logo
logo
(Trust Registration No. 393)
aima profilepic
Vikas wagh Kulkarni
All India Media Association

लातूर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनची कार्यकारीणी बैठक संपन्न.
प्रतिनिधी : विकास कुलकर्णी.संपर्क. ९६५७६७०७६५. ( लातूर.) जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन ची नुकतीच बैठक संपन्न झाली.यावेळी या बैठकीत
असोसिएशनचे अध्यक्ष श्री.विष्णूजी भुतडा यांची दिल्ली येथे झालेल्या नॅशनल योगासन स्पोर्ट फेडरेशनच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारीणी बैठकीत सर्वानुमते त्यांची फेडरेशनच्या फायनान्स डायरेक्टरपदी निवड केल्याबद्दल राष्ट्रीय कार्यकारीणीचे आभार व्यक्त करण्यात आले ,
तर मा.श्री. विष्णूजी भुतडा यांचे जिल्हा असोसिएशनच्यावतिने भव्य सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. साहेबराव जाधव,
सचिव अ‍ॅड. महादेव प्रकाश झुंजे,
सह सचिव श्री.प्रा.डॉ. मनोज रेड्डी, श्री. रामलिंग बिडवे, श्री. अमर वाघमारे, सौ. आशा संजय भुसनुरे(झुंजे), श्री.ज्ञानेश्वर पाटील आदीच्या उपस्थितीत सदर बैठक संपन्न होवून नोव्हेंबर मध्ये होणा-या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेकरीता जिल्हा संघाचा आढावा घेण्यात आला.
तसेच जिल्हा स्तरावर सभासद नोंदणी करून जिल्ह्यात तालूका योगासन स्पोर्ट असोसिएशन करीता संलग्नता करून घेण्याचेही यावेळी ठरले.

..........
0
178 views    0 comment
0 Shares

शिराळा येथे सर्व रोग निदान आरोग्य शिबीर
व वृक्षारोपण संपन्न

लातूर तालुक्यातील शिराळा येथे देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार रमेशअप्पा कराड साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, वृक्षारोपण व बालवाडी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी असे उपक्रम राबविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष बन्सीभाऊ भिसे,
शिवसेना लातूर तालुकाप्रमुख.राजकुमार सुरवसे,भाजपा तालुका महामंत्रीअनंत कणसे,
भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष उषाताई शिंदे, मा. जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ ढगे,
भाजपा ओबीसी सेल वैजनाथ लवटे, गाधवड ग्रा. पं. सदस्य बाबा भिसे, चिंचोली ब. ग्रा. पं. सदस्य गोविंद नांदे, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधाकर काळे, मा. उपसरपंच शिराळा अरविंद पारवे, सचिन सवई, भाजपा तालुका उपाध्यक्ष धनंजय जाधव, युवा मोर्चा शंकर देशमुख, ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष राम बर्डे, संजय काळे, बालाजी जाधव, ज्ञानेश्वर काळे, धर्मराज शिंदे, एम आय टी चे डॉ. राजेश वीरपक्ष, डॉ. जयश्री दहिफळे, डॉ. श्रध्दा शिंदे, डॉ. रोहीत खडताळे, विलास धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते राजपाल भोसले.विशाल कणसे, आदी सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

..........
0
0 views    0 comment
0 Shares

नायगाव येथे मुक्ताई महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न. विकास वाघ कुलकर्णी धाराशिव (उस्मानाबाद) :-कळंब तालुक्यातील नायगाव येथील मुक्ताई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात दि २५ रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह भ प दिनकर बाबा महाराज बैरागी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उपसंचालक कृषी अधिकारी बी यु मंगरुळकर जिल्हा कृषी अधीक्षक लातुर.कृषी विकास अधिकारी एस आर चोले जिल्हा परिषद लातुर.मधुकर तोडकर गटशिक्षणाधिकारी गटशिक्षण कार्यालय कळंब. ए पी आय नेटके पोलिस स्टेशन शिराढोण. बापु पुरी सहाय्यक निबंधक कळंब. उपसरपंच अशोक गोरे.माजी उपसरपंच लिंबराज शितोळे.विष्णु शितोळे भरत गरड यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार मुर्ती इ ७ वी विद्यार्थीनी मुस्कान मनियार जि प शाळा नायगांव १००० रुपये ट्राफी प्रमाणपत्र पुस्तक.उत्प्रेक्षा चव्हाण नवोदय विद्यालय लातुर निवडीसाठी १००० रुपये ट्राफी प्रमाणपत्र पुस्तक ओम गोरे सायन्स ८६:६७ टक्के मार्क जनता महाविद्यालय मुरुड २०००रुपये ट्राफी प्रमाणपत्र पुस्तक. स्नेहा गायकवाड नवोदय विद्यालय तुळजापूर २५०० रुपये ट्राफी प्रमाणपत्र पुस्तक.शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी निकाल लागल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना २५०० रुपये ट्राफी प्रमाणपत्र पुस्तक.वैद्यकिय शिक्षण प्रवेश प्रक्रिया पुर्ण केल्यानंतरचे विद्यार्थी ५००१ रुपये ट्राफी प्रमाणपत्र पुस्तक व विशेष कर्तव्य सन्मान सत्कार गावचे युवा उद्योजक आदिनाथ गोरे आणी सेवा निवृत्ती निमीत्ताने सत्कार बापु पुरी यांचा शाल श्रीफळ देऊन गौरव व सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, सर्व महिला सदस्य महादेव मेनकुदळे, आप्पासाहेब गोरे परशुराम गोरे, देविदास गोरे,शिवरुद्र मेनकुदळे, गावातील नागरिक पतसंस्थेचे खातेदार सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

..........
6
809 views    0 comment
0 Shares

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात संबोधन व पंडित दीनदयाळ उपाध्याय, स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनमा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून केलेले संबोधन अर्थात मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने किनारा हॉटेल येथे करण्यात आले,तसेच आज पंडित दीनदयाळ उपाध्याय व स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला जिल्हा कार्यालय प्रतिष्ठान भवन येथे पुजन केले .यावेळी कार्यकर्त्यांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संवादातून मार्गदर्शक सूचना घेतल्या,या वेळी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सुरू असलेली अनेक विशेष सेवाकार्याची माहिती दिली तसेच योग व्यायाम, सामाजिक स्वच्छता मोहीम, टाकाऊ वस्तूमधून सुंदर वस्तूंची निर्मिती, स्थानिक पातळीवर कलाकारांनी तयार केलेल्या वस्तुंना प्राधान्य, खादी ग्रामोद्योग निर्मित वस्तूंचा वापर, प्लास्टिक बॅग या ऐवजी कापडी पिशवीचा वापर याबाबत बोध घेतला.यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, सोशल मिडिया महाराष्ट्र प्रदेश कंटेंट टीमचे प्रमुख पांडुरंग(अण्णा)पवार, भाजप जिल्हाउपाध्यक्ष इंद्रजित देवकते, सह संयोजक सलमान शेख, राज निकम, सचिन लोंढे, बापू पवार, अमोल राजेनिंबाळकर, श्रीराम मुंबरे, गणेश एडके, सुनील पंगुडवाले, रोहीत देशमुख, स्वप्नील नाईकवाडी, प्रसाद मुंडे, चंदन जाधव, ओमकार देवकते शुभम बनसोडे, यांची उपस्थिती होती.

..........
0
820 views    0 comment
0 Shares

धाराशिव येथे मन की बात संपन्न.
भानूनगर धाराशिव येथे आ.राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी यांनी श्री गणपती मंदिर येथे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांचा 'मन कि बात' हा कार्यक्रम ऐकला. तत्पूर्वी श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

नव्यानेच भारतात आलेल्या चित्त्यांविषयी चर्चा करून त्याविषयी नागरिकांनी MY GOV यांच्या माध्यमातून सल्ला देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. सांकेतिक भाषेचा प्रवास आणि होत असलेल्या विकासाचे महत्त्व त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. सुरत येथील कन्या अन्वी आपल्या आजारावर मात करून योग विद्येत निपुण कामगिरी करत आहे. तिचा आदर्श घेऊन आपण योग विद्या आत्मसात करावी. चंदीगड येथील विमानतळाला शहीद भगतसिंगाचे नाव देण्यात आहे त्याबद्दल पंजाब राज्यातील नागरिकांचे अभिनंदन यावेळी त्यांनी केले. अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करून आपल्या क्रांतिवीराचे स्मरणही त्यांनी यावेळी करून दिले.

याप्रसंगी जिल्हा संयोजक श्री.नेताजी पाटील, सचिन तावडे, लक्ष्मण माने, गणेश पानसरे, नितीन इंगळे, विनोद निंबाळकर, अमोल राजेनिंबाळक, देवा नायकल, हिम्मत भोसले, ओम नाईकवाडी, परिसरातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

..........
0
0 views    0 comment
0 Shares

*माजी मंत्री रामदास कदम यांच्या वक्तव्याचा युवा सेनेने केला निषेध*

*गाढवावरुन धिंड काढून प्रतिमेचे केले दहन*

धाराशिव -
शिवसेनेचे पक्षप्रुमख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांच्या प्रतिमेची गाढवावर धिंड काढून युवा सेनेने तीव्र निषेध केला. तसेच प्रतिमेचे दहन करुन जोरदार घोषणा दिल्या. धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 22 सप्टेंबर 2022 रोजी हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात युवा सैनिकांनी रामदास कदम यांनी घाणेरड्या भाषेत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात युवासेना शहरप्रमुख रवी वाघमारे,
युवा सेनेचे तालुकाप्रमुख वैभव वीर,शिवसेना शहरप्रमुख संजय (पप्पू) मुंडे, पंकज पाटील, हनुमंत देवकते, प्रदीप साळुंके, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख नीलेश शिंदे, मा.नगरसेवक बाळासाहेब काकडे, मा.नगरसेवक राणा बनसोडे, उपशहरप्रमुख सुरेश गवळी, विभाग प्रमुख अजित बाकले, राम साळुंके,पांडुरंग माने, अविनाश इंगळे, राज जाधव, ऋषी पाटील, निलेश साळुंके,संकेत सूर्यवंशी, महेश लिमये, सत्यजित पडवळ, किरण बोचरे,रोहित भांडवले, बाळासाहेब पोतदार, शिरीष वाघमारे, प्रसाद तेरकर, सचिन बेद्रे, रवि खंडेराव, शुभम डांगे, अविनाश ईटकर, सुरज लोंढे, सागर शेरकर, शिवप्रताप कोळी, राकेश जाधव, यांच्यासह शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

..........
0
0 views    0 comment
0 Shares

मराठवाडा शिक्षक मतदार संघ भाजपाची मतदार नोंदणी अनुषंगाने बैठक संपन्न येत्या काळात होऊ घातलेल्या मराठवाडा शिक्षक मतदार संघातील मतदाराची नोंदणी अनुषंगाने भाजपाची बैठक या मतदारसंघाचे नोंदणी प्रभारी मनोज पांगरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी झाली. यावेळी ॲड.व्यंकटराव गुंड, सुधिर पाटील, राजसिंह राजेनिंबाळकर, ॲड.खंडेराव चौरे, रामदास कोळगे, पांडुरंग लाटे, प्रभाकर मुळे, अभय इंगळे, साहेबराव घुगे, शिवाजी गिड्डे, पांडुरंग अण्णा पवार, विनोद राठोड, दिगंबर बंडगर, दत्ता पेठे, सुजित साळुंके, अमोल राजेनिंबाळकर, मकरंद पाटील, रोहित निंबाळकर, रोहित देशमुख, यांच्यासह शहर आणि ग्रामीण जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होते.यावेळी बोलताना मराठवाडा विभागाची नोंदणी प्रमुख मनोज पांगरकर म्हणाले की कन्नड पासून किनवट पर्यंत आठ जिल्ह्याचा हा मतदारसंघ असून या मतदारसंघातील विजयासाठी नोंदणी अत्यंत महत्त्वाची असल्याने भाजपाच्या संयोजकांनी शिक्षक आघाडीच्या समन्वयातून अधिकाधिक नोंदणी करावी असे आवाहन करून अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या. या बैठकीस शहर आणि ग्रामीण जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी मंडलाध्यक्ष नोंदणी संयोजक सहसंयोजक उपस्थित होते.

..........
4
511 views    0 comment
0 Shares

धाराशिव (उस्मानाबाद) करांचे स्वप्न साकार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी !-आमदार राणाजगजितसिंह पाटील मोठ्या प्रतीक्षेनंतर आज उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली आहे. उस्मानाबाद करांसाठी हा दिवस अतिशय आनंदाचा व अविस्मरणीय आहे. उस्मानाबाद येथील महाआरोग्य शिबीरा दरम्यान ४ मार्च २०१८ रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीशजी महाजन यांनी उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती, व आज राष्ट्रीय आयुर्वेविज्ञान संस्थेने मंजुरीचे पत्र दिले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये हे महाविद्यालय सुरू होण्याच्या अशा अतिशय धूसर होत्या. सातत्याच्या पाठपुराव्यामुळे ठाकरे सरकारने याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला, मात्र आवश्यक पद भरती, उपकरणे, यंत्रसामग्री व सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी आवश्यक असणारा शिक्षक वर्ग याबाबत ठोस असे काहीच केले नाही. जून अखेर केवळ ३ प्राध्यापकांच्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या, परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हा विषय प्राधान्यक्रमावर घेत आवश्यक उपकरणे, यंत्रसामग्रीची खरेदी व पदभरतीला वेग देत ४८ प्राध्यापक व १२ वरिष्ठ निवासी डॉक्टर्स च्या नियुक्त्या केल्या व यातील ५० जणांना उपस्थित करून घेतले. फेब्रुवारी २०२२ मध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या समितीने पाहणी केल्यानंतर काढलेल्या त्रुटींची काहीही पूर्तता केली गेली नाही, कोणताही पत्रव्यवहार केला नाही. परिणामी २५ ऑगस्ट ला राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेने महाविद्यालयाला मान्यता नाकारली व या विषयावर यावर्षी कोणताही पत्रव्यवहार न करण्याचे सांगितले. मात्र कोणत्याही परिस्थितीत उस्मानाबाद येथे याच वर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा संकल्प केला होता. त्यामुळे तात्काळ राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीशजी महाजन, वैद्यकीय विभागाचे प्रधान सचिव तसेच आयुक्त यांची भेट घेऊन चर्चा केली व राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेकडे फेर प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्रुटींच्या पूर्ततेसाठी वेगाने कामे केली, खुद्द आयुक्तांनी सुट्टीच्या दिवशी महाविद्यालयाच्या अधिष्ठातांसोबत बसून परिपूर्ण प्रस्ताव बनवला व दिनांक ५ सप्टेंबर रोजी संस्थेच्या दिल्ली कार्यालयात फेर प्रस्ताव दाखल केला. या अनुषंगाने दिनांक १८ सप्टेंबर रोजी फेर तपासणीसाठी समिती आली व त्यांनी त्रुटींच्या पूर्ततेबाबत केलेल्या कार्यवाही वर समाधान व्यक्त करत आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये टीम उस्मानाबादचे अभिनंदन करत वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिल्याचे पत्र दिले. उस्मानाबाद करांचे अनेक दिवसाचे स्वप्न आज साकार झाल्याचा आनंद अवर्णनीय आहे. जिल्ह्यातील जनतेचे हार्दिक अभिनंदन. याकामी केंद्रीय नेतृत्वाचे अनमोल सहकार्य लाभले, त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, विविध लोकप्रतिनिधी यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभाग विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, उस्मानाबाद येथील महाविद्यालयांमधील कार्यरत अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले. याबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक आभार !

..........
0
0 views    0 comment
0 Shares

तेरणासाठी आप बाभळगावच्या वेशीवर पोलीसानी आंदोलनकर्त्यास घेतले ताब्यात

लातूर दि.२२ (प्रतिनिधी) -
माजी मंत्री आ. अमित देशमुख आरोग्यमंत्री डाँ तानाजी सावंत यांच्या न्यायालयीन कुरघोडी मध्ये तेरणा सहकारी साखर कारखाना अडकलाय. या कुरघोडीमुळे सभासदाचे भविष्य पुन्हा अंधार मय झाले आहे.तेरणा कारखाना पुन्हा चालु करावा न्यायालयीन प्रक्रिया मध्ये हा कारखाना अडकाऊ नका.या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड अजित खोत यांच्या नेतृत्वात आज बाभळगाव येथील आ.अमित देशमुख यांच्या घरा समोर आंदोलन होते हे आंदोलन करण्या पुर्वीच बाभळगावच्या वेशीवर पोलीसांनी आंदोलनकर्त्या आडवले.

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या १२ वर्षापासून बंद आहे. तो सुरू करण्यासाठी टेंडर प्रक्रिया पार पडली. मात्र या टेंडर प्रक्रियेवरून भैरवनाथ शुगर व ट्वेंटीवन शुगर यांच्यामध्ये म्हणजेच आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत व माजी मंत्री आ.अमित देशमुख यांच्या २ संस्थेमध्ये वाद निर्माण झाला आहे. न्यायालयात प्रलंबित असून या बाबत ट्वेंटीवन शुगरचे आ. देशमुख व भैरवनाथ शुगरचे मंत्री डॉ सावंत यांनी न्यायालयाबाहेर आपसात तडजोड करावी व हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करावा. तसेच न्यायालयीन कुरघुड्या बंद करा व तेरणा सुरु करा या एकमेव मागणीसाठी आम आदमी पार्टीच्यावतीने आ. देशमुख यांच्या लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील गढीसमोर दि.२२ सप्टेंबर रोजी आम आदमी पार्टीचे राज्य समिती सदस्य ऍड. अजित खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार होते. मात्र आंदोलकांना बाबळगाव फाट्यावरच पोलिसांनी अडवुन त्यांची रवानगी पोलिस ठाण्यात केली. तर प्रशासनाच्या माध्यमातून हे आंदोलन चिरडून काढले. दरम्यान, आम्हाला याबाबत आश्वासन दिल्याशिवाय पोलिस ठाण्यातून जाणारच नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यानी घेतली असता ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष यांनी पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष भेट देऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

यावेळी बोलताना ऍड. खोत म्हणाले की, तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची भैरवनाथ शुगरची निविदा जिल्हा सहकारी बँकेने मंजूर केली. या विरोधात ट्वेंटीवन शुगरने डीआरटी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ट्वेंटीवन शुगरच्या विरोधात निकाल दिला. त्या निकालाच्या विरोधात ट्वेंटीवनने DRAT न्यायालयात अपील केले. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असून शेतकरी, कारखान्याचे सभासद, व्यापारी व त्यावर अवलंबित्व असलेल्यांच्या हितासाठी हा कारखाना सुरू होणे अतिशय महत्त्वाचे व गरजेचे आहे. मात्र देशमुख व सावंत यांच्या न्यायालयीन लढ्यामुळे हा कारखाना सुरू होत नाही. त्यामुळे कारखान्याचे ३५ हजार सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला असून या भागातील शेतकरी ऊस लावण्यापासून वंचित राहू लागले आहेत. हा प्रश्न या दोघांनी तात्काळ न सोडविल्यास आम्ही सर्व सभासदांच्या सह्या घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन दाद मागणार असल्याचे खोत यांनी सांगितले. यावेळी आम आदमी पार्टीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे, युवक जिल्हाध्यक्ष आकाश कावळे, जिल्हा सचिव मुन्ना शेख, कोषाध्यक्ष विकास वाघमारे, लातूरचे जिल्हाप्रमुख प्रताप भोसले, लातूर जिल्हाध्यक्ष सचिन औरंगे, लातूर जिल्हा सचिव कुमार खोत, लातूर शहर युवा अध्यक्ष माने, लातूर ग्रामीण अध्यक्ष सतीश कारंडे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट

आम्ही आ. देशमुख यांच्या बाबळगाव येथील गढीसमोर लोकशाही मार्गाने कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी न करता हे आंदोलन शांततेत करणार होतो. मात्र देशमुख यांनी आमचे आंदोलन कशामुळे चिरडले ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच आजचे आंदोलन तात्पुरते स्थगित झाले असले तरी न्याय मिळेपर्यंत आम्ही हा प्रश्न सोडविण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

..........
0
0 views    0 comment
0 Shares

*आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते*
*नूतन चेअरमनचा सत्कार*
औसा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या गोंद्री लोदगा आणि देंवग्रा येथील नूतन चेअरमनचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
औसा तालुक्यातील भाजयूमोचे सरचिटणीस देवग्रा येथील नूतन चेअरमन अजित धुमाळ व्हाईस चेअरमन अशोक मोरे संचालक विलास दत्तू कोतापुरे लोदगा येथील चेअरमन शरद लिंबराज भोईबार गोंद्री येथील चेअरमन संदिपान लंगर व्हाईस चेअरमन हनुमंत हाळे संचालक रामेश्वर हलगुडे हमजू खतरो पठाण एकनाथ कांबळे या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी बुधवारी संवाद कार्यालयात सत्कार करून अभिनंदन केले
यावेळी भाजपाचे लातूर ग्रामीण अध्यक्ष अनिल भिसे, ओबीसी आघाडीचे विभागीय संपर्कप्रमुख डॉ बाबासाहेब घुले, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष राजकिरण साठे, भागवत कांबळे, श्रीराम जावळे, मोहित पाटील, शिवाजी काळे, शंकर भोसले यांच्यासह अनेक जण होते.

..........
6
1185 views    0 comment
0 Shares

धाराशिव येथे माजी मंञी राजेंद्र दर्डा यांचा तेली समाज संघटनेच्यावतीने सत्कार
जिल्हा प्रतिनिधी: विकास वाघ कुलकर्णी मो ९६५७६७०७६५
आज धाराशिव येथे दैनिक लोकमत वृतपञ समुहाचे एडीटर चीफ तथा माजी मंञी राजेंद्र जवाहरलाल दर्डा हे आले असता त्यांचा तेली समाज संघटनेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, उस्मानाबाद लोकमत जिल्हा प्रतिनिधी चेतनजी धनूरे,जिल्हा कोषाध्यक्ष महादेव आप्पा मेंगले,जेष्ठ मार्गदर्शक शिवलिंग आप्पा होनखांबे,युवक जिल्हाध्यक्ष शशिकांत बेगमपुरे आदिंची उपस्थितीत सत्कार करून विविध विषयांवर चर्चा केली.

..........
0
832 views    0 comment
0 Shares

एनएमसीच्या तपासणी अगोदर प्रलंबित खरेदीला प्रशासकीय मान्यता द्यावीआमदार कैलास घाडगे पाटील यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्याकडे केली मागणीधाराशिव दि.१४ राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) परिक्षणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडुन फेरप्रस्ताव पाठविण्यात आला आहे. फेरतपासणीत फर्निचर व उपकरणांची त्रुटी राहु नये यासाठी उर्वरित रक्कमेच्या प्रलंबित असलेल्या फर्निचर व उपकरणाच्या खरेदीस तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यानी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली आहे.चार महिन्यापासुन अत्यंत महत्वाच्या खरेदीचा प्रस्ताव प्रलंबित का राहिला असा सवाल त्यानी पत्राद्वारे केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामार्फत प्रलंबित असलेल्या फर्निचर व उपकरणे खरेदीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत वैद्यकिय शिक्षण संचालक व वैद्यकिय सचिव यांच्याकडे प्रस्ताव पाठवुन चार महिने झाले आहेत.अद्यापपर्यंत त्यास मंजुरी देण्यात आलेली नाही.२०२२ च्या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी एनएमसी परिक्षण होणार आहे,त्यात या बाबींची पुर्तता होणे आवश्यक असल्याचे आमदार घाडगे पाटील यानी म्हटले आहे.या अगोदर याविषयासाठी दहा जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.दहा ऑगस्ट रोजी वैद्यकिय शिक्षण संचालक याना व सचिव वैद्यकीय शिक्षण यांच्याकडे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत तसेच पत्रव्यवहार केला होता.शिवाय दहा ऑगस्ट रोजी सचिव वैद्यकीय शिक्षण व संचालक यांना समक्ष भेटून यंत्रसामग्री व फर्निचरच्या खरेदीसाठी प्रस्तावित असलेले प्रशासकीय मान्यता प्रदान करावी अशी मागणी केल्याचेही आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सांगितले आहे.सहा कोटी रुपयाची तरतुन असताना त्यातील फक्त एक कोटी २३ लाखाच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली मग इतर रक्कमेच्या प्रलंबित असलेल्या फर्निचर व उपकरणे खरेदीस प्रशासकीय मान्यता का करण्यात आली नाही?असा सवाल आमदार घाडगे पाटील यानी विचारला आहे.गेल्या कित्येक दशकापासुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होती.तत्कालीन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने १३ जानेवारी २०२१ रोजी मंत्रीमंडळ निर्णयाव्दारे शंभर प्रवेश क्षमतेचे व ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करण्यास मंजुरी दिली.२७ जानेवारी २०२१ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शासन निर्णय झाला.एनएमसी परिक्षणासाठी फेर प्रस्ताव पाठविण्यात आला असुन तपासणीत फर्निचर व उपकरणांची त्रुटी राहु नयेत यासाठी उर्वरित रक्कमेच्या प्रलंबित असलेल्या फर्निचर व उपकरणाच्या खरेदीस तात्काळ प्रशासकीय मान्यता मिळावी अशी मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यानी केली आहे.

..........
0
0 views    0 comment
0 Shares

मॉस्को(रशिया)येथे लोकशाहिर
अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा.
धाराशिव येथे जल्लोष....
**********
रशिया देशातील मॉस्को शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळय़ाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब व विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब यांच्या हस्ते बुधवारी सकाळी करण्यात आले आहे. त्याच दिवशी सायंकाळी मॉस्कोतील भारतीय दूतावासात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे,महाराष्ट्रातील जनतेसाठी हा विशेष आत्मियतेचा विषय आहे.

यानुषंगाने धाराशिव शहरात भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे यांच्या उपस्थितीत लोकशाहिर अण्णाभाऊ साठे चौक व आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे चौकात फटाके फोडून व पेडे वाटुन जल्लोष करण्यात आला,लोकशाहिर अण्णाभाऊ साठे चौकात दत्ता पेठे व अमोल पेठे यांनी तर आद्य क्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे चौकात पुजा देडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

याप्रसंगी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप शिंदे,पांडुरंग(अण्णा)पवार,दत्ता पेठे..महेश देडे गंगुबाई देडे अशिष पेठे महादेव कांबळे किरण डोंगरे .. यांची उपस्थिती होती.

..........
3
346 views    0 comment
0 Shares

*‘समृद्ध जीवन’च्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे आक्रमक*

उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

उस्मानाबाद -
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टिपर्पज कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांना रक्कम परत मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष शाहुराज माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (दि.14) पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात समृद्ध जीवन कंपनीकडे ठेवी अडकलेले गुंतवणूकदार महिला, पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

समद्ध जीवन कंपनीकडे असलेली जमाराशी प्रतिबंध कायद्याप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यात गुंतवणूकदाराला तक्रारी दाखल करुन घेण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांना भाग पाडावे, गुंतवणूकदारांच्या खात्यावर शिल्लक असलेली रक्कम व कंपनीच्या इतर बँकांमध्ये करण्यात आलेल्या ठेवीवरील निर्बंध हटवून ती रक्कम शासनाने ताब्यात घेऊन गुंतवणूकदारांना व्याजासह परत करावी, कंपनीच्या नावे घेण्यात आलेल्या स्थावर मालमत्तांचा लिलावर करुन मिळणार्‍या रकमेतून गुंतवणूकदारांना रक्कम परत द्यावी, कंपनीच्या नावे असलेली उत्तमी कायापूर येथील प्रकल्पाची जमीन व येणेगूर येथील डेअरीसाठी घेतलेली जमीन शासनाने ताब्यात घेऊन विक्रीतून मिळालेल्या पैशातून गुंतवणूकदारांना रक्कम द्यावी, समृद्ध जीवन ही शासन नोंदणीकृत कंपनी असल्यामुळे या कंपनीच्या व्यवहारातील सर्व जबाबदारी शासनाचीच असल्याने सरकारने याबाबत निर्णय घेऊन गोरगरीब जनतेचे कष्टाचे पैसे परत द्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष शाहुराज माने यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात जीवन संघर्ष महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष वर्षाताई काळे, मनसे जिल्हा संघटक अमरराजे कदम, मनविसेचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष राहूल बचाटे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अजय पवार,यांच्यासह प्रशांत गरड, सुरेंद्र जाधव, विशाल रोडगे, दिलीप गरड, अजय पवार, रणजितसिंह राजपूत, दादासाहेब ढवळे, माधव भोसले, प्रदीप बिराजदार, लक्ष्मीकांत सरसंबे, सोजरबाई घोडके, एम.बी. जामगे, संजय राऊत, श्रीकांत तंमशेट्टे, मीराबाई राऊत, सिद्धाराम पाटील, अंकुश साळुंके, महेंद्रसिंग राजपूत, सरोजा साळुंके, एस.एम. बिराजदार, पद्मीन साळुंके, महादेव भोसले, हरी साळुंके, चंद्रकांत माटे, मनीषा पवार, राम शिंदे, विश्रांत मुसांडे, शरद कवडे, रामचंद्र कडगंचे, कुबेर जाधव, लक्ष्मण मोरे, उत्रेश्वर बेरगळ, हिराबाई पात्रे, यशवंत कांबळे, संगीता सुरवसे, जीनत मातोळे, सुमन चिगुरे, राम घोडके, अंजना घोडके, महानंदा कलकुंटगे, मुक्ताबाई गरड, सुरेखा वाघमारे, बिस्मिल्ला मुल्ला, महिरुम जमादार, महानंदा सुरगुळगे, श्रीदेवी जमादार, वर्षा कांबळे, गोजर बनसोडे जया कांबळे, भाग्यश्री रणदिवे, भ्रष्ट्राचार जनअक्रोशच्या राजकन्या जावळे यांच्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील समृद्ध जीवन कंपनीत गुंतवणूक केलेले ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

..........
0
0 views    0 comment
0 Shares

जिल्हा अनुदानातून वगळला ही अफवा..आता आपले सरकार, मदत मिळणारच!- आ.राणाजगजितसिंह पाटील ज्या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेले आहे म्हणजेच शासकीय निकषांप्रमाणे २४ तासात ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे, अशा तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ, कळंब तालुक्यातील येरमाळा,मोहा, उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, डाळिंब, मुळज, उमरगा व परंडा तालुक्यातील जवळा (नि) या महसूल मंडळातील ७५,७३९ शेतकऱ्यांना ९०.७४ कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. सदरील अनुदान हे राज्य/राष्ट्रीय आपत्ती निवारण निकषांनुसार दिल्या जाणाऱ्या अनुदानापेक्षा दुप्पट दराने देण्यात आलेले आहे. एवढेच नव्हे तर नुकसानीच्या व्याप्तीची मर्यादा देखील २ हेक्टर वरून ३ हेक्टर पर्यंत वाढविण्यात आली आहे.शिंदे-फडणवीस सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून सततच्या पावसामुळे झालेले नुकसान लक्षात घेता विशेष बाब म्हणून अनुदान देण्यात येणार आहे. तसा शब्द मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी विधानसभेत दिला आहे.नैसर्गिक आपत्ती मुळे ३३% पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाल्यास, शासकीय मदत मिळणे अनिवार्य असते.सततच्या पावसामुळे तसेच गोगलगाईच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने जिल्ह्यातील १,१०,००० हेक्टर बाधित क्षेत्राचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व तालुक्यांचा समावेश आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी प्रमाणेच या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्याची प्रक्रिया चालू आहे. सततचा पाऊस व गोगलगायींचा प्रादुर्भाव यामुळे झालेले नुकसान हे शासकीय निकषांच्या बाहेर असल्याने खास बाब म्हणून हे करण्यात येत आहे.३३% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे हे शासकीय मदतीसाठी अनिवार्य आहेत. शेतकऱ्यांना आधार द्यायचा, त्यांना लवकर अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करायचा सोडून नेहमी प्रमाणे विकृत राजकीय मानसिकतेतून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.सदरील अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील यावर विस्तृत चर्चा झाली आहे. अतिवृष्टी प्रमाणेच हे अनुदान देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच प्राप्त होईल.*(महत्वाची सुचना )* धाराशिव जिल्ह्यातील सर्व बळीराजांनी आपल्या शेतातील खरिप पिकाचे गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे व गोगलगाय, येलो मोझँक च्या प्रादुर्भावामुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे नव्याने आदेश काढण्यात आले आहेत. या नुकसानीचा अहवाल स्वतंत्रपणे राज्य सरकारकडे पाठवून यासाठी देखील अनुदानाची मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यापूर्वी पंचनामे झालेले नसल्यास आताच्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत.

..........
3
1837 views    0 comment
0 Shares

धाराशिव जिल्हा भाजपच्यावतीने सेवा पंधरवड्यानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमभाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर शितोळे यांची माहिती - धाराशिव येथे घेतला पूर्वतयारीचा आढावादेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर आणि महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती व लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते करणार आहेत. विविध चर्चासत्रे, व्याख्यान, तसेच योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर शितोळे यांनी आज दिली.सेवा पंधरवड्यानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात लोकनेते आमदार राणाजगजितसिंह पाटील, मा. आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा नेतृत्वाखाली व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कामांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर शितोळे हे सोमवारी धाराशिव येथे आले असता त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.श्री.शितोळे यांनी विविध अभियानाची माहिती सांगितली ,सेवा पंधरवडा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णय व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवायची आहे. त्याकरिता चर्चासत्र, मेळावे, उज्ज्वला योजना, आत्मनिर्भर योजना, वयोश्री योजना, दिव्यांगांसाठीच्या योजनांची जनजागृती करुन गरजूपर्यंत योजनेचा लाभ पोहचवावा. त्याचबरोबर डॉक्टर, वकील, व्यापार, उद्योग अशा अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांचे चर्चासत्र आयोजन करण्यात यावे, सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची मनोगते नोंदवून घ्यावीत. त्याचबरोबर कोविड लसीकरण मोहिमेची माहिती घेऊन गावोगावी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे, खादी उत्पादनाला चालना देण्यासाठी जनजागृती करणे, जल साक्षरता वाढविण्यासाठी जलायशांची स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविणे, वयोश्री योजना व दिव्यांगांच्या योजनांचा लाभ गरजुपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच त्यात सातत्य ठेवण्याचा संकल्प सेवा पंधरवड्यात करावा, असेही त्यांनी सांगितले.त्याचबरोबरभारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे .यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजप सरचिटणीस ॲड नितीन भोसले, प्रदीप शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, मा.गटनेते युवराज नळे, बप्पा वाघमारे, शहर अध्यक्ष राहुल काकडे, भाजयुमो तुळजापूर तालुकाध्यक्ष आनंद कंदले, प्रीतम मुंडे, रोहन जाधव, राजगुरू कुकडे, दयानंद मुडके, राहूल साठे, रोहित देशमुख, शंकर मोरे, आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

..........
9
914 views    0 comment
0 Shares