logo
logo
(Trust Registration No. 393)
aima profilepic
Sandeep bhalerao
All India Media Association

*राष्‍ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने “लोकशाहीची भिंत” भिंतीवरील चित्रकला स्‍पर्धेस उत्‍स्फूर्त प्रतिसाद*
 
नांदेड ) दि. 21 :- बारावा राष्‍ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2022 रोजी नांदेड जिल्ह्यात साजरा करण्‍यात येणार आहे. निवडणूक विषयक प्रक्रिया व मतदार जनजागृती करण्यासंदर्भाने विविध उपक्रम नांदेड जिल्ह्यात राबविण्‍यात येत आहेत. त्याअनुषंगाने जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्‍या संकल्‍पनेतून नांदेड शहरातील विद्यार्थी, चित्रकला शिक्षक व इतर नागरीकांसाठी “लोकशाहीची भिंत” या खुल्‍या चित्रकला स्‍पर्धेचे आयोजन आज कृषी तंत्र विद्यालय काबरानगर रोड नांदेड येथे करण्‍यात आले होते. “लोकशाहीची भिंत” या नाविण्‍यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य पवन ढोके यांच्या हस्‍ते करण्‍यात आले. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे या होत्‍या.  
 
नांदेड शहरात “लोकशाहीची भिंत” ही स्‍पर्धा मतदारांमध्‍ये नवचैतन्‍य निर्माण करेल. आठरा वर्ष पूर्ण झालेले मतदार निश्चितच प्रेरणा घेऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवतील. सर्व सुजाण नागरिक मतदानाच्‍या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा पवित्र हक्‍क बजावतील, असे प्रतिपादन उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती दिपाली मोतीयेळे यांनी केले. यावेळी सर्व स्‍पर्धक व चित्रकला शिक्षकांना त्यांनी शुभेच्‍छा दिल्‍या.  
 
नांदेड कृषी तंत्र विद्यालय येथील संरक्षण भिंतीवरील दर्शनी भागावर निवडणूक विषयक प्रक्रिया व मतदार जनजागृती विषयक चित्रे काढण्‍यात आली. या स्‍पर्धेसाठी चित्रकला शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, इतर स्‍पर्धकांचा उत्‍स्‍फूर्त  प्रतिसाद  मिळाला. या स्‍पर्धेत शहरातील 11 चित्रकला शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी असे जवळपास चाळीसच्यावर स्‍पर्धकांनी सहभाग नोंदविला.
 
यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार किरण आंबेकर, नायब तहसिलदार डी. एन. पोटे,  नायब तहसिलदार श्रीमती स्‍नेहलता स्‍वामी, नायब तहसिलदार श्रीमती उर्मिला कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी दत्‍तात्रय मठपती, विस्‍तार अधिकारी राजेंद्र शेटे, जिल्‍हाधिकारी कार्यालयातील फैय्याज खान, शरद बोरामने, विनोद मनवर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले तर आभार राजेश कुलकर्णी यांनी मानले. परिक्षक म्‍हणून श्रीमती कविता जोशी, सुरेश कुऱ्हाडे, विजय सावंत, विलास झोळगे, शैलजा बुरसे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्‍या य‍शस्वितेसाठी तलाठी नारायण गाढे, माणिक भेासले, संजय भालके, के. डी. जोशी, आर. जी. कुलकर्णी, पी. एम. कुलकर्णी, सय्यद, बडुरे, विनोद जोंधळे यांनी परिश्रम घेतले.

..........
8
437 views    0 comment
0 Shares

*महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व
परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश*  

नांदेड (
) दि. 20 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा ही  रविवार 23 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते सायं 5 यावेळेत नांदेड शहरातील 32 केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत करण्यात आला आहे. 

या परीक्षा केंद्राच्या परिसरात रविवार 23 जानेवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 7  वाजेपर्यंत या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

..........
0
7 views    0 comment
0 Shares

*अर्धापूर, नायगाव, माहूर निवडणुकीचे विजयी उमेदवार घोषित*  
 
नांदेड ) दि. 19 :- अर्धापूर, नायगाव, माहूर  नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021-22 साठी 19 जानेवारी रोजी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी शांतेत पार पडली. विजयी घोषित उमेदवारांची माहिती पुढील प्रमाणे आहे.
 
अर्धापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे 10 उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे 1 ऑल इंडिया मजेलिस-ए-इत्तेहादुल मुस्लेमीनचे 3 आणि अपक्ष 1 उमेदवार निवडुन आले. यात शेटे शालिनी व्यंकटेश यांना 614 मते, लंगडे पल्लवी विशाल यांना 646, सरोदे सोनाजी विठ्ठल 472, कानोडे पुंडलिक मारोती यांना 419, देशमुख वैशाली प्रवीण यांना 700, राऊत मिनाक्षी व्यंकटराव यांना 494, काजी सायराबेगम काजी सलाओद्दीन यांना 954, खतीब यास्मीन सुलताना अब्दुल मुसवीर यांना 433, खुरेशी म सलीम म खाजा यांना 302, सरोदे नामदेव सिताराम यांना 509, तर नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टीचे शेख जाकीर सगीर यांना 599  मते मिळाली. भारतीय जनता पार्टीचे प्रल्हाद कान्होपात्रा माटे यांना 504, लंगडे यदोजी सखाराम यांना 298  आणि अपक्ष उमेदवार मुभोदरखा सिकंदरखा सिकंदरखा यांना 768 मते मिळाली .
माहूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 7, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 6, शिवसेनेचे 3 तर भाजपचे एक उमेदवार निवडणूक आले. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भंडारे विलास बाजीराव यांना 307, कांबळे नंदा नरेश यांना 125, केशव राजेंद्र नामदेवराव यांना 234, सौंदलकर कविता राजू यांना 163, शेख लतिफा मस्तान यांना 212, राठोड सागर विक्रम यांना 169 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सारिका देविदास सिडाम यांना 153, सौदागर मसरत फातेमा अब्दुल रफिक यांना 195, सय्यद शकिलाबी शबीर यांना 166, शेख बिलकीसबेगम अहमद अली 118, दोसानी फिरोज कादर यांना 285, खडसे अशोक कचरू यांना 99, पाटील शिला रणधीर यांना 128 मते मिळाली. शिवसेनेचे जाधव आशाबाई निरधारी यांना 219, कामटकर विजय शामराव यांना 138 तर लाढ ज्ञानेश्वर नारायण यांना 194 मते मिळाली. भाजपचे महामुने सागर सुधीर यांना 341 मते मिळाली.
 
नायगाव नगरपंचायत निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाला 17 जागा मिळाल्या. यात बोईनवाड आशाताई हणमंत यांना 357, भालेराव शरद दिगांबर यांना 333, सोनकांबळे सुमनाबाई भिमराव या बिनविरोध, शिंदे सुधाकर पुंडलीकराव यांना 341, कल्याण शिवाजी शंकरराव यांना 309, कल्याण मिनाबाई सुरेश यांना 438, सय्यद सखरी हाजीसाहब यांना 290, विजय दत्तात्रय भालेराव, जाधव गिता नारायण या बिनविरोध, भालेराव दायनंद इरबा यांना 227, बेळगे विठ्ठल लक्ष्मण यांना 377, चव्हाण विजय शंकरराव यांना 375, चव्हाण अर्चना संजय यांना 412, मंदेवाड काशीबाई गंगाधर 467, भालेराव ललिता रविंद्र 317, चव्हाण पंकज हणमंतराव यांना 599, शेख मरीयमबी नजीरसाहब यांना 416 मते मिळाली. विशेष म्हणजे यात तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

..........
20
959 views    0 comment
0 Shares

*लसीकरणाची मोहीम जेव्हा नोकरीचा भाग न राहता उत्तरदायीत्वाची जागा घेते*

▪️भाजी विक्रेत्यांच्या लसीकरण मोहिमेत 1 हजार 800 विक्रेते लसवंत
 
नांदेड () दि. 19 :- त्यांचा दिवस सकाळी 9 वाजता बरोबर सुरू होतो. आवश्यक असलेले लसीकरणाचे सर्व किट, शीतपेटी, इंजेक्शन, व्हिटॅमीन डी सह पॅरासीटेमॉलच्या टॅबलेट व इतर आवश्यक साहित्य घेण्याबाबतच्या सूचना त्यांना डॉक्टर्स देतात. पाच-पाच जणांचे हे पथक वैद्यकीय अधिकाऱ्यासह तयार होते. लसीकरण केवळ शासकीय ड्युटीचा भाग नाही तर यासाठी लोकांना साक्षर करून, त्यांच्या मनातली भिती दूर करून, त्यांच्यात मिसळून लसीकरणाला गती देण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या सूचना घेऊन हे पथक कर्तव्याला निघते. आज यांच्या वाट्याला नांदेड येथील शेतकरी चौक ते छत्रपती चौक या रस्त्याच्या दुतर्फा बसलेले भाजीवाले, गाडीवाले यांची तपासणी करुन त्यांना लसीकरण करण्याची जबाबदारी आहे.
 
“दादा लस घेतली का ? तुमचे प्रमाणपत्र दाखवा, नाही घेतली तर खरे सांगा, याचा त्रास अजिबात होत नाही” असा विनवणीचा सूर लावत पथकातील नेमलेल्या अधिसेविका मोहिमेची सुरूवात करतात. सोबत डॉक्टर आवश्यक त्या ठिकाणी भाजीपाला विक्रेते मोबाईल मधील प्रमाणपत्र दाखवतात. ज्यांनी लस घेतली नाही ते प्रमाणिकपणे लस घेतली नसल्याचे सांगून तयारी दर्शवतात. पथकातील एक अधिसेविका शीतपेटीतून लसीची मात्रा नव्या इंजेक्शन मध्ये भरते. “दादा हात पुढे करा, काही त्रास होत नाही” असे सांगून त्या विक्रेत्याला लसवंत करते.
 
लसीकरणाचे हे काम कर्तव्याचा जरी भाग असला तरी मनालाही खूप सारा आनंद देणारा आहे. काही प्रसंगी लोक हुज्जत घालतात. तर अधिकांश लोक हे लसीकरण झाले नसेल याची कबुली देऊन पुढे सरसावतात. विशेष म्हणजे आहे फळ भाजीपाला विक्रेत्यांकडे मोबाईल असून त्यात त्यांनी प्रमाणपत्र सेव्ह करून ठेवले आहे, ते प्रमाणिकपणे दाखवून सहकार्य करतात, अशी प्रतिक्रिया या लसीकरणाच्या पथकाचे नेतृत्व करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंग बिसेन यांनी दिली. जिल्हा प्रशासनातर्फे रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी या 2 दिवसात विशेष मोहिम घेतली असून आज सकाळ पर्यंत 1 हजार 800 भाजीपाला व इतर विक्रेत्यांचे लसीकरण केल्याची माहिती त्यांनी दिली. जनतेनेही आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचा व राष्ट्रसेवेचा हा एक भाग समजून लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

..........
0
0 views    0 comment
0 Shares

सण-उत्सवात ध्वनी वापराची अधिसूचना निर्गमीत

 

नांदेड ( दि. 18 :- ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक आदीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन 2022 साठी पुढील सण, उत्सव काळात 15 दिवस ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केली आहे. 
या अधिसूचनेत म्हटले आहे की, मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 173 / 2010 दि. 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेला आदेश / निकालपत्रामध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन 1 मे, दिवाळी (लक्ष्मीपूजन), ईद-ए-मिलाद, ख्रिसमस, 31 डिसेंबर, माळेगाव यात्रा (लोककला महोत्सवासाठी) एक दिवस. तर गणपती उत्सव 2 दिवस (पहिला दिवस व अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव 3 दिवस (पहिला दिवस, अष्टमी व नवमी ), उर्वरित 2 दिवस ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या शिफारशी नुसार जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यक्रमासाठी गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिले जाईल.

या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सूट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधीत महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांनी ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत प्राप्त तक्रारीवर मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात विहित पद्धतीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सदर सण उत्सव समाप्तीनंतर लगेच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. ही अधिसूचना आदेश 17 जानेवारी 2022 रोजीपासून नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे, असेही अधिसूचनेत नमुद केले आहे.

..........
19
461 views    0 comment
0 Shares

*नांदेड जिल्ह्यात 451 व्यक्ती कोरोना बाधित*
▪️316 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड  दि. 18 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 566 अहवालापैकी 451 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 374 तर अँटिजेन तपासणीद्वारे 77 अहवाल बाधित आले आहेत.  जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 94 हजार 655 एवढी झाली असून यातील 88 हजार 900 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 655  रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 229, नांदेड ग्रामीण 34, भोकर 2, देगलूर 7, धर्माबाद 1, हिमायतनगर 1, हदगाव 2, किनवट 1, लोहा 11, मुदखेड 1, मुखेड 11, नायगाव 8, उमरी 18, बिलोली 4, हिंगोली 6, परभणी 15, औरंगाबाद 2, दिल्ली 1, हैदराबाद 8, वाशीम 1, लातूर 2, अमरावती 2, निझामबाद 2, कोल्हापूर 1, जालना 3, नागपूर 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 32, नांदेड ग्रामीण 2, अर्धापूर 2, बिलोली 19, धर्माबाद 6, हदगाव 2, मुखेड 10, नायगाव 4 असे एकूण 451 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 292, खाजगी रुग्णालय 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 17 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  

आज 3 हजार 100 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 610, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 433,  खाजगी रुग्णालय 15, हदगाव कोविड रुग्णालय 1, बिलोली कोविड रुग्णालय 2 अशा एकुण 3 हजार 100 व्यक्ती उपचार घेत आहेत.
*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.*

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 21 हजार 383

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 12 हजार 333

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 94 हजार 655

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 900

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.92 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-09

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-46

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 100

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


..........
0
0 views    0 comment
0 Shares

*नांदेड जिल्ह्यात 420 व्यक्ती कोरोना बाधित*
▪️201 कोरोना बाधित झाले बरे
 
नांदेड  दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 253 अहवालापैकी 420 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 385 तर अँटिजेन तपासणीद्वारे 35 अहवाल बाधित आले आहेत.  जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 94 हजार 205 एवढी झाली असून यातील 88 हजार 584 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 966  रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत नागरिकांनी व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
 
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 276, नांदेड ग्रामीण 41, भोकर 2, देगलूर 4, धर्माबाद 6, हिमायतनगर 1, कंधार 2, किनवट 22, लोहा 2, मुदखेड 2, मुखेड 5, नायगाव 1, उमरी 2, बिलोली 2, अर्धापूर 3, परभणी 2, उदगीर 4, हैदराबाद 1, यवतमाळ 1, वर्धा 1, जयपूर 1, हिंगोली 3, मुंबई 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 20, नांदेड ग्रामीण 2, देगलूर 6, धर्माबाद 7 असे एकूण 420 बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 164, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, खाजगी रुग्णालय 6, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 26 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  
 
आज 2 हजार 966 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 29, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 601, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 309,  खाजगी रुग्णालय 17, हदगाव कोविड रुग्णालय 1, बिलोली कोविड रुग्णालय 2 अशा एकुण 2 हजार 966 व्यक्ती उपचार घेत आहेत.
 
*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.*

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 
19 हजार 817
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 
11 हजार 273
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 94 हजार 205
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 584
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.3 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-22
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-111
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 966
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3
 
कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

..........
4
239 views    0 comment
0 Shares

*नांदेड जिल्ह्यात 643 व्यक्ती कोरोना बाधित* 
▪️95 कोरोना बाधित झाले बरे
 
नांदेड  दि. 16 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 385 अहवालापैकी 643 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 
558 तर अँटिजेन तपासणीद्वारे 85 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 93 हजार 806 एवढी झाली असून यातील 88
हजार 383 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला 2 हजार 
768 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, 
सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
 
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 325, नांदेड ग्रामीण 35, भोकर 3, देगलूर 9, धर्माबाद 14, हिमायतनगर 3, कंधार 19, किनवट 17, लोहा 15, उमरी 4, मुदखेड 47, मुखेड 18, नायगाव 2, अकोला 4, परभणी 19, लातूर 1, हिंगोली 2, जालना 4, वाशीम 7, बुलढाणा 1, अमरावती 1, तेलंगना 1, औरंगाबाद 2, दिल्ली 1, गोंदिया 1, गडचिरोली 1, यवतमाळ 1, भिवंडी 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 39, नांदेड ग्रामीण 2, अर्धापूर 1, भोकर 1, बिलोली 16, देगलूर 2, किनवट 4, मुदखेड 3, मुखेड 9, नायगाव 5, परभणी 1, हिंगोली 1, जालना 1 असे एकुण 643 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 86, खाजगी रुग्णालय 5, नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल मधील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.
 
आज 2 हजार 768 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 21, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 530, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 193, खाजगी रुग्णालय 17 अशा एकुण 2 हजार 768 व्यक्ती उपचार घेत आहेत.
 
*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती*.
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 18 हजार 564
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 10 हजार 573
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 93 हजार 806
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 383
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.21 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-9
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-87
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 768
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2
 
कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

..........
6
277 views    0 comment
0 Shares

नांदेड जिल्ह्यात 421 व्यक्ती कोरोना बाधित तर 62 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड () दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 818 अहवालापैकी 421 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 364 तर अँटिजेन तपासणीद्वारे 57 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 93 हजार 163 एवढी झाली असून यातील 88 हजार 288 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला 2 हजार 220 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 290, नांदेड ग्रामीण 17, भोकर 3, देगलूर 5, धर्माबाद 3, हिमायतनगर 1, कंधार 6, किनवट 1, लोहा 7, माहूर 1, मुदखेड 3, मुखेड 3, नायगाव 3, वाशीम 1, परभणी 6, हिंगोली 2, अकोला 1, अमरावती 1, जालना 2, पुणे 1, यवतमाळ 1, गडचिरोली 1, मुंबई 1, हैद्राबाद 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 17, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 2, भोकर 1, बिलोली 11, देगलूर 1, धर्माबाद 1, हदगाव 1, किनवट 3, माहूर 1, मुदखेड 4, मुखेड 11, नायगाव 3 असे एकूण 421 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 53, खाजगी रुग्णालय 3, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.

आज 2 हजार 220 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 6, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 477, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 697, खाजगी रुग्णालय 22 अशा एकुण 2 हजार 220 व्यक्ती उपचार घेत आहेत.

*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती*.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 16 हजार 179

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 8 हजार 927

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 93 हजार 163

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 288

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.76 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-33

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-108

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 220

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले 

..........
16
344 views    0 comment
0 Shares

*नांदेड जिल्ह्यात 553 व्यक्ती कोरोना बाधित*
▪️128 कोरोना बाधित झाले बरे
 
नांदेड दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 658 अहवालापैकी 553 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 475 तर अँटिजेन तपासणीद्वारे 78 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 92 हजार 742 एवढी झाली असून यातील 88 हजार 226 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 861 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
 
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 290, नांदेड ग्रामीण 31, अर्धापूर 7, भोकर 5, देगलूर 1, धर्माबाद 3, हदगाव 5, हिमायतनगर 1, कंधार 19, किनवट 25, लोहा 12, माहूर 2, मुदखेड 1, मुखेड 16, नायगांव 4, उमरी 2, अमरावती 7, औरंगाबाद 1, पुणे 3, हिंगोली 9, परभणी 20, नागपूर 1, वर्धा 1, वाशिम 3, यवतमाळ 1, कोल्हापूर 1, निजामाबाद 2, पंजाब 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 22, नांदेड ग्रामीण 4, भोकर 2, बिलोली 7, देगलूर 3, धर्माबाद 7, कंधार 33, किनवट 10, लोहा 1, माहूर 2, मुदखेड 2, मुखेड 9, नायगाव 6 असे एकूण 553 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 106, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 10, खाजगी रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  
 
आज 1 हजार 861 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 389, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 432,  खाजगी रुग्णालय 18 अशा एकुण 1 हजार 861 व्यक्ती उपचार घेत आहेत.
 
*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.*
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 14 हजार 361
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 7 हजार 671
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 92 हजार 742
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 226
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.13 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-56
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 861
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3
 
कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

..........
36
1201 views    0 comment
0 Shares

*नांदेड जिल्ह्यात 400 व्यक्ती कोरोना बाधित*
▪️72 कोरोना बाधित झाले बरे
 
नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 618 अहवालापैकी 400 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 343 तर अँटिजेन तपासणीद्वारे 57 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 92 हजार 189 एवढी झाली असून यातील 88 हजार 98 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 436 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, 
सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
 
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 
एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 240, नांदेड ग्रामीण 20, 
भोकर 1, बिलोली 3, देगलूर 2, धर्माबाद 10, हदगाव 1, हिमायतनगर 1, कंधार 4, किनवट 1, लोहा 9, मुदखेड 21, उमरी 3, परभणी 10, हिंगोली 2, वाशीम 1, अमरावती 1, कोल्हापूर 1, अकोला 4, पुणे 1, जालना 1, मुंबई 2, बीड 1, हैद्राबाद 1, उत्तरप्रदेश 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 11, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 3, बिलोली 2, धर्माबाद 10, हदगाव 2, किनवट 8, मुदखेड 2, मुखेड 7, नायगाव 1, उमरी 9, देगलूर 1असे 400 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 58, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, खाजगी रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  
 
आज 1 हजार 436 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 12, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 291, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1091,  खाजगी रुग्णालय 15 अशा एकुण 1 हजार 436 व्यक्ती उपचार घेत आहेत.
 
*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.*
एकुण घेतलेले स्वॅब- 
8 लाख 12 हजार 73
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 
7 लाख 6 हजार 13
एकुण पॉझिटिव्ह बाधितव्यक्ती - 92 हजार 189
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 98
एकुण मृत्यूसंख्या -
2 हजार 655
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.56 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-9
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-34
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 436
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.
 
कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
 

..........
11
396 views    0 comment
0 Shares

31
1447 views    0 comment
0 Shares

1
511 views    0 comment
0 Shares

*नांदेड जिल्ह्यात 474 व्यक्ती कोरोना बाधित*
▪️35 कोरोना बाधित झाले बरे
 
नांदेड) दि. 11 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 17 अहवालापैकी 474 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 435 तर अँटिजेन तपासणीद्वारे 39 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 789 एवढी झाली असून यातील 88 हजार 26 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 108 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
 
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 328, नांदेड ग्रामीण 23, अर्धापूर 5, देगलूर 9, हदगाव 1, हिमायतनगर 1, कंधार 14, किनवट 1, लोहा 17, मुदखेड 2, मुखेड 11, नायगाव 1, उमरी 1,  परभणी 5, अकोला 2, अहमदनगर 1,हिंगोली 7, पुणे 1, अमरावती 1, वाशीम 1,  पंजाब 2, उत्तराखंड 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 18, बिलोली 6, देगलूर 1, हदगाव 4, किनवट 3, मुदखेड 4, मुखेड 1, नायगाव 1, लातूर 1 असे  एकुण 474 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 29, खाजगी रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  
 
आज 1 हजार 108 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 13, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 205, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 853,  खाजगी रुग्णालय 10 अशा एकुण 1 हजार 108 व्यक्ती उपचार घेत आहेत.
 
*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती*.
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 10 हजार 455
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 4 हजार 838
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 789
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 26
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.90 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-13
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-45
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 108
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4
 
कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

..........
25
943 views    0 comment
0 Shares

2
364 views    0 comment
0 Shares