logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या 'व्हॉट्सॲप चॅटबॉट'सेवेस सुरुवात,* *एकाच क्लिकवर मिळणार अर्जाची स्थिती व मार्गदर्शन

*

नांदेड, दि.14 मे : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक तसेच गट कर्ज योजनांतील लाभार्थ्यांना अधिक सुलभ, पारदर्शक व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 'व्हॉट्सॲप चॅटबॉट' सेवा सुरू करण्यात आली आहे. "One Click Information" या विशेष संकल्पनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या सुविधेमुळे आता लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जासंबंधित संपूर्ण माहिती आणि विविध प्रक्रियांची सद्यस्थिती थेट व्हॉट्सॲपवर तत्काळ प्राप्त होणार आहे.

या अत्याधुनिक सुविधेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ८९७६८५५९२१ या क्रमांकावर "Hi" असे लिहून पाठवायचे आहे. हा मेसेज पाठवताच लाभार्थ्यांसमोर एक मेनू उपलब्ध होईल, ज्यामध्ये महामंडळ व योजनांची माहिती, नवीन नोंदणी संदर्भातील मार्गदर्शन, पात्रता प्रमाणपत्र स्थिती व ते डाउनलोड करण्याची सुविधा, बँक कर्ज मंजुरी स्थिती आणि व्याज परतावा दावा स्थिती यासारखे पर्याय मिळतील. सुरक्षा लक्षात घेता या सर्व सेवा ओटीपी आधारित पडताळणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, अर्जाच्या विविध टप्प्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रशिक्षण व्हिडिओ आणि तांत्रिक अडचणी नोंदवण्यासाठी 'तिकीट जनरेशन' सुविधाही यात अंतर्भूत आहे.

या नवीन प्रणालीमुळे लाभार्थ्यांच्या कार्यालयीन फेऱ्या पूर्णपणे कमी होणार असून अर्ज प्रक्रियेत मोठी पारदर्शकता व गतिमानता येईल. परिणामी, लाभार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. महामंडळाने यापूर्वीच अधिकृत 'मोबाईल ॲप' देखील सेवेत आणले आहे. यासोबतच, लाभार्थ्यांच्या व्यवसाय विस्तारासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर व्यवसायवर्धन टॅब सुरू करण्यात आला असून, याद्वारे भविष्यात E-Market Place चे व्यासपीठ तयार करण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. आगामी काळात थेट व्हॉट्सॲपवरूनच एल.ओ.आय. अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू असून, सर्व लाभार्थ्यांनी या डिजिटल साधनांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन महामंडळाचे नांदेड जिल्हा समन्वयक यांनी केले आहे.

16
1132 views

Comment