logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

'महिलांच्या स्तनांना स्पर्श करुन...'; उच्चभ्रू भागातील महिलांचाच करायचा विनयभंग; 29 व्हिडीओमध्ये 'सिरीयल मोलेस्टर' संतापजनक कृत्य......

 गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील बांगूर परिसरातील महिला दहशतीखाली होत्या. कारण एक सिरीयल मोलेस्टर रस्त्यावर कधीपण अचानक यायचा आणि महिलांच्या ब्रेस्टला स्पर्श करून पळून जायचा. आरोपी रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांना लक्ष्य करून अश्लील कृत्ये करायचा त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीदायक वातावरण होतं. घराबाहेर पडावे की नाही, अशी भीती महिलांमध्ये आली होती. पोलिसांकडे या धक्कादायक घटनेची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या  सराईत विनयभंग करणाऱ्याला  48 तासांत अटक केली आहे. त्यामुळे या परिसरातील महिलांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. 

असा लागला 'सिरीयल मोलेस्टर'चा छडा!

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 48 तास 29 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर त्याची ओळख पटवून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांच्या ताब्यात असलेला हा नराधमाची कसून चौकशी सुरु असून तो असं का करायचा याचा शोधता पोलीस आहेत. 

हे सगळं प्रकरण कुठून सुरु झालं?

ही घटना गोरेगाव पश्चिम मधील बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. या नराधमाने पहिल्यांदा 30 मार्च 2026 रोजी, रात्री सुमारे 9:30 वाजता, एक तरुणी घरी परतत असताना आरोपीने अचानक मागून येऊन तिचा विनयभंग केला आणि तो पळून गेला. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक प्रकरण पुढे आलं. पोलिसांना समजलं त्या असं त्या परिसरातील अनेक महिलांसोबत करत होता. त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीदायक वातावरण होत

सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी गजाआड

तपासादरम्यान, पोलिसांनी परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले आणि तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध घेतला. अखेरीस, पोलिसांनी आरे कॉलनीचा रहिवासी आणि फिल्म सिटीमध्ये काम करणाऱ्या 25 वर्षीय मुनवर नासिर खान याला अटक करुन पुढील तपास सुरु आहे. 

पोलीस तपासात मोठा खुलासा

पोलिसांच्या तपासात असे उघड झाले आहे की, आरोपी यापूर्वीही अशाच प्रकारच्या चार घटनांमध्ये सहभागी होता. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केलं गेलं आहे. 

173
7337 views

Comment