logo

नवी मुंबई ..6 नोव्हेंबर 2022 रोजी स्वीट होम ट्रस्ट प्रस्तुत वीर तानाजी व झाशीची राणी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला ह

नवी मुंबई ..6 नोव्हेंबर 2022 रोजी स्वीट होम ट्रस्ट प्रस्तुत वीर तानाजी व झाशीची राणी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता..................
.प्रसंगी सामाजिक उद्योग कला यासारख्या अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी करून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या अनेक कर्तृत्ववान महिला यांना झाशीची राणी व पुरुषांसाठी वीर तानाजी पुरस्कार स्वीट होम ट्रस्ट समितीच्या पदाधिकारी यांच्याकडून देण्यात आला. या आगळ्यावेगळ्या ऐतिहासिक पुरस्कार सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पुरस्कार देण्यासाठी शूरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज , पद्मश्री पुरस्कार विजेते तसेच अनेक मान्यवर यांच्या हस्ते देण्यात आला. आजच्या या सुवर्ण सोहळ्या च्या दिनी पुरस्कार विजेते यांना घोड्यावर बसून फोटो काढण्याची एक सुवर्ण संधी तसेच शिवकालीन तलवार व शाही तुतारी तिने स्वागत असा विस्मरणीय अनुभव विजेते यांना देण्यात आला. अशा या ऐतिहासिक कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच कला क्षेत्रातील पुरस्कार नवी मुंबईतील प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर मिलिंद एस पी तसेच डॉ. स्नेहा देशपांडे समाजसेविका राजश्री येवले पत्रकार कृष्णा यादव नेचर एचडी डायरेक्टर दत्ता चौगुले समाजसेविका दर्शना भोईर अशा अनेक सत्कारमूर्तींना वीर तानाजी पुरस्कार झाशीची राणी पुरस्कार देण्यात आला अशा या ऐतिहासिक सुवर्ण पुरस्कार सोहळा स्वीट होम ट्रस्ट या संस्थेने आयोजित केला यासाठी उपस्थित अनेक मान्यवरांनी संस्थेचे पदाधिकारी पुरस्कार विजेते यांचे आभार मानले.

141
14760 views
  
1 shares