logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाचा 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान रक्षक पुरस्कार...राज्यघटना संपली तर देश संपेल _ डॉ रावसाहेब कसबे

*कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाचा 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान रक्षक पुरस्कार गौरव, माधवीताई जाधव , शीला पवार, कांता अहिरे दर्शना सौपुरे यांना प्रदान राज्यघटना संपली तर देश संपेल _ डॉ रावसाहेब कसबे जेष्ठ विचारवंत*
नाशिक :-
भारतीय राज्यघटना संपली तर देश संपेल, भारत देश वाचवण्यासाठी राज्यघटना वाचली पाहिजे. भारतीय संविधान जागरूक समाज संविधानिक मूल्याने साक्षर केला पाहिजे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान रक्षक पुरस्कारार्थी यांनी संविधान मूल्यांसाठी काम केले आहे. या सर्व पुरस्कार प्राप्त माधवी जाधव, कांताबाई अहिरे, शीलाबाई पवार, दर्शना भरत सौपुरे यांचे अभिनंदन करतो. हाच वारसा जनतेने पुढे न्यावा. राज्यघटनेचे प्रबोधन घर घर व्हावे संविधानिक मूल्य जपले पाहिजे असे आवाहन जेष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे यांनी रोटरी हॉल, गंजमाळ नाशिक येथे प्रमुख पुरस्कार वितरण प्रसंगी मार्गदर्शन करतांना व्यक्त केले. विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा वाचनालयाचे मा अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक, पत्रकार उत्तम कांबळे, विश्वस्त कॉ. राजू देसले, पुरस्कारार्थी माधवी जाधव, कांता अहिरे, दर्शना सौपुरे, शीला पवार उपस्थित होते.
प्रास्ताविक कॉ. राजू देसले यांनी केले संविधानिक मूल्यांसाठी अभिव्यक्त होणे गरजेचे आहे. कांता अहिरे व शीला पवार घर कामगार महिलांनी जयपूर येथे जाऊन मनु पुतळ्याला काळे फासले, ही कृती संविधान मूल्य साठी जोपासण्यासाठी मनुवाद गाडून संविधान राज्य असताना उभारलेला पुतळा संविधान मूल्य विरोधात आहे. माधवी जाधव व दर्शना सौपुरे यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी केलेली कृती महत्त्वाची आहे. 77 वर्ष प्रजासत्ताक दिन पूर्ण होत असताना संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे. नारायण सुर्वे शताब्दी वर्ष दरम्यान हा पुरस्कार प्रदान करतांना आनंद होत आहे. असे प्रतिपादन केले. पुरस्कारार्थी वतीने माधवी जाधव व कांता अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. माधवी जाधव यांनी भारतीय संविधान मूल्य व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या त्यागामुळे आपण येथे पर्यंत पोहचू शकलो आहोत. आजच्या सन्मानाने आनंद होत आहे. या पुढील काळात संविधान मूल्य रुजवण्यासाठी काम करू असे प्रतिपादन केले. कांता अहिरे यांनी जयपूर येथील उच्च न्यायालय आवारात उभारलेला पुतळा हा संविधान विरोधी आहे. तो तिथे नसावा व देशात कुठेही मनु पुतळा असता कामा नये यासाठी संघर्ष करू. जयपूर आंदोलन मनु पुतळा काळे फासणे आंदोलनाची आठवण व्यक्त केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कष्ट घेऊन लिहिलेले संविधान वाचवण्याची जबाबदारी सर्वांची आहे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी संविधानिक मूल्य साठी संघर्ष करणाऱ्या सर्व पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले. संविधानिक मूल्य साठी आपण केलेली कृती नेहमी स्मरणात राहील. डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान महत्वाचे आहे. गुलामीचा मृत्यू म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म व मनुस्मृतीचा मृत्यू म्हणजे संविधानाचा जन्म आहे. संविधानाला धोका आजच नाही तर ते लिहित असताना धोके निर्माण केले होते, भारतीय संविधान धर्माला अर्पण करावे, शूद्राने लिहिलेले संविधान योग्य नाही असा ही देशात प्रवाह होता. डॉ बाबासाहेबांनी महाड येथे मनुस्मृती दहन केली. 1930 मध्ये 5 वर्ष काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला. हा इतिहास लक्षात ठेवला पाहिजे. राज्यभर 1 वर्ष मनुस्मृती वाचावी व राज्यभरातून जयपूर येथे उभा मनुपुतळा काढण्याचे आंदोलन करावे कांता अहिरे यांचे राहिलेले काम जनतेने करावे असे आवाहन केले. संविधान कागद नाही. तर आज आपण इथे कार्यक्रम संविधान असल्यामुळेच घेऊ शकतो. संविधान हा आपला सर्वांचा श्वास आहे. जगाचा इतिहास आहे. ज्या चळवळीत जास्त महिलांचा समावेश असतो तीच चळवळ यशस्वी होते. आज विचारमंचावर उपस्थित महिला याचे उदाहरण आहेत. मध्यमवर्गीय मानसिकता क्रांती करू शकत नाही . राजकारण भ्रष्ट होत असताना महिला विचारासाठी पुढे येत आहेत याचे स्वागत केले पाहिजे व पाठिंबा दिला पाहिजे. संविधानामुळे मानवमुक्ती होऊ शकते. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सर्वत्र पोहचवणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले. उपस्थितांमधून सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले. सूत्रसंचलन रविकांत शार्दूल यांनी केले. आभार डॉ विशाल जाधव यांनी मानले स्वागत राजू नाईक यांनी केले. या प्रसंगी करुणा सागर पगारे, डॉ रामदास भोंग , मनोहर पगारे, नितीन भुजबळ, प्राजक्ता कापडणे, रत्नदीप जाधव,भीमा पाटील, मीना आढाव, माया खोडवे, शिवदास म्हसदे, विलास नलावडे आदी महिला पुरूष उपस्थित होते.

33
846 views

Comment