' होळी लहान करा व पोळी दान करा ' अंनिस चे प्रा.अमोल वाघमारे यांची शालेय विद्यार्थ्यांना साद ,
नवी मुंबई - साथी आज 02.03.2026 रोजी रबाळे शाखेच्या वतीने " *होळी करा लहान ,पोळी करा दान"* *"पर्यावरण पूरक होळी"* हा उपक्रम *सकाळी ठिक 7.25 वा .पीएमश्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय रबाले* येथे आयोजित करण्यात आला. होळीनिमित्त घरात तयार होणारी नैवेद्याची पोळी होळीत जाळण्यापेक्षा गरजूंना दान करण्याचे तसेच प्लास्टिकच्या फुग्यांचा आणि रासायनिक रंगांचा वापर न करण्याबाबत श्री अविनाश जाधव कार्याध्यक्ष रबाले शाखा यांनी मार्गदर्शन केले.तसेच साथी *अमोल कुमार वाघमारे , अंनिस प्रधान सचिव नवी मुंबई जिल्हा यांनी *पर्यावरण पूरक होळीचे महत्त्व* विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सदर उपक्रमात 240 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. साथी गीता घाडी,साथी मनिषा कांबळे तसेच सकाळ सत्रातील शिक्षक उपस्थित होते.
नाते आमचे विचारांचे, वारस आम्ही विवेकाचे
विवेकाचा आवाज बुलंद करुया.