logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राजपत्रात 7 हजार मानधन मंजूर, तरी वृद्धांना वाऱ्यावर सोडले; ज्येष्ठ नागरिकांचा 10 जूनपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा*


*- डॉ. हंसराज वैद्य, नांदेड*

*नांदेड, दि. 28 मे 2026:* महाराष्ट्रातील लाखो ज्येष्ठ नागरिक आज अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. वयामुळे काम करू शकत नाहीत आणि महागाईमुळे औषध-जेवणाचीही भ्रांत आहे.

*महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्र. 87, दि. 15 जुलै 2025* मध्ये प्रसिद्ध झालेल्या *विधानसभा विधेयक क्रमांक 72, सन 2025* नुसार शासनाने स्वतः मान्य केले आहे की, *65 वर्षे पूर्ण* केलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना *दरमहा ₹7,000/- मानधन, ₹5 लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा, महाराष्ट्र दर्शनासाठी वार्षिक ₹15,000/- अनुदान, निराधारांसाठी राहण्याची-जेवणाची व्यवस्था व टोल फ्री हेल्पलाइन* या सुविधा त्वरित तथा तात्काळ अंमलात येतील असे नमूद करण्यात आलेले आहे.

हे विधेयक *परभणीचे शिवसेना आमदार डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील* यांनी दि. 2 जुलै 2025 रोजी विधानसभेत मांडले असून, *विधानसभा सचिव जितेंद्र भोळे* यांनी दि. 15 जुलै 2025 रोजी त्यास अंतिम रूप दिले आहे. *नांदेड दक्षिणचे शिवसेना आमदार मा. आनंदराव तिडके पाटील बोंढारकर व वसमतचे राष्ट्रवादीचे आमदार मा. राजू भैय्या नवघरे* यांनीही या विधेयकाला सभागृहात पाठिंबा दिला होता.

तसेच, राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक अधिवेशनात 36 जिल्ह्यातील 4000 प्रतिनिधींसमोर *मंत्री मा. गिरीश महाजन, मा. संजय शिरसाट तथा मा. दादा भुसे* यांनी "मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून न्याय देतो" असे जाहीर आश्वासन दिले होते.

*परंतु, राजपत्र प्रसिद्ध होऊन 10 महिने उलटले तरी एकाही ज्येष्ठ नागरिकाला एक रुपयाचाही लाभ मिळालेला नाही.* दि. 23 मे व 27 मे 2026 रोजी 33 माध्यमांचे पुरावे देऊन शासनाला स्मरणपत्र दिले, तरीही कारवाई शून्य आहे.

*म्हणून येत्या 10 जून 2026 पासून आझाद मैदान, मुंबई येथे राज्यभरातील 5 हजार ज्येष्ठ नागरिक बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.*
आमची एकमेव मागणी:* शासनाने स्वतःच्या राजपत्रात मान्य केलेले *विधेयक क्रमांक 72 तात्काळ लागू करून 65 वर्षांवरील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹7,000 मानधन व इतर सुविधा* त्वरित सुरू कराव्यात.

*आंदोलनादरम्यान एखाद्या ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती बिघडल्यास त्याची नैतिक जबाबदारी शासनावर राहील.
*डॉ. हंसराज वैद्य*
*अध्यक्ष, उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम नांदेड*
*नांदेड. मो. 9423138385*




17
3726 views

Comment