logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*ऑल इंडिया कॉन्फरन्स बुद्धिजीवी संघटनेच्या राष्ट्रीय सेक्रेटरी पदी महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांची नियुक्ती.......!*

*ऑल इंडिया कॉन्फरन्स बुद्धिजीवी संघटनेच्या राष्ट्रीय सेक्रेटरी पदी महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांची नियुक्ती.......!*

नवी दिल्ली - नवी दिल्ली येथील हॉटेल ताज येथे ऑल इंडिया कॉन्फरन्स ची राष्ट्रीय बैठक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष छत्तीसगढचे माजी राज्यपाल के.एम.सेठ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली..
या बैठकीत संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांची राष्ट्रीय सेक्रेटरी पदी नियुक्ती करण्यात आली तसेच सिंगापूर येथे संघटनेचा वर्धापन दिन साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली..
गांगुर्डे यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या..
याप्रसंगी उत्तराखंडचे कायदा मंत्री जस्टिस राजेश टंडन, भारत सरकारचे पूर्व सचिव एन दिवान, इंफाळचे व्हाईस चान्सलर अब्दुल अफरोजल, राष्ट्रीय महासचिव ऍड. प्रकाश निधी शर्मा, ऍड. हरिशंकर शर्मा, बापूसाहेब गायकवाड, ऍड. अमित नलावडे, दिल्लीचे युवा नेते सत्यप्रकाश कर्दम, युवा नेते प्रशांत गांगुर्डे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते!
अनिलभाई गांगुर्डे यांची नियुक्ती झाल्याबद्दल, सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे!

56
6124 views

Comment