logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शेतकऱ्यांना मोठा दिलासा*

*शेतकऱ्यांना मोठा दिलासा*
*दोन लाखांपर्यत शेती किंवा पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क पुर्णपणे माफ*
नांदेड, दि. 24 मार्च :-महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून, दोन लाखांपर्यत शेती किंवा पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क दिनांक 1 जानेवारी 2026 पासून पुर्णपणे माफ केले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बँका, वित्तीय संस्थानी त्वरीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधिक्षक, पुणे यांनी दिले आहे.
सर्व बँका, वित्तीय संस्थाना शासन अधिसूचनेत नमुद केल्यानुसार शेती किंवा पीक कर्जाशी संबंधीत संस्थानी अभिस्वीकृती, रोखपत्र करारनामा, हक्कविलेख निक्षेप, हडप तारण किंवा तारण गहाण, हमीपत्र गहाणखत, प्रतिभुती बंधपत्र, गहाणखत, गहाणाचे सुचनापत्र किंवा घोषणापत्र किंवा यास संलग्न अशा कोणत्याही संलेखावर आकारणी योग्य असलेले दोन लाखांपर्यतचे मुद्रांक शुल्क पूर्णत: माफ करण्यात आले आहे. याबाबत काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश शासन अधिसूचनेद्वारे दिले आहेत.

3
129 views

Comment