नवरीच्या घराजवळच
वऱ्हाडावर काळाचा घाला!
टेम्पोसह आणखीन 2
वाहनांचा भीषण अपघात, 13
जणांचा करूण अंत....
पालघरमधून अपघाताची धक्कादायक आणि अत्यंत काळीज पिळवटून घटना समोर आली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूच्या धाणीवरी येथे वऱ्हाडाच्या टेम्पोसह आणखीन 2 वाहनांचा भीषण अपघात झाला. यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय. तर 25 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी आहेत. साखरपुड्याचा सोहळ्यासाठी आनंदाने निघालेल्या 100 हून अधिक वऱ्हाडाच्या टेम्पोला नवरीच्या घराजवळ अपघात झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हे वऱ्हाड डहाणूच्या बापूगावमधून धानिवरी गावात साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी येत होते. मात्र एक किलोमीटरचा वळसा घालून न येता या वराड्याच्या टेम्पो चालकाने आऊटसाईडने टेम्पो नेण्याचा प्रयत्न केला आणि वऱ्हाडावर काळाने घाला घातला.
याच वेळी गुजरातहून मुंबईकडे येणारा एक भरधाव कंटेनर बाईक स्वाराला चिरडून थेट या वराडाच्या टेम्पोवर जाऊ धडकला. या भीषण अपघातात कंटेनर आणि टेम्पो खाली चिरडून 13 जणांचा मृत्यू झाला असून 25 पेक्षा अधिक वऱ्हाडी सध्या गंभीर जखमी आहेत. दरम्यान पालघरचे खासदार हेमंत सावरा आणि पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली.
यावेळी जखमींवर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असा आश्वासन खासदार हेमंत सावरा यांच्यासह पालघर चे पोलीस अधीक्षक यतीस देशमुख यांनी दिलं. तसंच मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून पाच लाखांची मदत जाहीर केली गेली आहे. तर जखमी पूर्ण बरे होईपर्यंत त्यांचा संपूर्ण खर्च शासन करणार आहे.
13 जणांचा करूण अंत
1. सुरेश रत्ना लाखात
2. पांडू गणपत लाखात
3. काळू गोविंद लाखात
4.आयुष सिताराम लाखात
5.सारिका संतोष लाखात
6. रियांशी संतोष लाखात
7.नमिता विठ्ठल दांडेकर
8.सुनील अर्जुन दांडेकर
9.चिमा गोविंद कुरहाडा
10. वंदना शिवराम वळवी
11. सलोनी शिवराम वळवी
12. अजय अहाडी
13.सागर नामदेव शेंडे