logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सर्व पशुवैद्यकीय चिकित्सालये, तालुका व जिल्हा चिकित्सालये तसेच फिरते दवाखान्यांच्या कामकाजाच्या वेळा निश्चित


नांदेड, दि. 2 मार्च :- ग्रामीण भागातील पशुपालकांना सकाळच्या सत्रात पशुवैद्यकीय सेवा सुलभ व्हावी तसेच कार्यक्षेत्रातील गावांना नियमित भेटी देऊन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविता याव्यात, या उद्देशाने राज्यातील जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालये, तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालये, पशुवैद्यकीय दवाखाने व फिरते पशुवैद्यकीय दवाखाने यांच्या कामकाजाच्या वेळांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या दि. 28 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार दि. 1 मार्च 2026 पासून पुढील सुधारित वेळा लागू करण्यात आल्या आहेत.

सुधारित वेळापत्रक :
• सोमवार ते शुक्रवार : सकाळी 8 ते दुपारी 1.30 व सायं. 3 ते 5
• शनिवार : सकाळी 8 ते दुपारी 1

जिल्हा व तालुका स्तरावर विशेषज्ञ सेवा तसेच पशुपालकांना आकस्मिक प्रसंगी 24 तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व पशुपालक व शेतकरी यांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सखाराम बाबुराव खुणे यांनी केले आहे

0
0 views

Comment