*गांधीनगर मुद्रणालय कॉलनीत जयंतीनिमित्त निमंत्रित कवींच्या काव्य संमेलनात कवींनी दिली महामानवांना "काव्यमय सलामी"..... !*
सिद्धार्थ मित्र मंडळ प्रणित सेवास्तंभ प्रेस कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन तर्फे चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त गांधीनगर प्रेस कॉलनीत मान्यवर निमंत्रित कवी कवयित्रींच्या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सत्कारर्थी अनिताताई जाधव
/कांबळे, कमलबाई लोखंडे, सतिष गोविंद साळवे, यांना गुलाबपुष्प,शाल स्मृतीचिन्ह व धम्मसंस्कार पूजाविधी पुस्तिका प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर जेष्ठ कवीवर्य :- रंगराज ढेंगळे यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलनाची सुरुवात झाली.
संमेलनात ज्येष्ठ कवी काशिनाथ वेलदोडे, अनिल पगारे, प्रदीप जाधव, रत्नदीप जाधव (राजरत्न), हर्षेद्र जाधव,अनिल मनोहर, रविकांत शार्दूल,वंदनाताई गायकवाड,शालिनी भालेराव, आदिती बागुल, सालिया शेख,चंचल रत्नदीप जाधव, आदी कवी आणि कवयित्रींनी विविध विषयांवर एकापेक्षा एक सकस कविता सादर करून,उपस्थितांची दाद मिळवून,काव्य संमेलनास चार चाँद लावले.
सर्व कवी आणि कवयित्रींचा गुलाब पुष्प, स्मृती चिन्ह व धम्म संस्कार पूजाविधी पुस्तिका प्रदान करून,
गुणगौरव व सत्कार करण्यात आला.
काव्यसंमेलनाचे सुत्रसंचालन जेष्ठ कवी अशोक रामचंद्र भालेराव यांनी केले.
कवी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी
मंडळाचे पदाधिकारी चेतन दाणी,
प्रशांत आव्हाड,देवेंद्र जाधव,संदीप गायकवाड, दीपक घोलप,दिलीप
बोराडे, अनिल गायकवाड,जितेंद्र गवारे,सुनील उनवणे, देवेंद्र पगारे, सुनील पवार,शेखर साळुंखे,शरद
गायकवाड, योगेश भालेराव, दीपक साळवे,शिवपाल पंचभाई,अशोक भालेराव व लक्ष्मी भालेराव आदींनी परिश्रम घेतले.