logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*स्टार प्रवाह वाहिनीवरील, "मी होणार सुपर स्टार छोटे उस्ताद" ह्या कार्यक्रमात सहभागी असलेली नाशिकची कुमारी"अस्मिता गादेकर" पाच महिन्यांनंतर परतेय....

*स्टार प्रवाह वाहिनीवरील, "मी होणार सुपर स्टार छोटे उस्ताद" ह्या कार्यक्रमात सहभागी असलेली नाशिकची कुमारी"अस्मिता गादेकर" पाच महिन्यांनंतर परतेय आपल्या घरी!*

स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपर स्टार छोटे उस्ताद ह्या कार्यक्रमात सहभागी असलेली व संपुर्ण महाराष्ट्राला आपल्या आवाजाने मोहीत करणारी,
रसिकांची उर्त्फूतपणे दाद मिळवणारी,नाशिक जिल्ह्यातील लाडकी भिम कन्या अस्मिता गादेकर ही अंतीम फेरीत यशस्वी झाल्याबद्दल, बुधवार दि.२९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी :-६ वाजता महाराष्ट्राची महा गायिका (काटा लगा)फेम वैशाली सामंत. यांच्यासमवेत तीच्या मिरवणुकीचे आयोजन स्टार प्रवाह वाहीनी व अभिनव आदर्श मराठी शाळा यांच्या सहकार्याने करण्यात आलेले आहे.
ही मिरवणूक अस्मिताची आजी आरती विजय साळवे यांच्या "प्रेमानंद"ह्या निवास
स्थानावरुन निघणार आहे.
तरी सर्व संगीत प्रेमींनी तीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन अभिनव आदर्श मराठी शाळेच्या उच्च माध्यमिक प्राध्यापिका श्रीमती जयश्री ठाकरे मॅडम, अस्मिताची आई जयश्री संतोष गादेकर,
आजी आरती विजय साळवे.व अस्मिताचे मोठे पप्पा दिपक मुरलीधर शेजवळ यांनी केले आहे. तरी जास्तीत जास्त संगीत प्रेमींनी उपस्थित रहावे हिच नम्र विनंती!

124
971 views

Comment