logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*इगतपुरीचे तहसिल कार्यालयाचे सहाय्यक महेश दिनकर कुलकर्णी (महसूल अधिकारी संजय गांधी योजना) इगतपुरी यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!*


छत्रपती महामानव मौलाना आझाद विचार मंच व रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने,रेल्वेगाडीने नासिक ते इगतपूरी अपडाऊन प्रवास करणारे इगतपुरीचे तहसील कार्यालयाचे सहाय्यक महेश दिनकर कुलकर्णी (महसूल अधिकारी संजय गांधी योजना) इगतपुरी हे गुरूवार दि. गुरूवार ३० एप्रिल २०२६ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने,त्यांचा महामानव छत्रपती मौलाना आझाद विचार मंच व रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने,
बुधवार दि.२९ एप्रिल २०२६ रोजी, सायंकाळी:- ५:०० वाजता,
*ठिकाण:-इगतपुरी रेल्वे स्टेशन प्लाँट फार्म नंबर २ च्या, प्रतिक्षालयात महेश दिनकर कुलकर्णी यांचा पुष्पगुच्छ,शाल व सन्मान पत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.
निरोप समारंभा प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अँड.बाळासाहेब वाजे होते.तसेच सत्कार समारंभाचे आयोजन व संयोजन‌ अयाज अकबर खान(महामानव छत्रपती मौलाना आझाद विचार मंच व रेल्वे प्रवासी संघाचे संस्थापक माजी नगरसेवक इगतपुरी)यांनी केले होते.
याप्रसंगी कवी पत्रकार रत्नदीप जाधव(राजरत्न),
लक्ष्मण पाटिल(सचिव रेल्वे ठेका मजदूरी यूनियन शाखा इगतपुरी),मिलिंद हिरे सर, जीवनदास धैस, कैलास तिवारी, सतिश साबळे, बाळासाहेब खरात, मोईन शेख, तूषार साळूंके सर, विजय वाघ सर,आदी मान्यवर उपस्थित होते.

119
8581 views

Comment