*अनुसूचित जातीतील आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रस्ताव रद्द करा - महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे......*
*अनुसूचित जातीतील आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रस्ताव रद्द करा - महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे..*
नाशिक : भिमटोला सामाजिक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागाचे समाजकल्याण उपायुक्त श्री.माधव वाघ यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले..
निवेदनाचा आशय असा आहे की दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने एकल सदस्य अनंत बदर समिती ची स्थापना केली समितीने अनुसूचित जातीतील 59 जातींपैकी कुठल्याही जातीची किंवा प्रत्येक जातीचे प्रतिनिधी सदर समितीत नेमले नाही समितीने कधीही महाराष्टातील अनुसूचित जातीकडून उपवर्गिकरण संदर्भात कुठल्याही सूचना मागविल्या नाही अनुसूचित जातीना विश्वासात न घेता अतिशय गोपनीय पद्धतीने बदर समिती सशोधनाचे काम केले अनुसूचित जातींना सदर समिती समोर कुठलीही सुनावणीची संधि दिली गेली नाही त्या शिवाय समितीने जो अहवाल दिनांक 1एप्रिल 2026 रोजी मंत्रीमंडळ च्या बैठकीत दाखल केला सदर अहवाल हा नागरिकाच्या समक्ष ठेवण्यात आला नाही किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही अनुसूचित जातीतील जवळपास सर्वच जाती ह्या भारतीय संविधान कलम अनुषेद 341 प्रमाणे एकजिनसी वर्ग. Homegenious असून त्या सर्वांचाच मोठ्या प्रमाणात अनुसूचित जातीतील आरक्षणातील उपवर्गिकरनास विरोध असून राज्य सरकारने उपवर्गीकरणाचा प्रस्ताव रद्द करावा अन्यथा संघटना राज्य भर आंदोलन करेल याची दखल घ्यावी..
याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भीमश्री विजय राज पगारे शहर अध्यक्ष मुकुंद काळे तालुका नेते दिलीप दुनबळे युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी उपस्थित होते..!