logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

व्हॉट्स अप व्हिडीओ कॉलमधून तरुणीचे अश्लील फुटेज? नाशिकमधील घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांचा 1350 किमी प्रवास...

 नाशिक : हल्ली मैत्री आणि ओळखीची समीकरणं ही बहुतांशी सोशल मीडियावर आधारल्याचं पाहायला मिळतं. मात्र, याच सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक, नोकरीचं आमिष, आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणं ही आणि अशी अनेक गुन्हेगारी कृत्यसुद्धा घडताना दिसतात. असाच एक प्रकार नाशिकमध्ये घडला. ज्याचं कनेक्शन थेट उत्तराखंडपर्यंत असल्याचं पाहायला मिळालं. (Nashik News)

नाशिकमध्ये पुन्हा खळबळ, यावेळी काय घडलं? 

‘शिया भास्कर’ या नावाने बनावट इन्स्टाग्राम (Instagram) प्रोफाईल तयार करून संशयित आरोपी अजीम अहमद, राहणार गदरपूर, उत्तराखंड याने नाशिकच्या बागलाण मधील तरुणीशी संपर्क साधला होता. तिला नोकरीचं आमिष दाखवलं. यानंतर आरोपीने वारंवार व्हिडिओ कॉल करून तिला त्रास दिला. तरुणीने प्रतिसाद देणं बंद केल्यानंतर आरोपीने व्हिडिओ कॉलवरील स्क्रीनशॉट एडिट करून अश्लील फोटो तयार केले.

हे फोटो तिच्या होणाऱ्या पतीसह नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. तसंच तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून तिची खासगी माहिती व्हायरल करण्यात आली. तरुणीची 30 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आणि प्रकरण विकोपास गेलं. 
अखेर या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 1350 किलोमीटरचा प्रवास करून पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पोलीस हवालदार योगेश शेवाळे, पोलीस शिपाई कदम यांच्या पथकाने उत्तराखंडमधील गदरपूर इथं जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतलं. 
सदर कारवाईनंतर आरोपीला सटाणा इथं आणण्यात आलं. जिथं त्याच्याकडून वापरण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यासाठी आणि सखोल तपासासाठी अटक करण्यात आली. पुढील तपास सटाणा पोलीस करत असून आता त्यानं हा गुन्हा नेमका कसा आणि का केला याबाबतची माहिती समोर येईल. 

नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी... 

काही दिवासंपूर्वीच नाशिकमधील अशोक खरात प्रकणाचा खुलासा झाला आणि त्यानंतर मागोमाग नवनवीन खुलासे होताच एकच खळबळ माजली. खरातचे कारनामे यंत्रणांनाही धक्का देऊन गेले. मागोमागच नाशिकमधील एकका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणानंसुद्धा सामान्यांना धक्का दिला. कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या घटन पचत नाहीत तोच आता याच नाशिकमधून पुन्हा एकदा आणखी एका गुन्ह्यानं डोकं वर काढलं. एक असा गुन्हा ज्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी हजारो किमीचा प्रवास केला. ही सर्व प्रकरणं पाहता एकंदरच गुन्हेगारांना कठोर शिक्षा देत कायद्याचा धाक वाढवण्याचीच गरज आहे असा सूर सामान्य जनता आळवतेय. 

24
1363 views

Comment