नाशिकरोड येथे जेष्ठ कवी मित्रांची "काव्य महिफिल" उत्साहवर्धक वातावरणत संपन्न!......
सोमवार दि.२७ एप्रिल २०२६रोजी सकाळी १० वाजता,ठिकाण:- २०२, अथर्व, गणेशा व्हॅली, स्वागत लाॅन्स जवळ, सिन्नर फाटा, नाशिकरोड.
येथे निवडक कवि मित्रांच्या काव्य मैफिलीचे आयोजत करण्यात आले होते.
याप्रसंगी जेष्ठ संगीत विशारद कवीवर्य गायक गझलकार दत्ता जाधव,
जेष्ठ कवीवर्य:-रंगराज ढेंगळे,
जेष्ठ कवीवर्य भगवान हिरे,
जेष्ठ कवीवर्य:-नवनाथ वामन काळे,
जेष्ठ कवीवर्य:-काशिनाथ वेलदोडे,
जेष्ठ कवीवर्य:-अरूण घोडेराव,
जेष्ठ कवीवर्य रत्नदीप जाधव (राजरत्न),
जेष्ठ कांदबरीकार कवीवर्य:-अनिल मनोहर,
जेष्ठ कवयित्री:-पदमा निकम,
कवयित्री:-सालिया शेख,
जेष्ठ गायक:-दुष्यंत आनंदराव वाघ,
निसर्ग निकम, शैलजा भगवान हिरे, विठ्ठाबाई दत्ता जाधव,
आदी मान्यवर कवी कवयित्रींनी याप्रसंगी डाँ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर, आदी विविध विषयांवर आपल्या दमदार सकस कविता सादर करून, काव्य मैफिलीस रंगत आणली.
काव्यसमेलनांचे अध्यक्षस्थान:-दत्ता जाधव यांनी भूषविले.
काव्य मैफिलीच्या शानदार सुत्र संचालनाची धुरा अरूण घोडेराव व
अनिल मनोहर यांनी सांभाळली.
खेळीमेळीच्या विनोदपूर्ण वातावरणात, हसत खेळत मान्यवर कवी मित्रांची काव्य मैफिल उत्साहात संपन्न झाली!