logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*"विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व्यक्तिमत्त्व विकास सेमिनार आयोजित करून साजरी...!'*



मुक्तांगण इन्स्टिट्यूट या प्रशिक्षण संस्थेच्या वतीने नाशिकमध्ये महापुरुषांच्या विचारांना अपेक्षित असलेली जयंती साजरी करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थ्यांवर प्रचंड प्रेम होते.याकरीता त्यांनी शैक्षणिक संस्था उभ्या केल्या,कारण *"चांगला विद्यार्थी घडला,तर चांगला देश घडेल"*,यांची त्यांना जाणीव होती,याच त्यांच्या जाणीवेला आदर्श मानून बौद्ध समाजातील युवक आणि युवतींना हॉटेल सेवन स्काय येथे नॅशनल मोटिवेशनल ट्रेनर किरण मोहिते यांनी *PERSONALITY DEVELOPMENT* या विषयावर नॅशनल मोटिवेशनल स्पिकर किरण मोहिते यांनी बौद्ध समाजातील युवक आणि युवतींना प्रशिक्षण दिले.

विद्यार्थ्यांमधिल भिती जाऊन आत्मविश्वास निर्माण व्हावा,व आयुष्यात ते ही यशस्वी होऊ शकतात,हा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी अनेक प्रात्यक्षिके या प्रशिक्षणात घेण्यात आले, विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण मोफत मिळावे, यासाठी *नाशिकमधील सामाजिक जाणीव असलेले मा.मिनाज मिर्झा,मा.अमित रंगारी (USA),तमिळ फेडरेशनचे मा.सर्फराज भाई,मा.डॉ.विशाल जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.*

41
3714 views

Comment