logo

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जर्मनीच्या संरक्षणमंत्र्यांशी दूरध्वनीवरुन केलेल्या संभाषणात दोन्ही देशांतील संरक्षण उद्योगांतील सहयोग आणि पुरवठा साखळीतील लवचिकता आणखी मजबूत करण्याच्या मार्गांबाबत केली चर्चा

नवी दिल्ली:- राजनाथ सिंह यांनी आज दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी, जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्तोरियस यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली.यावेळी या नेत्यांनी हवाई तसेच सागरी क्षेत्रातील सराव अभ्यास उपक्रमांसह दोन देशांतील संरक्षण क्षेत्रात सध्या सुरु असलेल्या सहकार्यविषयक घडामोडींचा थोडक्यात आढावा घेतला.

दोन्ही मंत्र्यांनी संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहयोग आणखी मजबूत करण्याच्या तसेच पुरवठा साखळीतील लवचिकता सुधारण्याच्या मार्गांबाबत चर्चा केली.भारत-जर्मनी द्विपक्षीय संबंधांच्या महत्त्वाच्या आधारस्तंभाच्या रुपात संरक्षण क्षेत्राला रुपांतरीत करण्याच्या उद्देशाने सध्या सुरु असलेली संरक्षण क्षेत्रातील कार्ये तसेच संयुक्त प्रकल्प यांना मजबूत आकार देण्यासाठी नजीकच्या भविष्यकाळात भेटण्याचे नियोजन या नेत्यांनी केले.

1
1469 views