अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
सध्या प्रचंड अडचणीतून जात आहे.....
निवडणूक न्यायालयीन वादात अडकली असल्याने
संस्थेला नवीन अध्यक्ष आणि कार्यकारणी मिळणे अवघड झाले आहे
त्यामुळे पंच्चेचाळीस हजार सभासदांचे भविष्य दावणीला बांधले गेले आहे
मराठी चित्रपट सृष्टीत चित्रपट निर्मात्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे
त्यांची समस्या सोडवणारी हक्काची संघटना स्वतःच समस्यांचा सामना करत आहे
आर्थिक व्यवहार प्रशासकाच्या हाती गेल्यामुळे कर्मचारी वर्गाचे पगार ही खोळंबले आहेत
सामान्य सभासदांना मिळणारी वैद्यकीय मदत वयस्कर लोकांना मिळणारी आर्थिक मदत बंद झाली आहे
सभासदांना वेळेवर संस्थेचे कार्ड मिळत नाहीय
संस्थेला वालीच कोणी उरला नाही म्हणून सभासद संख्या हळूहळू रोडावत चालली आहे
सभासद त्यांच्यावर अन्याय झाला तर कोणाकडे दाद मागू शकत नाही आहेत
अश्या वेळी पंच्चेचाळीस हजार सभासदांच्या पैकी मोजक्या पंचेचाळीस सभासदांनी एकत्र येऊन यावर तोडगा निघावा म्हणून प्रयत्न चालू केले आहेत
आठ दहा लोक न्यायालयात खटला लढत आहेत
त्याचा निकाल लागेल तेव्हा लागेल पण न्यायाच्या प्रतीक्षेत एवढ्या सभासदांचे भविष्य दावणीला बांधणे योग्य नाही ही विचार धारा घेऊन निवडणूक लवकरात लवकर लागावी आणि संस्थेला नवीन संचालक मंडळ लाभावे म्हणून प्रयत्न करणार आहेत
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सभासद....