logo

ओवकर भावे रामचंद्र संस्थान विश्वस्त पदी अजुन मेदकर यांच्या अलंकापुरी सत्कार सत

जय श्रीराम
आळंदी ( रोहिदास कदम ) : तीर्थक्षेत्र आळंदी येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान श्री राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त पदी अर्जुन मेदनकर यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा माहेश्वरी जनकल्याण ट्रस्ट आणि विविध क्षेत्रात कार्यरत सेवाभावी संस्था, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचे तर्फे सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ह.भ.प. तुकाराम महाराज ताजणे, आळंदी शहर शिवसेनेचे उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, शिवसेना शाखा प्रमुख रोहिदास कदम, शिवसेना विभाग प्रमुख शशिकांत राजेजाधव, मयुरेश्वर प्रतिष्ठान अध्यक्ष मयूर पेठकर, गोविंद ठाकूर तौर, सामाजिक कार्यकर्ते जयसिंग कदम, सुहास सावंत, उद्योजक बालाजी शिंदे आदी मान्यवर मराठा सेवक उपस्थित होते. आळंदी पंचक्रोशीतून या निवडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत राजे जाधव, जयसिंग कदम यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
तुकाराम महाराज ताजने म्हणाले, जे लोक समाजाचं ऋण फेडण्याचे कार्य करतात. ज्यांचे कडून सत्कर्म घडतात. त्यांचेच सत्कार होतात. आणि हे सन्मानाचे कार्य माहेश्वरी मंडळ आणि विविध सेवाभाव संस्था यांचे वतीने अर्जुन मेदनकर यांचा सन्मान करून झाले आहे. त्यांचा सत्कार होत आहे. तो सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कार्याचा सन्मान होत आहे. निरपेक्ष वृत्तीने केलेल्या कार्याचा सन्मान होत असल्याने आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या हक्काच्या माणसाकडे कोणत्याही प्रकारचे काम त्यांचे पर्यंत गेल्यास ते निश्चितच पूर्ण होते असा अनुभव असल्याचे ताजने महाराज यांनी सांगितले.

0
77 views