logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

साधना हायस्कूलच्या सोमेश्वरी जाकरे हिचे दहावीत घवघवीत यश89 टक्के गुणांनी उत्तीर्ण; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

देगलूर : येथील साधना हायस्कूल मधील विद्यार्थिनी सोमेश्वरी जाकरे हिने दहावीच्या परीक्षेत 89 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सोमेश्वरी हिने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत व पालक-शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. शाळेच्या निकालातही तिने विशेष प्राविण्य मिळवत आपले व शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शिक्षकांनी तिचे कौतुक केले आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यादव बतुलवार सर यांनी सोमेश्वरीच्या यशाबद्दल अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि नियमित अभ्यास यांच्या जोरावर विद्यार्थ्यांना यश मिळते, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
सोमेश्वरी जाकरे हिच्या यशाबद्दल विविध सामाजिक संघटना, नागरिक व मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून तिच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छांचा वर्षाव हो

67
2813 views

Comment