logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*आरक्षणाला पर्यायी व्यवस्था निर्माण करावी लागेल-उत्तम खोब्रागडे* *नव्या जनगणनेत बौद्धांची लोकसंख्या करोडो असणार-भीमराव आंबेडकर.* *नवी मुंबई.....

मुंबई, जात या फॅक्टरला कायदेशीर मान्यता नसून उपवर्गीयकरणाचा घाट घालून आरक्षणाची मोडतोड करून प्रत्येक जातीला 0.3 आरक्षण मिळाल्यास लाभ न मिळताच उपवर्गीयकरणाचा मोठा जबरी फटका बसेल, त्यामुळे आरक्षणाला पर्यायी व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे स्पष्ट उद्गगार माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी येथे बोलताना काढले. उपवर्गीयकरणाला विरोध करतानाच ह्या जनगणनेतून भारतातील करोडो बौद्धांची लोकसंख्या दिसून येईल, असे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी बोलताना सांगितले. नवी मुंबईतील वाशी येथील बुद्ध प्रतिष्ठान सभागृहात बौद्ध मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली. ‌. माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या 75 व्या वर्षपूर्ती निमित्ताने त्यांचा सन्मान व धर्मांतर विरोधी कायदा उपवर्गीयकरण व बौद्ध जनगणना या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तम खोब्रागडे यांनी अनुसूचित जातीच्या संकल्पनेला 120 वर्षाचा इतिहास सांगितला. जात हा फॅक्टर नव्हताच त्यासाठी डिप्रेस्ड क्लास असे नामकरण करण्यात आले होते. हिंदू धर्मातील ह्या बहिष्कृत वर्गाला सामाजिक, आर्थिक, राजकीय आरक्षणासाठी ही तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये करून घेतली. सध्या उपवर्गीयकारणातून आरक्षणाचा लाभ कोणालाच होणार नसून त्यामुळे नुकसानच होणार आहे.0.3 आरक्षण विभागणी झाल्यानंतर त्याचा फायदा कोणालाच होणार नाही. भविष्यातील धोका ओळखून आता आरक्षणाला पर्यायी व्यवस्था उभी करण्याची ताकद निर्माण करावी लागेल. आरक्षण नसतानाही संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील विद्वान ठरले. आरक्षण नसताना भीमा कोरेगाव सारखे गुलामगिरी विरोधात युद्ध होते. त्यामुळे आरक्षण नसले तरी बौद्ध आपल्या क्षमतेवर यशस्वी होऊन दाखवतीलच हा इतिहास विसरून चालणार नाही, असेही खोब्रागडे म्हणाले. राज्य सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये विविध कामे केली. एसटी महामंडळ, म्हाडा अडचणीत असताना त्यांना फायद्यात आणणे यालाच आंबेडकरी विचारधारा कारणीभूत असल्याचे खोब्रागडे म्हणाले. सम्राट अशोक यांच्या बौद्ध धर्माचे अनुयायी हे मागासवर्गीय होते, म्हणूनच त्यांना गुलाम करण्यात आल्याचे दाखले ही त्यांनी बोलताना दिले. ‌. भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या एक कोटी 23 लाख बौद्ध आहेत. संपूर्ण भारतभर येथे जनगणनेमध्ये ही लोकसंख्या करोडोंच्या घरात जाईल. तेव्हा बौद्धांची देशातील ताकद या जनगणनेतून दिसून येईल. त्याचप्रमाणे अनुसूचित जातीमध्ये ही एक मोठा बदल दिसून येईल. केंद्र सरकारच्या धर्मांतर विरोधी कायदा हा भारतीय जनतेच्या मूलभूत अधिकारावर गदा असून बौद्ध धर्माकडे वळणाऱ्या अनुयायांना अडविणारे षडयंत्र आहे. बौद्धांच्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे बौद्धांच्या लोकसंख्येवरून आपल्याकडे येईल, त्यामुळे जनगणना जात आणि बौद्ध नमूद करणे गरजेचे असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरले गेले पाहिजे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये उपवर्गीयकरणा विरोधात लाखोंचे मोर्चे निघाल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झालेल्या आहेत. आंदोलनाच्या व्याप्तीनंतर सरकार अफसुकच हा निर्णय मागे घेण्यास भाग पडेल, त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. निवडणुकीमध्ये बौद्ध खासदार संसदेत गेले असते तर ही वेळ आली नसती, अशी गंभीर बाबी त्यांनी निदर्शनास आणून दिली. ‌ *देवायानी खोब्रागडे महाराष्ट्राची पहिली महिला राजदूत....* ‌ आयएएस परिक्षेच्या स्पर्धेत माझा रेकॉर्ड मुलगी देवायानी खोब्रागडे हिनेच मोडला. महाराष्ट्राची पहिली महिला एखाद्या देशाची राजदूत देवयानी ठरल्याचा अभिमान खोब्रागडे कुटुंबाबरोबरच आंबेडकरी चळवळीला आहे. प्रशासनातल्या जुन्या आठवणी सांगताना त्यांनी अनेकांची कामे जात बघून कधीच केली नाहीत. त्याची प्रचिती रिपाईचे नेते भाऊ निरभवणे यांचे नाव घेत त्यांनी सोदाहरण दाखला दिला. यावेळी भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये खोब्रागडे यांच्या नो रबर स्टॅम्प या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला समता सैनिक दलाची सलामी आकर्षित ठरली. बौद्ध बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

30
2654 views

Comment