logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महाराष्ट्राच्या दोन ST बसचा गुजरातमध्ये भीषण अपघात; धुळे सूरत हायवेवर 9 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू.....

महाराष्ट्राच्या दोन ST बसचा गुजरातमध्ये भीषण अपघात झाला आहे.  धुळे सूरत हायवेवर 9 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.  सूरत धुळे हायवेवर भीषण अपघात झाला आहे.
सुरत जिल्ह्यातील बारडोलीजवळ असलेल्या उवा गावाजवळ हा भीषण अपघात झाला. महाराष्ट्राच्या दोन ST बसेसची समोरासमोर धडक झाल्याने ही दुर्घटना घडली. या भीषण अपघातात 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालय्चाी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचा संशय आहे.
महाराष्ट्राच्या दोन बसेसने एकमेकांना धडक दिली.  ही धडक इतकी जोरदार होती की, एक बस रस्त्यावर उलटली. अपघातानंतर  उलटलेल्या बसला अचानक आग लागली. संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली, त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि लोक मदतीसाठी किंचाळू लागले. बसला लागलेल्या आगीमुळे आत अडकलेल्या प्रवाशांना वाचवणे अवघड झाले. या भीषण धडकेत दुसऱ्या बसचा पुढचा भागही पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
अपघाताचे वृत्त समजताच  बार्डोली अग्निशमन दलाचे पथक आणि स्थानिक पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.  अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून, आत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवरील बचावकार्य सुरू आहे.
जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले जात आहे. सध्याची गंभीर परिस्थिती पाहता, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

44
1314 views

Comment