logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

व्ही.पी. एज्युकेशनल कॅम्पसमध्ये फार्मसी शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न



धाराशिव (प्रतिनिधी) – व्ही व्ही पी एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथे भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कॉलेज ऑफ डी. फार्मसी मध्ये सर्व विभागातील शिक्षकांसाठी एक दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी डॉ. सुबोध कांबळे हे रिसोर्स पर्सन म्हणून उपस्थित होते. त्यांनी MSBTE CIAAN Norms & Various Formats for Academic Monitoring या विषयावर उपस्थित शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध शैक्षणिक निकषांबाबत तसेच शैक्षणिक व्यवस्थापनातील बदलांविषयी त्यांनी माहिती दिली.

यावेळी त्यांनी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच NBA मानांकनासाठी आवश्यक असलेल्या गरजा, CIAAN 2023 मधील बदल आणि बाह्य शैक्षणिक निरीक्षण प्रक्रियेतील सुधारणा याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी व फार्मसी विभागातील शिक्षकांना शैक्षणिक अहवाल, विविध शैक्षणिक स्वरूप (Formats) आणि अकॅडमिक मॉनिटरिंग प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली.याशिवाय संस्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑनलाईन इन्स्टिट्यूट सॉफ्टवेअरमध्ये झालेल्या नव्या बदलांबाबत देखील उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये ५० पेक्षा अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमादरम्यान विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच शिक्षकांनी आपले अनुभव एकमेकांशी शेअर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फार्मसी कॉलेजच्या प्रा.स्नेहल माने यांनी केले.

यावेळी शारदा देवी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अमरसिंह कवडे, कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, आर.पी. कॉलेजचे प्रा.माने भैरवनाथ निसर्ग मंडळ कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फार्मसी कॉलेजच्या प्रा.स्नेहल माने यांनी केले तर आभार प्रा, पवार यांनी मानले.


17
3394 views

Comment