logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वासुंबे (ता. तासगाव) येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची तासगाव लोक अदालतीस भेट......


तासगाव, वासुंबे (ता. तासगाव) येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम लॉ कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तासगाव न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीस भेट देऊन न्यायालयीन कामकाजाचा अभ्यासपूर्ण अनुभव घेतला.

या भेटीदरम्यान विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लोक अदालतमध्ये प्रकरणे कशा पद्धतीने हाताळली जातात, दोन्ही बाजूंचे पक्षकार आपली बाजू कशी मांडतात तसेच न्यायाधीश किंवा पॅनेल सदस्य वाद मिटवण्यासाठी कशाप्रकारे मध्यस्थी करतात, याचे बारकाईने निरीक्षण केले.

तसेच विद्यार्थ्यांना पर्यायी वाद निवारण प्रणाली (ADR) विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. लोक अदालत ही पारंपरिक न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा वेगळी, सोपी आणि जलद पद्धत असून त्यामध्ये समझोत्याच्या माध्यमातून वाद मिटवले जातात. लोक अदालतमध्ये कौटुंबिक, दिवाणी तसेच बँक वसुलीशी संबंधित प्रकरणे कशा प्रकारे निकाली काढली जातात आणि दोन्ही पक्षकारांची भूमिका समजून घेऊन अंतिम निवाडा (Award) कसा दिला जातो, याबाबत माननीय न्यायाधीश मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

या भेटीद्वारे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना न्यायालयीन प्रक्रिया आणि लोक अदालतीचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेचे प्रत्यक्ष निरीक्षण करून कायद्याच्या अभ्यासासाठी उपयुक्त अशी माहिती आत्मसात केली.

या कामकाज निरीक्षण भेटीसाठी प्रभारी प्राचार्य अंजुम संगतरास यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी एडवोकेट विश्वजीत सोहनी सर, एडवोकेट मगदूम मॅडम आणि एडवोकेट गायकवाड मॅडम यांच्या उपस्थितीत लोक अदालत कामकाज निरीक्षण अभ्यास भेट संपन्न झाली.

13
444 views

Comment