logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली ३८ कोटींची तडजोड



नांदेड-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रह्मे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नरेंद्र के.ब्रह्मे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, दिवाणी व फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, एन.आय.अॅक्टची प्रकरणे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका वाद पुर्व मालमत्ता कराची प्रकरणे, गुन्हा कबुलीची प्रकरणे, आर.टी.ओ. व रेल्वे पोलीस विभागाची प्रकरणे, कौटुंबिक, कामगार, सहकार, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच प्रकरणे, सर्व बॅंक प्रकरणे, फायनान्स कंपनीची प्रकरणे, पंचायत समिती कर वसुली व दाखलपुर्व प्रकरणे, बि.एस.एन.एल. कंपनी प्रकरणे, एम.एस.ई.डी.सी.एल. कंपनी ईत्यादी प्रकरणे ठेवण्यात आली होती त्या करीता जिल्ह्यात एकुण 33 पॅनल तयार करण्यात आले होते.

दिनांक 14 मार्च 2026 रोजी झालेल्या लोक न्यायालयात नांदेड जिल्ह्यातील न्यायालयातील प्रलंबित एकूण 12629 प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 1135 प्रकरणे निकाली व जवळपास 298184502 रुपयांचे तडजोड मुल्य होते. मालमत्ता थकबाकी व पाणीपट्टीची 4528 प्रकरणे निकाली निघाली व 45638383 रूपयांचे तडजोड मुल्य होते. असे एकूण 6199 प्रकरणे निकाली निघाली आणि तडजोड मुल्य 380460759 रूपये एवढे आहे.

विषेश म्हणजे 14 कोटींचे मुख्य दिवाणी प्रकरण आणि एम.ए.सी.टी.चे 103 प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदातीमध्ये निकाली निघाली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी राष्ट्रीय लोकअदालतीसाठी सहभागी झालेल्या सर्व पक्षकार, न्यायाधीश वर्ग, कर्मचारी वर्ग त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

6
1981 views

Comment