नांदेड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन निवडणुकीचे मतदान 31 मे रोजी आहे
नांदेड :नांदेड जिल्हा केमिस्ट ॲन्ड अँड ड्रगिस्ट निवडणुक असो . च्या निवडणुकीचे मतदान दिनांक 31 मे रोजी होणार आहे .सध्या नांदेड जिल्ह्याच्या अध्यक्षपदासाठी होलसेल केमिस्ट विरुद्ध रिटेल केमिस्ट असा सामना होणार आहे .अनेक वर्ष होलसेल केमिस्ट नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष पद भूषविले आहे .आता एकदा संधी ग्रामीण रिटेलर केमिस्ट ला द्यावी अशी मागणी ग्रामीण औषधी विक्रेत्यांची आहे .नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील रिटेलर चे बैठका घेणे सुरू आहेत.नांदेड जिल्ह्यातील रिटेल औषधी विक्रेते एकवटले आहेत .नांदेड शहरातून होलसेल औषधी विक्रेते पण अध्यक्षपदासाठी धावपळ करीत आहेत .नांदेड जिल्ह्यात होलसेल विक्रेते पेक्षा रिटेल औषधी विक्रेते जास्त आहेत .केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथराव शिंदे यांच्या मते बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे .असे विश्वासनीय सुत्रा कडून कळते .नांदेड जिल्ह्यातील केमिस्ट संघटनेचे केमिस्ट च्या बैठकी घेणे सुरू झाले आहे .