बाबासाहेबांचे संविधान सर्वांचेच रक्षण करतय : प्रा.अमोल वाघमारे
भंडारली: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान तुमचं आमचं सर्वांचं रक्षण करते त्या संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी सज्ज राहिला पाहिजे असं मनोगत प्रा अमोलकुमार वाघमारे यांनी संघर्ष मित्र मंडळ भंडारली, शिळफाटा आयोजित भीम जयंती उत्सवात केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किशोर घाग हे होते
सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कृष्णा राठोड यांनी केले प्रतिमा पूजना नंतर मान्यवर वक्ते व अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला भीम जयंती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्याना पारितोषक वितरण करण्यात आले.
समाज प्रबोधनकार व्याख्याते प्रा अमोलकुमार वाघमारे यांनी बाबासाहेबांचा बालपण,रामजी आंबेडकर यांचे योग दान,शिक्षण, परदेशातील शिक्षण, त्यांना शाहू राजे व सयाजी राजे यांनी केलेली मदत त्यांच्या आवडी निवडी , त्यांनी स्त्रिया, कामगार व भारतीय नागरिकांसाठी केलेल्या कार्याची महती विविध उदाहरणासह समजून सांगितली. चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, माणगाव परिषद, संविधानाची निर्मिती या सगळ्या ठळक बाबींचा आपल्या मनोगत मधून उलगडा केला व अधिक चांगल्या पद्धतीने बाबासाहेबांचे कार्य समोर उपस्थित होते त्यांना समजेल अशा भाषेमध्ये सांगितले अध्यक्षीय मनोगतामध्ये किशोर घाग यांनी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचे काम केलं असे उद्गार काढले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल जाधव यांनी केले शेवटी आभार तुळशीदास बाबर यांनी मानले कार्यक्रमास बंदिस सोनवणे, संदेश तायडे, पडळकर साहेब यांच्यासह भंडारली व गोठेघर परिसरातील तरुण युवक ,माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष मित्र मंडळ भंडारली शिळ फाटा च्यावतीने मोठ्या उत्साहात भीमजयंती साजरी करण्यात आली.