logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मराठी चित्रपटाबाबत सॅन्सॉरच्या आडवणुकीचा पाढा अखेर पर्यंत मांडणार-निगळ लवकरच मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांचे कडे कैफियत मांडणार......


नाशिक प्रधानमंत्री या विकास गाथा असलेल्या मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी गेलें न आठ महिन्यापासून मुंबईतील सेन्सॉर बोर्डाकडे वारंवार चकरा मारल्या, परिणामी सेन्सॉर बोर्डाने - सुचवलेल्या अनेक दृष्यांना कात्री न लावल्यावर ही संबंधीत बोर्डाचा - अमराठी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी - प्रमाणपत्र देत नाही वरून केंद्रीय - सूचना प्रसारण मंत्री यांच्या कडून - सूचना आल्यास मी प्रमाणपत्र देईल असा जाणूनबुजून छळ केला जात आहे.

या बाबतीत नाशिकच्या - आमदार सीमाताई हिरे यांना संबंधित चित्रपटाचा प्रोमो दाखवून सेन्सॉर बोर्डाची मराठी चित्रपट - निर्मितीसाठी झालेली अडवणूकीचा पाढा प्रधानमंत्री या आगामी मराठी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक देवीदास निगळ यांनी मांडला, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना भेटून सेन्सॉर - कडून होणारा असह्य त्रास मांडला - जाणार असल्याची माहिती निर्माते देवीदास निगळ यांनी दिली.

निगळ फिल्म प्रोडक्शन निर्मित मराठी प्रधानमंत्री या चित्रपटातुन एक सामान्य शेतकरी आपल्या सामाजिक प्रामाणिक विश्वासावर आदर्श सरपंच, मुख्यमंत्री व प्रधानमंत्री कसा बनतो त्यासाठी त्याने शेतकरी गोरगरीब जनतेसाठी केलेली काम त्यासाठीची यशस्वी धडपड मांडणारा प्रयत्न यातून केला आहे, मराठी भाषा, मराठी माणूस, व मराठी कला चित्रपट यांच्या साठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा राज्यशासनाने दिला, मात्र मराठी माणसाने स्वतःची जमीन विकून आपल्या व्यासंगी पणा मूळ 'प्रधानमंत्री' हा मराठी चित्रपट निर्मिलेला आहे तो

प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाला मराठी नव्हे परप्रांतातील अमराठी अधिकारी नेमलेला आहे, ज्याला धड मराठी समजत नाही अश्या अधिकाऱ्याने सुचवलेल्या सर्व पूर्तता केल्यावर ही आम्हांला प्रमाणपत्र दिले नाही अशी जीवघेणी अडवणूक केल्याची तक्रार निर्मात दिग्दर्शक देवीदास निगळ यांनी आमदार सीमाताई हिरे यांचेकडे मांडली त्यांनी मुख्यमंत्री महोदया मार्फत पुढील प्रयत्न करू असे सांगितले, यावेळी प्रधान मंत्री चित्रपटातील कलाकार भारूडकार राजेंद्र महाराज काळे, कलाकार राम खुर्दळ, तांत्रिक साहाय्यका आतिष निगळ हे यावेळी उपस्थित होते.

107
3125 views

Comment