logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दहावीचा इंग्रजीचा पेपर जिल्ह्यातील सर्व 178 केंद्रांवर सुरळीत* - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले



नांदेड, :- इयत्ता 10 वीची परीक्षा जिल्ह्यातील 178 केंद्रांवर सुरळीत पार पडली. इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी एकूण 48,832 परीक्षार्थ्यांपैकी 47,725 परीक्षार्थी उपस्थित होते. उपस्थितीची टक्केवारी 97.73 इतकी नोंदविण्यात आली.

प्रत्येक केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे तसेच ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेराच्या सहाय्याने पूर्णवेळ नियंत्रण ठेवण्यात आले. त्यामुळे सर्व 178 परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पडली.

आजच्या इंग्रजीच्या पेपरसाठी जिल्हास्तरावरील सुमारे 66 अधिकारी 66 परीक्षा केंद्रांवर पूर्णवेळ उपस्थित होते. तसेच शिक्षण विभागाचे 7 अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व तालुकास्तरावरील अधिकारी अशा एकूण 112 अधिकाऱ्यांनी भरारी पथकांमार्फत सर्व 178 केंद्रांना भेट देऊन उपस्थिती नोंदविली. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्यात आली.

दरम्यान, जिल्हा परिषद हायस्कूल, बेटमोगरा ता. मुखेड येथील केंद्रावर एका परीक्षार्थ्याच्या जागी तोतया परीक्षार्थी उपस्थित असल्याचे भरारी पथक प्रमुख जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांच्या निदर्शनास आले. संबंधिताविरुद्ध मंडळ नियमावली तसेच भारतीय न्यायसंहिता कलम 163 आणि महाराष्ट्र गैरप्रकार अधिनियम 1982 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

इयत्ता 10 वी व 12 वीच्या सर्व परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. यासाठी विद्यार्थी व पालकांनी सकारात्मक सहकार्य करावे. तसेच यापुढील सर्व परीक्षांमध्ये तोतया परीक्षार्थी आढळू नयेत यासाठी परीक्षा प्रक्रियेशी संबंधित सर्व घटकांनी विशेष दक्षता घ्यावी आणि प्रत्येक परीक्षार्थ्याची ओळख पडताळूनच परीक्षा दालनात प्रवेश द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

4
626 views

Comment