logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल *सावळ्या विठ्ठला*


सांस्कृतिक कार्य विभागाची सांगीतिक मानवंदना

प्रख्यात संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल *सावळ्या विठ्ठला* हा सांगीतिक कार्यक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे

नांदेड, दि. 7 एप्रिल : ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल *सावळ्या विठ्ठला* हा सांगीतिक कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम गुरुवार, ९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कुसुम सभागृह, व्ही.आय.पी. रोड, नांदेड येथे संपन्न होणार आहे.

संगीतकार दशरथ पुजारी हे मागच्या पिढीमधील नामवंत संगीतकार आहेत .त्यांची सांगीतिक कारकिर्द खूप मोठी आहे . केशवा माधवा , देव माझा विठू सावळा , या लाडक्या मुलानो,झिमझिम झरती श्रावण धारा ,अजून त्या झुडुपांच्या मागे अशी अनेक गाणी रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य करत आहेत. त्यांच्या संगीतातील भक्तीविचारांनी महाराष्ट्रातील वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ केला आहे त्याच बरोबर भावसंगीत ही त्यांनी एका उंचीवर नेवून ठेवले आहे .त्यांच्या सांगीतिक कार्याचा आढावा आणि गाणी असा कार्यक्रम आयोजित केला आहे
या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना संगीतकार आनंदीविकास यांची असून सागर जाधव ,शेफाली कुलकर्णी ,वर्षा जोशी हे गायक कलावंत सहभागी असणार आहेत . विकास देशमुख , विवेक कयाळ,विश्वेश्वर कोलंबीकर,पंकज शिरभाते , भगवानराव देशमुख , श्रीनिवास लंकावाड,शेख नईम ,शेख इस्माईल हे वादक कलावंत सहभागी आहेत तर संवादक म्हणून पद्माकर कुलकर्णी असणार आहेत . आजच्या पिढीसाठी जुन्या संगीताचा प्रेरणादायी ठरणारा हा कार्यक्रम आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. ॲड. आशिष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

नांदेड व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संगीत ,साहित्यासह सर्वच रसिकांनी या विशेष कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मैफिल लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

4
387 views

Comment