logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पुण्यातील वकिलाच्या ऑफिसमध्ये गोणीत सापडला त्याच्याच सेक्रेटरीचा मृतदेह; हत्या करणाऱ्याचे नाव समजल्यावर पोलिसही हादरले.....

पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील वकिलाला त्याच्याच ऑफिसमध्ये त्याच्यात सेक्रेटरीची मृतदेह गोणीत सापडला. मृतदेह पाहून त्याने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली. मात्र, हत्या करणाऱ्यांची ओळख  नाव समजल्यावर वकिलच नाही तर पोलिसही हादरले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 
पुण्यात प्रेमाच्या संशयावरून एका महिलेनं पतीच्या सेक्रेटरीची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संजय सावंत, त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीला अटक केली. मृत महिला सावंतच्या मुंढवा भागातील कार्यालयात सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या. मात्र त्यांचे संजय सावंत यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय संजय सावंतच्या पत्नीला होता. या कारणावरुन तीनं मुलीच्या मदतीनं महिला सेक्रेटरीला दोरीनं बांधलं आणि बेदम मारहाण केली. यात महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी महिलेचा मृतदेह पोत्यात भरुन कार्यालयात लपवून ठेवला. मात्र मृत महिलेचा पती कार्यालयात दाखल झाल्यावर त्याला पोत्यात  भरलेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर चंदननगर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 6 तासातच तिनही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल  केलाय.

नेमकं काय घडलं?

भाजपच्या पुण्यातील विधी शाखेचा अध्यक्ष वकिल संजय सावंतला अनैतिक संबंधातून सेक्रेटरीचा खून केल्याबद्दल अटक करण्यात आली. संजय सावंत सोबत त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीलाही खुनात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. पुनम दिनेश मुन (वय 35 वर्ष)  असं हत्या झालेल्या महिलेच नाव आहे. 
पुनम मुन या वकिल संजय सावंतच्या मुंढवा भागातील कार्यालयात सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या. मात्र त्यांचे संजय सावंत यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय संजय सावंतची पत्नी स्वाती सावंतला होता. त्यातून पूनम मुन हिच्यासोबत त्यांचे वाद होत होते. 16 एप्रिलला संजय सावंतच्या कार्यालयात संजय सावंत, त्याची पत्नी स्वाती आणि अल्पवयीन मुलीने पुनम मुन यांना मारहाण सुरू केली. त्यानंतर पुनम यांचें पाय दोरीने बांधून त्यांना बॅटने मारहाण करण्यात आली. त्यामध्ये पुनम मुन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुनम मुन यांचा मृतदेह पोत्यात भरुन ते पोतं ऑफिसमध्येच लपवून ठेवण्यात आलं. 

दुसऱ्या दिवशी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या सावंत यांचा विचार होता. पुनम मुन यांचे पती उद्धव मुन यांनी त्यांची पत्नी घरी न आल्याने शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते एडव्होकेट संजय सावंतच्या कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालयात ऐक पोतं आढळून आलं. ते पोतं त्यांनी उघडून पाहिलं असतां आतमध्ये पुनम मून यांचा मृतदेह आढळून आलाय. पोलीसांनी संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला अटक केलीय.
याबाबत माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संजय सावंत आणि त्याच्या मुलीला ताब्यात घेतले. तर, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने स्वाती सावंत हिला ताब्यात घेतले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक नीलेश बडाख आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास लोणीकंद विभागाच्या सहाय्यक आयुक्त नूतन पवार करत आहेत.
 

24
713 views

Comment