... म्हणून सर्वांसमोर स्तनपान केल्यानंतरच लग्नमंडपाकडे रवाना झाला IPS अधिकारी.....
देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये लग्नासंदर्भात स्थानिक प्रथा आणि परंपरा पाळल्या जातात. अशाच अनेक शतकांपासूनच्या परंपरा पाळल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये राजस्थानचा समावेश होतो. याच राजस्थानमध्ये पुन्हा एकदा अशीच एक आगळी-वेगळी प्रथा नुकत्याच पार पडलेल्या आयपीएस अधिकाऱ्याच्या लग्नादरम्यान दिसून आली. बिश्नोई समाजातील या आयपीएस अधिकाऱ्याने स्वत:च्या लग्नाच्या दिवशी घरातून निघताना 'दूध पिलाई' प्रथा पूर्ण केली. शुन्यातून आयपीएस अधिकारी झालेल्या आपल्या घरातील लेकाच्या लग्नाच्या या प्रथेदरम्यान कुटुंबिय भावूक झाले.
लग्नासाठी मंडपाकडे जाण्याआधी...
राजस्थानमधील प्रथेप्रमाणे लग्नासाठी घरून घोड्यावर बसून नवरदेवाला विवाहस्थळी नेलं जातं. मात्र लग्नासाठी निघालेल्या लेकाला घोड्यावर बसण्याआधी आई 'दूध पिलाई' प्रथा पूर्ण करते. आयपीएस के. के. बिश्नोई यांनीही आपल्या आईकडून प्रतिकात्मकपद्धतीने 'दूध पिलाई'च्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने आशीर्वाद घेतला. त्यानंतरच आयपीएल बिश्नोई घोड्यावर बसून लग्नमंडपाकडे रवाना झाले.
'दूध पिलाई' प्रथा काय?
'दूध पिलाई' प्रथा ही पूर्णपणे प्रतिकात्मक असते. मुलगा लग्नासाठी निघताना त्याला लहानपणापासून आईने त्याच्यासाठी केलेला त्याग लक्षात रहावा म्हणून 'दूध पिलाई' प्रथा केली जाते. या माध्यमातून नवऱ्या मुलाने 'आईच्या दुधाचं कर्ज' लक्षात ठेवावं आणि वैवाहिक आयुष्याला सुरुवात करण्याआधी आपल्या आईचा आशीर्वाद घ्यावा अशी भावना असते.
प्रथांमध्ये थोडी बदल अन्...
मागील शेकडो वर्षांपासून ही प्रथा राजस्थानमधील अनेक ठिकाणी लग्न सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. वेगवेगळ्या समाजांमध्ये या प्रथेमध्ये छोटे बदल नक्कीच आहेत. मात्र यामागील भावना सारखीच आहे. आई आणि मुलाच्या नात्याला मुलाने संसार सुरु करण्यापूर्वी सन्मान देण्याचा हा सोहळा असतो. या माध्यमातून कौटुंबिक मूल्य आणि एकमेकांशी असलेलं भावनिक नातं पुन्हा अधोरेखित केलं जातं.
या प्रथेला खास महत्त्व काय?
आयपीएस बिश्नोई यांच्या लग्नामध्येही 'दूध पिलाई' प्रथा ही फार खास ठरली. या परंपरेच्या माध्यमातून आईसोबतच्या भावनिक नात्याची आठवण मुलाला करुन दिली जाते आणि त्यावेळी अनेकांचे डोळे इथपर्यंतचा प्रवास आठवून पाणावलेले असतात. आजच्या आधुनिक जगामध्येही या प्रथेला खंड न पडू देता ती आवर्जून लग्नाच्या वेळेस पूर्ण केली जाते.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेकांनी आजही ही प्रथा जपली जातेय याबद्दल या समाजाचं कौतुक केलं आहे.