logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*कवयित्री शालिनीताई भालेराव यांच्या "शाल हि काव्यरत्नांची" काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न!*


डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन , मातृभूमी प्रबोधन समिती सभागृह जेलरोड येथे कवयित्री शालिनीताई‌ भालेराव यांचा "शाल ही काव्यरत्नांची" कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते विश्वशांतीदूत भगवान गौतम बुद्ध व भारतीय संविधान निर्माते डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलंनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
अतिशय प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीमध्ये श्रीमती शालिनीताई भालेराव यांनी कविता लिहून त्यांचा संग्रह प्रकाशित केला.उपासना प्रकाशनच्या माध्यमातून त्यास मुद्रांक करण्यात आले.सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून काव्य मंचावर
श्रीमहामंडलेश्वर डॉ. राखी नंदगिरी महंत , जेष्ठ नेते साहित्यिक कवी अविनाश आहेर , त्र्यंबक गायकवाड , माणिक साळवे , जेष्ठ नेत्या श्रीमती अनिताताई डांगळे ,प्रसाद जमखिंडकर, सुधीर भालेराव,शिशुपाल पराड , सामाजिक कार्यकर्त्यां सुशिलाताई जाधव, संगीत तज्ञ वडनेरकर सर, साहित्यिक कवी प्राध्यापक गंगाधर आहेर, कैलास तेलोरे, पद्माकर जाधव, आदिती बागुल,मेघा निकम, साहित्यिक कवी/पत्रकार रत्नदीप जाधव( राजरत्न), युवा नेते स्वप्नील चंद्रमोरे ,अँड. यश जमखिंडीकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन
जावई आणि मुलीसह जितेंद्र जी दिवे आणि भालेराव परिवार यांनी केले होते.

56
3907 views

Comment