logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून उमेदवारी नाकारणे म्हणजे दलित समाजावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस सरकारचा अन्याय....

*ज्येष्ठ रिपब्लिकन कामगार नेते प्रकाश बनसोडे यांचा घरचा आहेर.....* . मुंबई. . सध्या मागासवर्गीय उपवर्गीयकरणाचा वाद सुरू असतानाच राज्य सरकारने मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून उमेदवारी नाकारण्याचा निर्णय हा दलित विरोधी असून तो अन्याय करणार आहे, हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी करीत जोरदार टीका रिपब्लिकन आठवले गटाचे ज्येष्ठ रिपब्लिकन व कामगार नेते प्रकाश बनसोडे यांनी केला आहे. त्यामुळे राज्य सरकारला सत्तेत असणाऱ्या आठवले गटाकडून घरचा आहेर मिळाला आहे. . मागासवर्गीय मध्ये उपवर्गीय करून 59 जातीमध्ये फूट पाडण्याचा सरकारी कुटील डाव असून त्या विरोधात सर्वच रिपब्लिकन आंबेडकरी जनतेतून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. या मागणीला कडाडून विरोधी केला जात आहे. उपवर्गीयकरणामुळे मातंग आणि बौद्ध समाजामध्ये दुही निर्माण झाले असून तशा 50 हजारांनी अधिक हरकती सरकार दरबारी नोंद झालेली आहे. सरकारने हा निर्णय त्वरित माघार घेण्यात यावा अन्यथा मागासवर्गीय आणि दलित संघटनांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, अशी नाराजी ही प्रकाश बनसोडे यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण आयुष्य सरकारी नोकरीमध्ये आणि कामगार चळवळीमध्ये काढल्या असताना कोणत्याही सरकारने असा निर्णय कदाचित घेतला नव्हता. मागासवर्गीयांना खुल्या जागेत उमेदवारी देणे हे आवश्यक असताना त्यांचीही सवलत काढून घेणे हा त्यांच्यावर एक प्रकारे मोठा अन्याय असल्याची गंभीर बाब कामगार नेते प्रकाश बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केली आहे.

50
2317 views

Comment