुने आरटीओ कार्यालयात पावसाने गळती असल्याने अनेक जुने रेकॉर्ड ही भिजलेल्या अवस्थेत पडल्याचे दिसून येते

कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गेल्या सहा महिन्यापासून उद्घाटनाअभावी उपयोगात आणले गेले नाही. जुने कार्यालय बिर्ला महाविद्यालयाच्या मागील बाजूस अनेक चाळीत विभागले गेल्याने आरटीओच्या विविध कामासाठी येत असणाऱ्या नागरिकांना वेगवेगळ्या खिडक्यांवर जावे लागत आहे. यामुळे नागरिक कमालीचे नाराज झाले आहेत. कल्याण पश्चिम येथील उंबर्डे येथे शासनाने नवीन इमारतीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारल्याच्या घटनेला सहा महिन्याचा कालावधी उलटून आहे. गेला आहे. इमारतीत किरकोळ फर्निचर तसेच फायर यंत्राचे टेंडर निघण्यास वेळ काढूपणा दाखविला गेला असल्याने नवीन इमारत वापराविना पडल्याचे दिसून येऊ लागले आहे. टेंडर निघत नसल्याने उद्घाटनाला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे.

बिर्ला महाविद्यालयानजिक असलेले
शासनाने लाखो रुपयांचा निधी देत आरटीओ कार्यालय उभे केले आहे. गेल्या सहा महिन्यापासून ते धूळखात पडून आहे. याबाबत परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी विनोद साळवी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

..........
88
1960 views    0 comment
0 Shares

निकटवर्तीयांना अटक करण्यासाठी पोलिसांची संपूर्ण पंजाबात कारवाई..............

पंजाब: गोल्डी ब्रारच्या निकटवर्तीयांना अटक करण्यासाठी पोलिस आज राज्यभर कारवाई करत आहेत. मोगा, फिरोजपूर, तरनतारन आणि अमृतसर ग्रामीण भागात पोलिसांचे छापे सुरू आहेत. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचा आरोप असलेला ब्रार कॅनडामध्ये लपला आहे.
ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्रांची तस्करी असे सुमारे १३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस आहे आणि तो भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांतील कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकाऱ्यांना हवा आहे.
गँगस्टर गोल्डी ब्रारच्या जवळच्या साथीदारांना अटक करण्यासाठी पंजाब पोलिसांनी गुरुवारी राज्यभर छापे टाकले. मोगा, फिरोजपूर, तरनतारन आणि अमृतसर ग्रामीण भागात पोलीस कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी मुक्तसर येथील गँगस्टर गोल्डी ब्रारच्या नातेवाईक आणि मित्रांच्या घरांवर छापे टाकले. त्यांच्याकडे गुंडाची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर गोल्डी ब्रारच्या जवळचे जे तुरुंगात आहेत किंवा जामिनावर आहेत त्यांचेही अहवाल घेतले जात आहेत. सकाळपासून पोलिसांची कारवाई सुरू आहे.

पंजाब पोलीस गोल्डी ब्रार आणि रिंडाला भारतात आणणार....

..........
156
5848 views    0 comment
1 Shares

* नाशिक- नांदगाव तालक्यातील साकोरा गावात जातीयवादी गावगुंडाकडून बौध्द तरुणावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला..............!*

मौजे साकोरा तालुका नांदगाव येथील अमोल दौलत निकम ह्या मोल मजुरी करणाऱ्या तरुणास तू माझे दुकान सोडून दुसऱ्याकडे का कामाला गेलास?
*"साल्या महारड्या शेवटी तू जातीवरच गेलास"*
असे जातीवाचक शब्द उच्चारुन अशोक बाळासाहेब बोरसे या मनुवाद डोक्यात भिनलेल्या जातियवादी गावगुंडांनी अमोल दौलत निकम यांस जिवघेणी अमानुष मारहाण केली. त्यावेळी त्यांचा मुलगा अनिकेत अशोक बोरसे याने लोखंडी गज आणून दिला तेव्हा त्या गजाने अमोल निकम या बौध्द तरुणाच्या डोक्यात वार करून तो मेला असे समजून, काही मदतीला धावलेल्या लोकांना *एक महार मारलाय तुम्हालाही मरायच का ? तुम्हाला दाखवतो पाटलाचा हिसका!*
असे म्हणून निघून गेला.
त्यावेळी काही बौध्द तरुणांनी त्याच्या नातेवाईकांना फोन केला तेव्हा ते मळ्यातून आल्यावर त्यांनी त्यास नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अमोल दौलत निकम यांस उपचारार्थ भरती केले.
रूग्णालयात सदर तरुण बेशुद्ध अवस्थेतच असल्याने त्याची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी मालेगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.
पोलीसांनी अद्यापपर्यंत कुणावरही कुठलीच कारवाई केली नाही.
पोलीसही जातीयवादी गावगुंड पाटलास पाठीशी घालून,गंभीर प्रकरण दडपण्याचा प्रयत्नात आहेत की, काय?असा संशय व संताप जनमाणसात उफाळल्यामुळे
इतका गंभीर प्रकार घडलेला असतांनादेखील
"सद् रक्षणाय खल निग्रणाय" ह्या ब्रिद वाक्याचे व्रत घेतलेले.
खाकी वर्दीतील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी काहीच कारवाई न करता बघ्याची भुमिका घेत आहेत.
पोलीस प्रशासन कर्तव्यदक्षतेने,
काहीच कारवाई करत नसल्याने,
ते आरोपींना पाठीशी तर घालत नाही ना ?
अशी दाट शंका सामान्य नागरिकांच्या मनात उत्पन्न झालेली आहे.
यावेळी रिपाइं नेते कैलासभाई पगारे यांनी नांदगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांना सबंधित जातीवादी गावगुंड अशोक बोरसे याच्यावर अनु.जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम ३(१) r, कलम३(१)s तसेच भा. द.वी.कलम ३०७, ३२६,५०४,५०६, अंतर्गत त्वरित कारवाई करून त्याला त्वरित अटक करा अशी मागणी केली असून, *पोलीसांनी रितसर गुन्हा दाखल करून संबंधितावर अमानुष गावगुंड पाटलासह त्याच्या सहका-यावर कुठलीही कठोर कारवाई मुळीच न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल.*. असा गंभीर इशारा पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांना,अन्याय अत्याचारा विरूध्द लढणारे रिपाइंचे विचारवंत अभ्यासू, कर्तव्यदक्ष झुंजार पँन्थर नेते कैलासभाई पगारे यांनी पोलीस प्रशासनास दिलेला आहे. याप्रसंगी रिपाइं नेत्या जयश्रीताई वाघ, सचिन वाघ,मालेगाव युवा शहर अध्यक्ष सुशिलभाऊ उशिरे , बिपिन निकम, दतू निकम , भाऊसाहेब निकम आदी महिला पुरुष कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

..........
214
16956 views    0 comment
1 Shares

चकमकीत बळी गेलेल्या जवानांची संख्या आता चार................

अनंतनागच्या गांडुल जंगलात आणखी दोन मृतदेह सापडले

श्रीनगर : ऑपरेशनच्या सहाव्या दिवशी सोमवारी दक्षिण काश्मीरमधील अनंतनागच्या गांडुल जंगलात आणखी दोन मृतदेह सापडले. यातील एक मृतदेह चकमकीच्या पहिल्याच दिवशी बेपत्ता झालेल्या सैनिक प्रदीप यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

दरम्यान, रविवारी दहशतवाद्यांच्या अड्ड्यात सापडलेल्या जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी लष्कर दहशतवादी उझैर अहमदच्या कुटुंबीयांकडून नमुने घेण्याची तयारी पोलीस करत आहेत. सुरक्षा दलांचा असा विश्वास आहे की हा मृतदेह ए प्लस श्रेणीतील दहशतवादी उझैरचा असू शकतो जो दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर गोळीबार करताना मारला गेला होता.
सोमवारी सकाळी पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला, जो काही वेळाने शांत झाला. यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहिमेदरम्यान दोन मृतदेह बाहेर काढले. बुधवारी झालेल्या चकमकीच्या पहिल्या दिवशी लष्कराचे दोन जवान बेपत्ता झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, त्यापैकी एक प्रदीप होते. त्यामुळे या चकमकीत बळी गेलेल्यांची संख्या आता चार झाली आहे. त्यापैकी १९ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग अधिकारी होते. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनचक, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हुमायून भट आणि लष्करातील शिपाई प्रदीप यांचा समावेश आहे. दोन मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.
यातील एक मृतदेह दहशतवादी उझैर अहमदचा असल्याचे समजते. अधिकाऱ्यांनी सांगितले की सुरक्षा दल घनदाट जंगल क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टर वापरत आहेत, ज्यामध्ये अनेक गुहेसारखी लपलेली ठिकाणे आहेत जिथे बुधवारपासून दहशतवादी लपले आहेत.

..........
122
3102 views    0 comment
1 Shares

आठ जणांचा मृत्यू
४० प्रवाशांना वाचवण्यात यश.............

चंदीगड : पंजाबमधील मुक्तसरमधील कोटकपुरा रोडवरील झबेलवली गावाजवळ एका खासगी कंपनीची बस सरहिंद कालव्यात पडली. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. तर १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ४० प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे.

अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघाताच्या वेळी बसमध्ये ६०-६५ प्रवासी होते. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. बस मुक्तसरहून कोटकापुराच्या दिशेने जात होती. अपघाताच्या वेळी बसचा वेग जास्त होता, असे सांगण्यात येत आहे. कालव्याच्या काठावर लावलेली लोखंडी ग्रील तोडून बस कालव्यात पडली.
एसएसपी हरमनबीर सिंग गिल आणि विविध पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. विभागीय आमदार जगदीपसिंग काका ब्रार हेही घटनास्थळी पोहोचले आहेत.

..........
231
8287 views    0 comment
1 Shares

शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना अंतिम मुदत..............

सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणासाठी पुन्हा एकदा मोठी बातमी येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना अंतिम मुदत देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.

निर्णय घेण्यास होत असलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त करत मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे.
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ५६ आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर आठवडाभरात सुनावणी घेण्यास सांगितले आहे. अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार सभापती कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करू शकत नाहीत. न्यायालयाच्या निर्देशांचा आदर करण्याची भावना असली पाहिजे , असे न्यायालयाने म्हटले आहे. घटनापीठाच्या निर्णयाचा संदर्भ देत सरन्यायाधीशांनी विचारले की, ११ मेच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर सभापतींनी काय केले? या प्रकरणात दोन्ही पक्षांसह एकूण ३४ याचिका प्रलंबित असल्याचेही खंडपीठाने सांगितले. निकालात सभापतींना अपात्रतेच्या याचिकांवर वाजवी कालावधीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

..........
74
2784 views    0 comment
0 Shares

देव आनंदच्या ‘गाईड’ पिक्चरवरुन मिळाली होती नरेंद्र मोदींना प्रेरणा.................

लहानपणी मित्र 'एनडी' नावाने पुकारत

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठे झाल्यावर सैन्यात भरती व्हायचे होते. नरेंद्र मोदींच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्यांना लहानपणी जामनगरमधील सैनिक शाळेत शिकण्याची इच्छा होती, परंतु पैशाअभावी ते होऊ शकले नाही. आज मोदींचा ७३ वा वाढदिवस आहे.

पंतप्रधान मोदी एका मुलाखतीत म्हणाले होते, ‘एकदा मी माझ्या मित्र आणि शिक्षकांसोबत आर के नारायण यांच्या कादंबरीवर आधारित ‘गाईड’ हा प्रसिद्ध हिंदी चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. चित्रपटानंतर माझे मित्रांसोबत खूप वाद झाले. मी असा युक्तिवाद केला की चित्रपटाची मूळ थीम ही होती की शेवटी प्रत्येकजण आपापल्या विवेकाने समाजाला मार्गदर्शन करतो. पण मी लहान होतो, माझ्या मित्रांनी मला गांभीर्याने घेतले नाही.
नरेंद्र मोदी यांचे प्रारंभिक शिक्षण वडनगर येथील बीएन हायस्कूलमधून झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ९ वी, १० वी आणि ११ वीच्या वर्गात संस्कृत शिकवणारे शिक्षक प्रल्हाद पटेल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘मी नरेंद्रला नरिया म्हणत असे. वर्गात खरे बोलायला तो कधीच घाबरला नाही. तो खोडकर तर होताच पण सर्व शिक्षकांचा आदरही करत असे.’
पंतप्रधानांचे बालपणीचे मित्र जासूद भाई यांनी मीडियाला सांगितले होते की, ‘लहानपणी आमचे सर्व मित्र त्यांना एनडी म्हणायचो. तो मुख्यमंत्री असतानाही आमची भेट झाली. मी त्याला एनडी हाक मारली तेव्हा तो हसला. ,

..........
84
3995 views    0 comment
1 Shares

*डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक (इंदुमिल) येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांनी एम एम आर डी ए , सामाजिक न्याय विभाग,व रुस्तमजी पालनजी कंपनी* *च्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी इंदू मिल दादर या ठिकाणी घेतली.*

*या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय सचिव मा. दयाल बहादूरे, मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. सिध्दार्थ कासारे, मुंबई प्रदेश सरचिटणीस मा. विवेक पवार, महाराष्ट्र मराठी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व जनराष्ट्रीय रेलवे कर्मचारी युनियनचे राष्ट्रीय महासचिव दिपक काळींगण यांसह पक्षाचे जेष्ठ नेते व मान्यवर सदस्य उपस्थित होते.*

..........
124
3481 views    0 comment
1 Shares

न्यायाधीशाचे निलंबन - खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला नियमबाह्य जामीन, धाराशिव येथील घटना...........................उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई - जिल्हा प्रमुख न्यायाधीश यांनी घेतला होता स्वतः पुढाकारधाराशिव (उस्मानाबाद)खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला नियमबाह्य रित्या जामीन देण्यासह विविध तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा व सत्र न्यायाधीश गोपाळ अग्रवाल यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असुन त्यांची प्रशासकीय चौकशी सुरु आहे. नळदुर्ग येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन दिला होता तो उच्च न्यायालयाने नामंजूर करीत ताशेरे ओढले त्यानंतर अग्रवाल यांचे निलंबन करण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे.न्यायाधीश, सरकारी वकील यांनी संगणमत करुन उच्च न्यायालयाने जामीन बाबत काही लेखी सुचना व आदेश दिलेले असतानाही ते आदेश बाजूला ठेवून अग्रवाल यांनी खुनातील आरोपीला जामीन दिली. प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजु शेंडे यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी स्वतः पुढे येऊन आरोपीचा जामीन स्वीकारण्याचे नाकारले त्यानंतर आरोपीने त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले, तेव्हा उच्च न्यायालयाने प्रमुख न्यायाधीश शेंडे यांनी स्वतः घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करीत न्यायाधीश, सरकारी वकील यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले.  कायद्याचा व दिलेल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत कोर्टाने ठरवून दिलेल्या नियमावलीचा वापर न करता जामीन मंजुर केला, न्यायाधीश व सरकारी वकील यांनी त्यांना ठरवून दिलेली जबाबदारी पार न पाडता काही बाबीकडे हेतूत दुर्लक्ष केले जे की कायद्याला व न्याया यंत्रणेला अपेक्षित नाही, ही गंभीर बाब असून यासह अन्य बाबीवर उच्च न्यायालयाने आदेशात कडक शब्दात ताशेरे ओढले व आरोपीची जामीन नामंजूर केली.न्यायाधीश व सरकारी वकील यांचे चौकशी प्रास्तावित केली असुन त्यादृष्टीने कारवाई सुरु आहे. उच्च न्यायालयाने कारवाई करण्यासाठी हे प्रकरण चिफ जस्टीस (मुख्य न्यायाधीश) व विधी व न्याय विभागाचे मुख्य सचिव यांच्याकडे पाठविले आहे. एखाद्या न्यायाधीश यांना निलंबित करण्याची राज्यातील तसेच धाराशिव जिल्ह्यातील ही दुर्मिळ घटना आहे. मा न्यायालय, न्याय व्यवस्था व न्यायाधीश यांची प्रतिमा मलिन करण्याचा या बातमीतून कोणताही हेतू नाही.

..........
23
1651 views    0 comment
1 Shares

न्यायाधीशाचे निलंबन - खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला नियमबाह्य जामीन, धाराशिव येथील घटना...........................उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई - जिल्हा प्रमुख न्यायाधीश यांनी घेतला होता स्वतः पुढाकारधाराशिव (उस्मानाबाद)खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला नियमबाह्य रित्या जामीन देण्यासह विविध तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा व सत्र न्यायाधीश गोपाळ अग्रवाल यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असुन त्यांची प्रशासकीय चौकशी सुरु आहे. नळदुर्ग येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन दिला होता तो उच्च न्यायालयाने नामंजूर करीत ताशेरे ओढले त्यानंतर अग्रवाल यांचे निलंबन करण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे.न्यायाधीश, सरकारी वकील यांनी संगणमत करुन उच्च न्यायालयाने जामीन बाबत काही लेखी सुचना व आदेश दिलेले असतानाही ते आदेश बाजूला ठेवून अग्रवाल यांनी खुनातील आरोपीला जामीन दिली. प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजु शेंडे यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी स्वतः पुढे येऊन आरोपीचा जामीन स्वीकारण्याचे नाकारले त्यानंतर आरोपीने त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले, तेव्हा उच्च न्यायालयाने प्रमुख न्यायाधीश शेंडे यांनी स्वतः घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करीत न्यायाधीश, सरकारी वकील यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले.  कायद्याचा व दिलेल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत कोर्टाने ठरवून दिलेल्या नियमावलीचा वापर न करता जामीन मंजुर केला, न्यायाधीश व सरकारी वकील यांनी त्यांना ठरवून दिलेली जबाबदारी पार न पाडता काही बाबीकडे हेतूत दुर्लक्ष केले जे की कायद्याला व न्याया यंत्रणेला अपेक्षित नाही, ही गंभीर बाब असून यासह अन्य बाबीवर उच्च न्यायालयाने आदेशात कडक शब्दात ताशेरे ओढले व आरोपीची जामीन नामंजूर केली.न्यायाधीश व सरकारी वकील यांचे चौकशी प्रास्तावित केली असुन त्यादृष्टीने कारवाई सुरु आहे. उच्च न्यायालयाने कारवाई करण्यासाठी हे प्रकरण चिफ जस्टीस (मुख्य न्यायाधीश) व विधी व न्याय विभागाचे मुख्य सचिव यांच्याकडे पाठविले आहे. एखाद्या न्यायाधीश यांना निलंबित करण्याची राज्यातील तसेच धाराशिव जिल्ह्यातील ही दुर्मिळ घटना आहे. मा न्यायालय, न्याय व्यवस्था व न्यायाधीश यांची प्रतिमा मलिन करण्याचा या बातमीतून कोणताही हेतू नाही.

..........
0
110 views    0 comment
0 Shares

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे भरते पोपटांची शाळा................

म्हणतात ना जिथे प्राणी पक्षांना मायेचा आश्रय मिळाला, त्या ठिकाणी पक्षी मोठ्या प्रमाणात वास्तव करत असतात. आणि त्या ठिकाणी येत असतात. प्रेम आणि आपुलकी ही मानवी जीवनाबरोबरच पक्ष्यांना सुद्धा लागू आहे. अशाच मायेचा आसरा करण्यासाठी पोपटांसाठी गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या दाणापाण्याची सोय करणारा एक अवलिया. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरात असणारे कमल किशोर उपाध्याय निरंतर सात वर्षांपासून या पोपटांना धान्य देण्याचे काम सतत करत आहेत. नित्य क्रमाने सुरूच आहे.
रोज सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने सकाळ झाली तर किती सुंदर वाटतं. कमल किशोर उपाध्याय एका राईस मिलचे संचालक असून त्यांच्या मागील सात वर्षांपूर्वी आपल्या घराच्या परिसरात अनेक पोपट येतात. सुरुवातीला त्यांनी त्यांच्याकडे असणारे वेस्टेज तांदूळ पोपटांना टाकायला सुरुवात केली. निरंतर पोपटांची संख्या वाढत गेली आणि त्यामुळे कमल किशोर उपाध्याय यांना एक छंद लागला. की, ते रोज सकाळी उठून या पोपटांसाठी दोन ते तीन किलो रोज तांदूळ टाकतात. त्यांच्या हे धान्य टाकल्यानंतर पोपट हे मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि धान्य खाऊन निघून जातात. विशेष म्हणजे हे कार्य त्यांनी गेल्या सात वर्षांपासून निरंतर अविरतपणे सुरू ठेवलेले आहे. त्यांना ही प्रेरणा त्यांचे गुरु आणि त्यांच्या आईमुळे मिळाली. या पोपटांसाठी एक मायेचा आसरा, एक हक्काचं घर या पोपटांना मिळालं.
दरवर्षी हे पोपट चार महिने नित्य क्रमाने रोज सकाळी साडेसहाच्या दरम्यान कमल किशोर उपाध्याय यांच्या अंगणात येतात, धान्य खातात आणि धान्य खाऊन झाल्यावर निघून जातात. सामान्य जून ते सप्टेंबर महिन्यात हे पोपट या ठिकाणी येतात. हे कार्य अविरतपणे त्यांनी सुरू ठेवलेल आहे. त्यामुळे या पक्षांचा एक आधारस्तंभ सध्या कमल किशोर उपाध्याय हे ठरत आहेत.

..........
99
2103 views    0 comment
1 Shares

Air Asia फ्लाइटचे
आपत्कालीन
लँडिंग....................

थोडक्यात बचावले १६८ प्रवाशी...,,..............

Air Asia : केरळमध्ये रविवारी रात्री मोठी दुर्घटना टळली. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर एशियाच्या विमानाचे टेकऑफनंतर काही वेळातच आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यावेळी विमानातील सुमारे 168 जणांचा श्वास रोखला गेला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कोचीहून बेंगळुरूला जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानाने रविवारी रात्री ११ वाजता केरळमधील कोची येथील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमान परत उतरवण्यात आल्याचे वृत्त आहे.
विमान कंपनी आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानात
हायड्रॉलिक समस्या होती.
विमानात 168 प्रवासी आणि 6 कर्मचारी होते.

अधिका-यांनी सांगितले की, विमानात 168 प्रवासी आणि सुमारे 6 क्रू मेंबर्स होते. दुसरीकडे ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांचा श्वास रोखला गेला. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. इमर्जन्सी लँडिंग असले तरी लँडिंग सुरक्षितपणे करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे..

..........
96
4322 views    0 comment
1 Shares