logo

सोन्यासारख्या प्रियजणांना दसऱ्याच्या भरभरून शुभेच्छा

सोन्यासारख्या प्रियजणांना दसऱ्याच्या भरभरून शुभेच्छा

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असा पवित्र सण म्हणजे दसरा होय. दसरा म्हणजे ज्या सणाला आपण विजयादशमी देखील म्हणतो, जो आपण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करतो. दसरा सणाच्या प्रियजणांना खास शुभेच्छा.
विजयादशमी आणि दसरा
दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.

2
2000 views