logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पुणे हादरलं! 11 महिन्याच्या मुलाला आईनेच सिमेंट ओट्यावर आपटून संपवलं; कारण ऐकून पोलिसही सुन्न......

 पुण्यातील शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने आपल्या पोटच्या पोराचा बळी घेतला असून अत्यंत क्रूरपणे तिने आपल्या बाळाची हत्या केली आहे. विशेष म्हणजे ज्या कारणासाठी या महिलेने क्रूरपणे आपल्या मुलाची हत्या केली त्यामागील कारण ऐकून पोलीसही सुन्न झाले. नेमकं घडलं काय ते पाहूयात...

हत्या करुन मृतदेह बॅगेत भरला अन्...

मिळालेल्या माहितीनुसार अकरा महिने वयाच्या आपल्या पोटच्या पोराचा या नराधम आईने सिमेंट ओट्यावर आपटून जीव घेतला. एवढ्यावरच न थांबता आपण केलेल्या या कृत्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सदर महिलेले कापडाच्या बॅगमध्ये दगड व आपल्या मुलाचा मृतदेह ठेवून बॅग विहिरीमध्ये टाकून दिली होती. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या हत्येची माहिती समोर आल्यानंतर पोलीसही हादरुन गेले. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वडिलांनीच नोंदवली तक्रार

शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावाचे रहिवाशी रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात आपल्या अकरा महिन्यांच्या मुलाच्या मृत्यूची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फिर्यादी रवींद्र पवार यांची पत्नी पुजा रवींद्र पवार यांची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मुलाची अशी हत्या का केली याबद्दलचं धक्कादायक कारण या महिलेने सांगितले आहे.

हत्या करण्याचं कारण काय?

दुसरे लग्न करण्याचा विचार आपल्या डोक्यात असून मूल सोबत असेल तर दुसरे लग्न करता येणार नाही या उद्देशाने स्वतःच्या मुलाचाच जीव घेतल्याचे आरोपी पुजाने कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. ही हत्या करण्यासाठी पूजाला कोणी मदत केली का? पूजा कोणाला भेटत होती? तिचा कोणी प्रियकर आहे का? यासंदर्भातील चौकशी आता पोलिसांकडून केली जात असून आपल्याच पत्नीने आपल्या मुलाला संपवल्याची माहिती समोर आल्यानंतर रवींद्र पवार यांना मोठा धक्का बसला आहे. 

‘अडथळा’ वाटल्यानेच मुलाचा खून…

रांजणगाव पोलिसांनी केलेल्या पोलिस तपासात आरोपी पुजा हिने सांगितले की, कोकणातील मुरुड येथून फिरुन आल्यानंतर चिमुकला यश सतत रडत होता. याचाच राग मनात धरत तसेच मुलगा सोबत असेल तर दुसरे लग्न होणार नाही” या विकृत विचारातून तिने थेट स्वतःच्या लेकराचाच काटा काढण्याचा थरारक कट रचला. ही हकीगत ऐकल्यावर पोलिसही सुन्न झाले.

बॅग विहिरीत बुडून रहावी म्हणून...

आरोपी पुजाने आपला 11 महिन्याचा निष्पाप मुलगा यशचे डोके घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा जीव घेतला. एवढ्यावरच न थांबता, गुन्हा लपवण्यासाठी तिने रक्ताचे डाग पाण्याने धुऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मृतदेह कपड्यांच्या बॅगेत कोंबला. तसेच बॅग पाण्यात बुडून राहावी म्हणून त्यात दगड टाकले आणि थेट शेतातील विहिरीत फेकून दिला. या सगळ्या गोष्टी आरोपी पुजा हिने अगदी थंड डोक्याने केल्या.

74
1976 views

Comment