*२० लाखांसाठी 67 तोळे सोन्याचे दागिने ठेवले गहाण..... व्याजासहित 24 लाख चुकते करूनही सोने देण्यास नकार...* *कुर्ला पोलिसात तक्रार......!
मुंबई, उपनगरातील कुर्ला पोलीस ठाण्यात गंभीर अशी तक्रार नोंद करण्यात आल्याने त्याची आता सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे. मुंब्र्यात राहणाऱ्या एका कंत्राटदाराने वर्षभरापूर्वी 67 तोळे सोन्यांचे दागिने घाण ठेवून वीस लाख रुपये घेऊन ही रक्कम वर्षभरात व्याजासहित 24 लाख रुपये चुकती करूनही आणि केली असतानाही त्याचे दागिने परत करु न पाहणाऱ्या खाजगी सावकाराविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नाही . या प्रकरणी पीडितने जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने अतिरिक्त मुंबई पोलीस आयुक्त लखमी गौतम यांना स्वतः संरक्षणासाठी साकडे घातले आहे. 67 तोळे सोन्याचे दागिने अडकल्याने संबंधित पीडित यादव कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. . सुभाष राजाराम यादव असे ह्या पीडित कंत्राटदाराचे नाव असून त्याने वर्षभरापूर्वी 20 लाख रुपयांची गरज असल्याने खाजगी सावकार म्हणून खंडू काळभोर याच्याशी संपर्क साधला. वीस लाख रुपये देण्यासाठी 67 तोळे सोन्याचे दागिने घाण ठेवण्याचे ठरविले. व्याजासहित मूळ रक्कम परत मिळाल्यानंतर 67 तोळे सोन्याचे दागिने देण्याचा व्यवहार ठरविला होता. त्याप्रमाणे पीडित यादव याने व्याजासहित 24 लाख रुपये काळभोर याला चुकते केले. मात्र त्याने संपूर्ण सोने परत देण्याचे सांगताच काळभोर याच्याकडून टाळाटाळ करण्यात आली. उलट त्याला जीवे मारून टाकण्याचे धमकविण्यात आल्याने त्याने कुर्ला पोलीस ठाण्यात धाव घेऊन न्यायासाठी तक्रार केली. मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची बाब त्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने मुंबई पोलीस अतिरिक्त आयुक्त लखमी गौतम यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांची भेट घेतली. या प्रकरणाची मुंबईभर प्रसार माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता मुंबई पोलीस यादव कुटुंबाला न्याय मिळवून देणार का ? याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. संबंधित संशयित काळभोर याच्याविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात भादवि कलम 316, 2/३१८,२ अन्वे गुन्हा नोंद झाला आहे. आज संपूर्ण सोने आणि पैशांचा व्यवहार कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशनच्या बाजूला असणाऱ्या राम महल हॉटेलमध्ये झाल्याची नोंद झाली आहे.