प्रेस नोट
अहिल्यानगर
मराठी पत्रकारिता ' दर्पण ' दिवस
सत्याची मशाल हाती घेऊन,१८ वर्षे समाज जागवली,
लेखणीच्या ताकदीने,वृतपत्राने ओळख घडवली.
" अल्लाह " ईश्वर सर्वस्वी श्रेष्ठ आहे तो साक्षी आहे तसे ६ जानेवारी मराठी पत्रकारिता ' दर्पण ' दिवस
मराठीतील पहिले 'दर्पण' हे वर्तमानपत्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा पाया घातला. 'पत्रकार दिन' साजरा केला जातो. तसेच सा.युवा मुस्लिम विकास परिषद वृतपत्राचा १ ला अंक ७ जानेवारी वर्धापन दिन
सा .युवा मुस्लिम विकास परिषदेचा पहिला अंक ७ जानेवारी २००८ रोजी प्रकाशित झाला त्यामागे उद्देश्य असा होता की मुस्लिम विकास परिषद हि सामाजिक संघटना स्थापना प्रा.वहिदाभाभी यांच्या अध्यक्षतेखाली सन २००० साली स्थापण करण्यात आली मुस्लिम समाजातील विध्यार्थी व विद्यार्थीनी यांना शिष्यवृत्ती मिळावी व शिक्षणानंतर आरक्षण मिळावे हा मुख्य उद्देश होता मुस्लिम समाजात सकारात्मक लोकशाहीची जनजागृती व्हावी लोकहिताची चळवळ निर्माण व्हावी झोपलेल्या शासनाला मुस्लिम समस्या व मुस्लिम
व्होटबैंक याची जाणीव व्हावी एक दबाव गट निर्माण व्हावा तो साध्य ही झाला महाराष्ट्र शासनाने मान्य केलं आज शिष्यवृत्ती मिळत आहे व मुस्लिम आरक्षण हि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात मिळाले पण कायद्यात अडकले कारण समाजाला ही कदाचित जनजागृतीचे ध्येय नसावे मुस्लिम विकास परिषद एक चळवळ एक दिशा होती हा इतिहास आहे पण दुर्दवाने प्रा.वहिदाभाभी यांच्या पतीचे निधन झालं त्यामुळे संघटनेचे कार्य पुढे चालू शकले नाही कारण की त्यांना एकच मुलगी आहे मुलगा नसल्याने वारसा पुढे चालू शकला नाही ज्यांनी समाजाला प्रगतीचा चळवळीचा मार्ग दाखवला ते विचार जिवंत रहावे याच उद्देश्याने दिवंगत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेबुब पाशा शेख यांच्या निधनानंतर नंतर सा .युवा मुस्लिम विकास परिषदेच्या माध्यमातून लोकशाहीची चळवळ जिवंत रहावे हा संघर्षमय मुख्य उद्देश आहे कारण समाजाला न्याय , हक्क , अधिकार वृतपत्राच्या माध्यमातून सामाजिक समस्या शासन दरबारात लेखणीतून संवाद साधला वृतपत्र संवादाचे माध्यम आहे भारतीय आहोत याचा स्वाभिमान व अभिमान आहे
भारतात जन्मलो देशाचे देणे आहोत समाजाचे जन्मलोत सयाजाचे देणे आहोत " अल्लाह " ईश्वर ने जी बुध्दी विचार दिले त्याचा वापर मानवी कल्याण व समाजहितासाठी व्हावा ज्यांच्या खाद्यावर जायचे त्यांचे देणेकरी आहोत या विचारातून पत्रकारितेला सुरवात केली . कुठलाही गाजावाजा केला नाही शांत संयमाने वृतपत्राचा आर्थिक भार हा शासकीय जाहिरात यावरच अवलंबुन आहे व कुटुंबीय आई ,वडील, पत्नी, मुलगा,मुलगी, यांच्या हक्काचा आर्थिक खर्च कमी करुन वृतपत्र चालवले ( कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा निर्णय भाग आहे ) असो १९ व्या वर्षात वृतपत्राची वाटचाल आहे त्या मागे उद्देश्य हा व्यवसायिक दृष्टीकोन नाही तर वृतपत्र काळाची हा मुख्य उद्देश आहे वृतपत्र हा नदीचा प्रवाह आहे या प्रवाहात आलेंल संकट समस्या याला समावुन घेत प्रवाह सारखं वाहत राहणे हेच जिवन आहे अशाच वळणावर सा.युवा मुस्लिम विकास परिषद ची वाटचाल आहे सर्व सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही वृतपत्र चालवंण म्हणजे डोंगरावर शिखर पार करंण आहे दिसतंय तसं नसतंय आज पत्रकारितेच्या माध्यामातुन लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता अतिरेक होतोय एवंढ मात्र निश्चित समाजसुधारक , थोर विचारवंत , स्वातंत्र्य सेनानी यांची , पत्रकारिता राष्ट्रहित व समाजहितासाठी होती आजची पत्रकारिता. ......असो
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृतपत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. समाजात घडणाऱ्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणे, सत्य मांडणे आणि जनजागृती करणे हे वृतपत्राचे मुख्य कार्य आहे. आज वृतपत्राने १८ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून, हा क्षण अत्यंत अभिमानाचा व गौरवाचा आहे. या १८ वर्षांच्या प्रवासात वृतपत्राने सत्य, निःपक्षपातीपणा आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना कायम जपले. ग्रामीण व शहरी भागातील सामान्य नागरिकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे दुःख, कामगारांचे हक्क, महिलांचे सशक्तीकरण, युवकांचे प्रश्न तसेच सामाजिक अन्याय व भ्रष्टाचार यावर वृतपत्राने निर्भीडपणे लेखणी चालवली. त्यामुळे वाचकांच्या मनात वृतपत्राने विश्वासाचे स्थान निर्माण केले. बदलत्या काळानुसार वृतपत्राने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. छापील माध्यमाबरोबरच डिजिटल माध्यमातही वृतपत्राने आपली ओळख निर्माण केली. यामुळे अधिकाधिक वाचकांपर्यंत बातम्या वेगाने पोहोचू लागल्या. पत्रकारांचे प्रामाणिक प्रयत्न, दूरदृष्टी आणि व्यवस्थापनाची कार्यक्षमता यामुळे हा प्रवास अधिक भक्कम झाला.
१८ वर्षांचा हा प्रवास केवळ कालावधी नसून संघर्ष, चिकाटी आणि समाजहितासाठी केलेल्या अखंड प्रयत्नांची साक्ष आहे. वृतपत्राने नेहमीच सत्याची कास धरत जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातही हे वृतपत्र समाजाला योग्य दिशा देत, लोकशाही मजबूत करण्याचे कार्य करेल आणि सत्य, न्याय व विश्वासाचे प्रतीक म्हणून आपली वाटचाल अखंड सुरू ठेवेल, १९ व्या वर्षात पदार्पण करत असतांना
नव्या AI सोबत नव्या आशा, नव्या संधी आणि नव्या संकल्पांची सुरुवात होत आहे. मागील १८ वर्षातील अनुभवातून शिकत यश-अपयशाला समान भावनेने स्वीकारत अधिक सकारात्मक, अधिक जबाबदार आणि यशस्वीरित्या वृतपत्राची वाटचाल करण्याचा हा नवा प्रवास नवा संकल्प आहे. सा.युवा मुस्लिम विकास परिषद वृतपत्र वाचकांचे आभार आपण वृतपत्रावर दाखवलेला विश्वास, प्रेम आणि सततचा पाठिंबा हाच आमच्या यशाचा खरा पाया आहे. गेल्या १८ वर्षांच्या प्रत्येक टप्प्यावर आपण आम्हाला प्रेरणा दिली, चुका सुधारण्याची संधी दिली आणि सत्य, निर्भीड व समाजाभिमुख पत्रकारितेच्या वाटेवर पुढे जाण्याचे बळ दिले. आपल्या सूचनांमुळे आमचे लेखन अधिक सक्षम झाले, तर आपल्या अपेक्षांमुळे आमची जबाबदारी अधिक वाढली. वृतपत्र हे केवळ बातम्यांचे साधन न राहता समाजाचा आरसा बनावे, ही आपली अपेक्षा आम्हाला नेहमीच मार्गदर्शक ठरली आहे. ही यशस्वी वाटचाल आपल्या सहभागाशिवाय शक्य नव्हती. पुढील काळातही आपण असेच प्रेम, मार्गदर्शन आणि सहकार्य देत राहाल, हीच अपेक्षा.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015