logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राज्य अजिंक्यपद रग्बीसाठी ठाणे जिल्हा संघाची निवड चाचणी आज कल्याणमध्ये ,

कल्याण : राज्य अजिंक्यपद रग्बी स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशनच्या वतीने वरिष्ठ गटातील पुरुष व महिला खेळाडूंची निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
ही निवड चाचणी आज दिनांक १६ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता कल्याण येथील बी. के. बिर्ला महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे.
या निवड चाचणीद्वारे राज्य अजिंक्यपद रग्बी स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्याचा संघ निश्चित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र आणि इच्छुक खेळाडूंनी या निवड प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
या निमित्ताने जिल्ह्यातील रग्बी खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची आणि राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे.

72
4911 views

Comment