logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली* *7 कोटीं 68 लाख रुपयांची तडजोड*

नांदेड, दि. 12 मे : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र के. ब्रह्ये यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार 9 मे, 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालायात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, दिवाणी व फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरण, एन.आय. अॅक्टची प्रकरणे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची वाद पूर्व मालमत्ता कराची प्रकरणे, गुन्हा कबुलीची प्रकरणे, आरटीओ व रेल्वे पोलीस विभागाची प्रकरणे, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच प्रकरणे, सर्व बॅक प्रकरणे, फाईनान्स कंपनीची प्रकरणे, पंचायत समिती कर वसुली व दाखलपूर्व प्रकरणे, बि.एस.एन.एल. कंपनी प्रकरणे, एम.एस.ई.डी.सी.एल. कंपनी ईत्यादी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्या करीता जिल्हयात एकुण 30 पॅनल तयार करण्यात आले होते.

शनिवार 9 मे रोजी झालेल्या लोक न्यायालयात नांदेड जिल्ह्यातील न्यायालयातील प्रलंबीत एकुण 11 हजार 704 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 719 प्रकरणे निकाली व जवळपास 5 कोटी 33 लाख 88 हजार 823 रुपयांचे तडजोड मुल्य होते. मालमत्ता थकबाकी व पाणीपट्टी तसेच दाखलपुर्व दावे 961 प्रकरणे निकाली निघाली त्याचे 2 कोटी 44 लाख 6 हजार 497 रुपयांचे तडजोड मुल्य होते. असे एकूण 1680 प्रकरणे निकाली निघाली आणि तडजोड मुल्य 7 कोटी 68 लाख 49 हजार 320 रूपये एवढे आहे.

विषेष म्हणजे 30 लाख रूपयेचे दिवाणी प्रकरण या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली निघाले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी राष्ट्रीय लोकअदालतीसाठी सहभागी झालेल्या सर्व पक्षकार, न्यायाधीश वर्ग, कर्मचारी वर्ग त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मा

1
78 views

Comment