जनगणनेसाठी नांदेड तहसील प्रशासन सज्ज**स्वगणना सुरू तर 16 मे ते 14 जूनपर्यत होणार घरांची नोंदणी*
नांदेड दि. 5 मे:- भारत सरकारतर्फे भारताची जनगणना अंतर्गत जनगणना 2027 ही देशव्यापी महत्त्वपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना स्वगणना (Self Enumeration) तसेच प्रत्यक्ष घरभेटीद्वारे होणाऱ्या लोकसंख्या गणनेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.
जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असून, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, शासकीय योजना यांचे प्रभावी नियोजन यासाठी अचूक लोकसंख्येची माहिती आवश्यक असते.
*स्वगणना (Self Enumeration)*
नागरिकांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे स्वतःची व कुटुंबाची माहिती अचूक व वेळेत भरावी. स्वगणना ही सोपी, सुरक्षित व वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे. योग्य माहिती देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
भारताची जनगणना 2027 ची सुरुवात दिनांक 16 मे 2026 पासून सुरू होणार आहे व स्व जनगणनेद्वारे दिनांक 1 मे 2027 पासून सुरु झाली आहे. स्व जनगणना ही 1 मे 2027 ते 15 मे 2027 या कालावधीमध्ये सर्वांनी करून घ्यावी. स्वगणना म्हणजे स्वतःच्या कुटुंबाची माहिती स्वतः नोंदविणे ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे यात आपण आपली व आपल्या कुटुंबाची अचूक माहिती नोंदवण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी त्यासाठी जनगणना संचालनालयाने https://se.census.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ तयार केले आहे. स्वगणनेचे टप्पे खालील प्रमाणे आहेत.
1. वरील संकेतस्थळावर लॉग इन करा. आपले राज्य व आवश्यक माहिती भरा 2.कुटुंबप्रमुखाचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी नोंदवा. मोबाईल नंबर प्रत्येक कुटुंबासाठी वेगवेगळ्या वापरावा एकदा नोंदणी केलेला मोबाईल नंबर पुन्हा बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी. 3.आपल्या सोयीची भाषा निवडा आणि मोबाईलवर आलेला ओटीपी नमूद करा. 4.स्थानाबाबत जिल्हा तालुका शहर व स्थानिक माहिती अचूक भरा .
5.नकाशावर आपल्या घराचे अचूक स्थान मार्क करा .6 .प्रश्नावली भरा कुटुंब प्रमुख कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती व्यवस्थित भरा.
7 .भरलेली माहिती पुन्हा तपासा आणि आवश्यकता भासल्यास दुरुस्ती करा 8 फायनल सबमिट करा. त्यानंतर आपल्याला एक कोड नंबर प्राप्त होईल ज्याला आपण SE ID म्हणतो तो आपण जतन करून ठेवावा अथवा स्क्रीन शॉट काढून ठेवावा. तुम्हाला ई-मेलवर व टेक्स्ट मेसेज सुद्धा याचा प्राप्त होईल.
यानंतरच्या टप्प्यात दिनांक 16 मे नंतर जनगणना प्रगनक आपल्या घरी भेट देऊन माहितीशी पडताळणी करतील. त्यांना अचूक माहिती तुम्ही देणे आवश्यक आहे. त्यावेळी आपण त्यांना स्वगणना केल्यानंतर जो SE ID प्राप्त झाला आहे तो प्रगनकाला द्यावा.
दिनांक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये घरांची माहिती घर नोंदणी व निवास माहिती House Listing टप्पा पार पडणार आहे व फेब्रुवारी 2027 मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणी होणार आहे.
नांदेड तालुक्यामध्ये महानगरपालिका क्षेत्राची जनगणनाबाबत प्रक्रिया नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्यामार्फत राबविली जाणार आहे. नांदेड ग्रामीणची जनगणना नांदेड तहसील कार्यालयामार्फत राबविली जाणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण जनगणनेसाठी प्रशासकीय पूर्ण तयारी झाली आहे. नांदेड ग्रामीण मध्ये 275 प्रगनक व 50 पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे चार टप्प्यात प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी स्व जनगणना त्याचा लाभ 15 मे पर्यंत घ्यावा व 16 मे पासून प्रत्यक्ष प्रगनक आपल्या घरी आल्यावर आवश्यक ते सहकार्य त्यांना करावे असे आवाहन चार्ज अधिकारी तथा तहसीलदार नांदेड संजय वारकड यांनी के