logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

खत टंचाई, लिकींग व काळा बाजार रोखण्यासाठी ‍जिल्हाधीकाऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर धडक तपासणी



नांदेड, २५ नांदेड:- खरीप हंगामच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नवीन मोंढा, नांदेड येथील वसुंधरा फर्टीलायझर्स कृषी निविष्ठा विक्री केंद्रास तसेच गोदामास भेट देवून साठा केलेल्या खताची तपासणी केली तसेच श्री फर्टीलायझर्स कृषी सेवा केंद्र येथे अचानक भेट देऊन बाजारातील खते व बियाणे पुरवठा व विक्री संदर्भात माहिती घेतली. कृषी निविष्ठा विक्रेते यांचे परवाने, साठा रजिस्टर, इ-पॉस मशीनची तपासणी करून प्रत्यक्षात खताचा किती साठा आहे हे तपासले.

याबाबत कृषी निविष्ठा विक्रेते यांना इ-पॉस मशीन शिवाय खत विक्री करू नये तसेच खताची साठेबाजी करू नये अशा सूचना दिल्या. युरिया व डीएपीच्या विक्री बाबत जिल्ह्यातील सर्व कृषि क्रेंदाची खरीप हंगामपूर्व 100 टक्के तपासणी पूर्ण करण्याबाबत कृषि अधिकारी गुणनियत्रण तालुका नांदेड श्रीमती चातरमल यांना सुचना देण्यात आल्या. तसेच दर्शनी भागात फलक लावण्याबाबत सुचना दिल्या. ई-पॉस वरून खतांचा अहवाल काढून प्रत्यक्ष भौतीक साठ्यासोबत व साठा रजीस्टर सोबत जुळतो किंवा कसे याची पडताळणी केली. खत विक्रीच्या भौतीक बीलांची तपासणी केली व शेतकरी बांधवांनी प्रत्यक्षात ते खरेदी केल्याची खातरजमा केली.

शेतकऱ्यांना दर्जेदार व योग्य दरात कृषी निविष्ठा उपलब्ध होत आहेत का याची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी खत टंचाई, कृत्रीम साठेबाजी, लिकींग पद्धत व काळा बाजार होणार नाही यासाठी कडक सूचना दिल्या. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, खतांचा साठा लपून किंवा कृत्रीम टंचाई निर्माण करण्याऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. लिकींग पद्धतीने विक्री केल्यास व शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास तात्काळ परवाने निलंबीत करण्यात येतील असे स्पष्ट निर्देश दिले. ज्यादा दराने खत विक्री केल्यास संबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले. शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. बनावट व निकृष्ट दर्जाच्या निविष्टा विरूद्ध शून्य सहनशिलता धोरण राबवीण्याचे स्पष्ट केले. कृषी निविष्टा गुणवत्ता नियंत्रणासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणेबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या.


यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी विकास अधिकारी अनिल कुमार ऐतवाडे विभागीय तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, मोहीम अधिकारी सचिन कपाळे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अमोल पेकम तालुका गुणनियंत्रण निरीक्षक श्रीमती पुनम चातरमल, आरसीएफ जिल्हा प्रतिनिधी श्री. कापसे व इफको जिल्हा प्रतिनिधी श्री. घाडगे हजर होते.

1
66 views

Comment